Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 525
ऋषिः - पराशरः शाक्त्यः देवता - पवमानः सोमः छन्दः - त्रिष्टुप् स्वरः - धैवतः काण्ड नाम - पावमानं काण्डम्
1

ति꣣स्रो꣡ वाच꣢꣯ ईरयति꣣ प्र꣡ वह्नि꣢꣯रृ꣣त꣡स्य꣢ धी꣣तिं꣡ ब्रह्म꣢꣯णो मनी꣣षा꣢म् । गा꣡वो꣢ यन्ति꣣ गो꣡प꣢तिं पृ꣣च्छ꣡मा꣢नाः꣣ सो꣡मं꣢ यन्ति म꣣त꣡यो꣢ वावशा꣣नाः꣢ ॥५२५॥

स्वर सहित पद पाठ

ति꣣स्रः꣢ । वा꣡चः꣢꣯ । ई꣣रयति । प्र꣢ । व꣡ह्निः꣢꣯ । ऋ꣣त꣡स्य꣢ । धी꣣ति꣢म् । ब्र꣡ह्म꣢꣯णः । म꣣नीषा꣢म् । गा꣡वः꣢꣯ । य꣣न्ति । गो꣡प꣢꣯तिम् । गो । प꣣तिम् । पृच्छ꣡मा꣢नाः । सो꣡म꣢꣯म् । य꣣न्ति । मत꣡यः꣢ । वा꣣वशानाः꣢ ॥५२५॥


स्वर रहित मन्त्र

तिस्रो वाच ईरयति प्र वह्निरृतस्य धीतिं ब्रह्मणो मनीषाम् । गावो यन्ति गोपतिं पृच्छमानाः सोमं यन्ति मतयो वावशानाः ॥५२५॥


स्वर रहित पद पाठ

तिस्रः । वाचः । ईरयति । प्र । वह्निः । ऋतस्य । धीतिम् । ब्रह्मणः । मनीषाम् । गावः । यन्ति । गोपतिम् । गो । पतिम् । पृच्छमानाः । सोमम् । यन्ति । मतयः । वावशानाः ॥५२५॥

सामवेद - मन्त्र संख्या : 525
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 6;
Acknowledgment

शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (परमात्म पर) (बहृः) जगनिर्माता वा संचालक तो सोम परमेश्वर (तिस्रः वाचः) ऋक्, यजु, साम या तीन वाणींचे (प्र ईरयति) प्रजांच्या कल्याणाकरिता उपदेश करतो. तोच मनुष्यांना (ऋतस्य) सत्यमय यज्ञ (धीतिम्) धारण करण्याची (खरेपणाने वागण्याची) आणि (ब्रह्मणः) ज्ञानाचे मनन करण्याची (प्र ईरयति) प्रेरणा करतो. (गावः) पृथ्वी आदी लोक अथवा सूर्याची किरणे (गोपतिम्) आपल्या स्वामीविषयी जणू काय (पृच्छमानाः) सारखेपमने (यन्ति) विचारत आहेत की आमचा स्वामी कोण आहे की जो आमचे संचालन, परिभ्रमण करीत आहे, अशा प्रकारे (मतयः) माझी स्तुती वाणी (वाघशानाः) वारंवार अधिकाधिक कामना करीत (सोमम्) त्या रसागार परमेश्वराकडे (यन्ति) जात आहे.।। द्वितीय अर्थ - (जीवात्मापर) (वहिः) शरीराचा जो वहनकर्ता जीवात्मा, तो (ठिस्रः वाचः) ज्ञान रूपाने, विचार रूपाने ाणि जिहृेच्या कंठ, तालु, आदीच्या संयोगाने उत्पन्न व शब्दरूपाने विद्यमान तीन प्रकारच्या वाणीना (प्रईस्यति) प्रकट करतो. तोच (ऋतस्य) सत्याचे (धीविम्) धारण आणि (ब्रह्मणः) उपार्जित ज्ञानाचे (अनीषाम्) मनन करणारा आहे. (गावः) मनासह पाच ज्ञानेंद्रियें जणू काय (पृच्छमानाः) कर्तव्य- अकर्तव्याविषयी विचारणा करीत (गोपतिम्) इंद्रियांचा जो स्वामी त्या आत्म्याकडे (यन्ति) जातात. तसेच (मतयाः) माझी बुद्धी (वावशानाः) निश्चयाने ज्ञान प्राप्तीचे साधन होत होत (सोमम्) ज्ञानाचा जो स्वामी त्या आत्म्याकडे (यन्ति) जात आहेत.।। तृतीय अर्थ - (आचार्यपर) (वहिृः) ज्ञानाचा वाहक जो आचार्य, तो शिष्यासाठी (तिस्रः वाचः) ज्ञान, कर्म, उपासना या त्रिविध मार्गांचे प्रतिपादन करणाऱ्या अथवा सत्त्व, रज, तम, सृष्टी, स्थिती, प्रलय, वा जाग्रत स्वप्न, सुषुप्ती, वा धर्म, अर्थ, काम या तीन प्रकारच्या मार्गांचे पआतिपादन करणाऱ्या वाणीला (प्र ईरयति) प्रेरणा देतो. तोच आचार्यच (ऋतस्य) सत्याचे (धीतिम्) धारण करणाऱ्या आणि ब्रह्मणः) ब्रह्माच्या वा मोक्षाच्या प्राप्ती करणाऱ्या (मनीषाम्) प्रज्ञेला (प्र ईरयति) प्रेरणा करतो (गावः) माझी (शिष्याची) वाणी (पृच्छ मानाः) ब्रह्म विद्याविषयक शंका वा प्रश्न विचारीत (गोपतिम्) वाचस्पती आचार्याकडे (यन्ति) जाते (आचार्यांने प्रश्न विचारून संदेह वा शंकेचे निराकरण करून घेते) (मतयः) माझी बुद्धी (वावशानाः) ज्ञानोद्घाटनाची इच्छा करीत (सोमम्) ज्ञान- रसाचा जो आगर त्या सौम्य स्वभावाच्या आचार्याकडे (यन्ति) जाते. ।। ३।। या मंत्रात श्लेष अलंकार आहे. प्रथम दोन अर्थातील यज्ञ (धीतिम्) धारण करण्याची (खरेपणाने वागण्याची) आणि (ब्रह्मणः) ज्ञानाचे मनन करण्याची (प्र ईरयति) प्रेरणा करो. (गावः) पृथ्वी आदी लोक अथवा सूर्याची किरणे (गोपतिम्) आपल्या स्वामीविषयी जणू काय (पृच्छमानाः) सारखेपणो (यन्ति) विचारत आहेत की आमचा स्वामी कोण आहे की जो आमचे संचालन, परिब्रमण करीत आहे ? अशा प्रकारे (मतयः) माझी स्तुती - वाणी (वाषशानाः) वारंवार अधिकाधिक कामना करीत (सोमम्) त्या रसागार परमेश्वराकडे (यन्ति) जात आहे.।। द्वितीय अर्थ - (जीवात्मापर) (वहिृः) शरीराचा जो वहनकर्ता जीवात्मा, तो (तिस्रः वाचः) ज्ञानरूपाने, विचार रूपाने आणि जिहृेच्या कंठ, तालु आदींच्या संयोगाने उत्पन्न व शब्दरूपाने विद्यमान तीन प्रकारच्या वाणीना (प्र ईरयति) प्रकट करतो. तोच (ऋतस्य) सत्याचे (धीविम्) धारण आणि (ब्रह्मणः) उपार्जित ज्ञानाचे (मनीषाम्) मनन करणारा आहे. (गावः) मनासह पाच ज्ञानेंद्रिये जणू काय (पृच्छमानाः) कर्तव्य - अकर्तव्याविषयी विचारणा करीत (गोपतिम्) इंद्रियांचा जो स्वामी त्या आत्म्याकडे (यन्ति) जातात. तसेच (मतयः) माझी बुद्धी (वावशानाः) निश्चयाने ज्ञानप्राप्तीचे साधन होत होत (सोमम्) ज्ञानाचा जो स्वामी त्या आत्म्याकडे (यन्ति) जात आहेत.।। तृतीय अर्थ - (आचार्यपर) (बहिृः) ज्ञानाचा वाहक जो आचार्य, तो शिष्यासाठी (तिस्रः वाचः) ज्ञान, कर्म, उपासना या त्रिविध मार्गांचे प्रतिपादन करणाऱ्या अथवा सत्त्व, रज, तम / सृष्टी, स्थिती, प्रलय / वा जाग्रत स्वप्न, सुषुप्ती / वा धर्म, अर्थ, काम या तीन प्रकारच्या मार्गांचे प्रतिपादन करणाऱ्या वाणीला (प्र ईरयति) प्रेरणा देतो. तोच आचार्यच (ऋतस्य) सत्याचे (धीतिम्) धारण करणाऱ्या आणि (ब्रह्मणः) ब्रह्माच्या वा मोक्षाच्या प्राप्ती करणाऱ्या (मनीषाम्) प्रज्ञेला (प्र ईरयति) प्रेरणा करतो (गावः) माझी (शिष्याची) वाणी (पृच्छ मानाः) ब्रह्मविद्याविषयक शंका वा प्रश्न विचारती (गोपतिम्) वाचस्पती आचार्याकडे (यन्ति) जाते. (आचार्यांना प्रश्न विचारून संदेह वा शंकेचे निराकरण करून घेते). (मतयः) माझी बुद्धी (वावशानाः) ज्ञानोद्घाटनाची इच्छा करीत (सोमम्) ज्ञान रसाचा जो आगर त्या सौम्य स्वभावाच्या आचार्याकडे (यन्ति) जाते.।। ३।।

भावार्थ - वाणीला प्रेरणा करणाऱ्या, सत्य वा यज्ञाचे धारण करणाऱ्या, ज्ञान - दाता आणि मन-बुद्धीवर सुसंस्कार करणाऱ्या परमेश्वराच जीवात्म्याचे व गुरूचे मामसाने सदैव, पूजन, सेवन केले पाहिजे.।। ३।।

इस भाष्य को एडिट करें
Top