Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 535
ऋषिः - इन्द्रप्रमतिर्वासिष्ठः देवता - पवमानः सोमः छन्दः - त्रिष्टुप् स्वरः - धैवतः काण्ड नाम - पावमानं काण्डम्
1

प्र꣡ गा꣢यता꣣꣬भ्य꣢꣯र्चाम दे꣣वा꣡न्त्सोम꣢꣯ꣳ हिनोत मह꣣ते꣡ धना꣢꣯य । स्वा꣣दुः꣡ प꣢वता꣣मति꣣ वा꣢र꣣म꣢व्य꣣मा꣡ सी꣢दतु क꣣ल꣡शं꣢ दे꣣व꣡ इन्दुः꣢꣯ ॥५३५॥

स्वर सहित पद पाठ

प्र꣢ । गा꣣यता । अभि꣢ । अ꣣र्चाम । देवा꣢न् । सो꣡म꣢꣯म् । हि꣣नोत । महते꣢ । ध꣡ना꣢꣯य । स्वा꣣दुः꣢ । प꣣वताम् । अ꣡ति꣢꣯ । वा꣡र꣢꣯म् । अ꣡व्य꣢꣯म् । आ । सी꣣दतु । कल꣡श꣢म् । दे꣣वः꣢ । इ꣡न्दुः꣢꣯ ॥५३५॥


स्वर रहित मन्त्र

प्र गायताभ्यर्चाम देवान्त्सोमꣳ हिनोत महते धनाय । स्वादुः पवतामति वारमव्यमा सीदतु कलशं देव इन्दुः ॥५३५॥


स्वर रहित पद पाठ

प्र । गायता । अभि । अर्चाम । देवान् । सोमम् । हिनोत । महते । धनाय । स्वादुः । पवताम् । अति । वारम् । अव्यम् । आ । सीदतु । कलशम् । देवः । इन्दुः ॥५३५॥

सामवेद - मन्त्र संख्या : 535
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 7;
Acknowledgment

शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (सोम औषधीपर) मित्रांनो ! हे सहकाऱ्यांना ! तुम्ही (प्र गायत) वेद मंत्राचे गायन करा. आम्ही (तुमचे मित्र) (देवान्) यज्ञासाठी समागत विद्वानांचा (अभ्यर्चाम) सत्कार करतो. तुम्ही (महते) पुष्कळ (धनाय) यज्ञ-फल रूप धनासाठी (सोमम्) औषधीचा रसाचे (हिनोत) निष्पादन करण्यासाठी इतरांना प्रेरणा करा. (स्वादुः स्वादु सोमरस (अव्यम्) मेंढीच्या केसांनी निर्मित (वारम्) दशापवित्रामधून गाळले जाऊन (अति पवताम्) खाली ठेवलेल्या पात्रात पडू द्या. (देवः) द्युतिमान तो (इन्दुः) सोमरस (कलशम्) द्रोण कलशात (आ सीदतु) जाऊन तिथे स्थित राहील.।। द्वितीय अर्थ - (परमात्मपर) - उपासकजनहो, तुम्ही (प्र गायत) रसागार परमेश्वराला उद्देशून गीत गाय करा. तुम्ही आणि आम्ही असे सर्व जण मिळून हृदयात उद्धव पावलेल्या (देवान्) सत्य, अहिंसा आदी दिव्य गुणांचा सत्कार करतो. तुम्ही (महते) महान (धनाय) दिव्य धनाच्या प्राप्तीसाठी (सोमम्) रसाचा जो आगर, त्या परमेश्वराला (हिवोत) आपल्या हृदयात प्रेरित करा. (त्याची प्रार्थना करा). (स्वादुः) मधुर आनंद रस देणारा तो परमेश्वर (अव्यं वारम्) पार्थिव अन्नमय कोशाला (अति) ओलांडून (पवताम्) प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय कोशात प्रवाहित होऊ द्या. (देवः) दान आदी विशिष्ट गुणांनी संपन्न तो (इन्दुः) रसाने चिंब भिजवून टाकणारा परमेश्वर (कलशम्) सोळा कळांनी युक्त अशा जीवात्म्यास (आ सदितु) प्राप्त होऊ द्या. ।। ३।।

भावार्थ - जसे यजमान गण सोमलतेला यज्ञीय पाटा - वरवंट्यात रगडून, त्याच्या रसाला दशापवित्रातून गाळतात व नंतर तो मधु सोमरस द्रोण कलशात भरतात. तद्वत परमात्म्याचे उपासकांनी मधुर (आनंदकर) ब्रह्मानंद - रसाला आपल्या आत्मा रूप कलशात प्रविष्ट करावे, केले पाहिजे.।। ३।।

इस भाष्य को एडिट करें
Top