Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 608
ऋषिः - वामदेवो गौतमः
देवता - रात्रिः
छन्दः - अनुष्टुप्
स्वरः - गान्धारः
काण्ड नाम - आरण्यं काण्डम्
1
आ꣡ प्रागा꣢꣯द्भ꣣द्रा꣡ यु꣢व꣣ति꣡रह्नः꣢꣯ के꣣तू꣡न्त्समी꣢꣯र्त्सति । अ꣡भू꣢द्भ꣣द्रा꣡ नि꣣वे꣡श꣢नी꣣ वि꣡श्व꣢स्य꣣ ज꣡ग꣢तो꣣ रा꣡त्री꣢ ॥६०८
स्वर सहित पद पाठआ꣢ । प्र । आ । अ꣣गात् । भद्रा꣢ । यु꣣वतिः । अ꣡ह्नः꣢꣯ । अ । ह्नः꣣ । केतू꣢न् । सम् । ई꣣र्त्सति । अ꣡भू꣢꣯त् । भ꣣द्रा꣢ । नि꣣वे꣡श꣢नी । नि꣣ । वे꣡श꣢꣯नी । वि꣡श्व꣢꣯स्य । ज꣡ग꣢꣯तः । रा꣡त्री꣢꣯ ॥६०८॥
स्वर रहित मन्त्र
आ प्रागाद्भद्रा युवतिरह्नः केतून्त्समीर्त्सति । अभूद्भद्रा निवेशनी विश्वस्य जगतो रात्री ॥६०८
स्वर रहित पद पाठ
आ । प्र । आ । अगात् । भद्रा । युवतिः । अह्नः । अ । ह्नः । केतून् । सम् । ईर्त्सति । अभूत् । भद्रा । निवेशनी । नि । वेशनी । विश्वस्य । जगतः । रात्री ॥६०८॥
सामवेद - मन्त्र संख्या : 608
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 3; दशतिः » 3; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 6; खण्ड » 3;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 3; दशतिः » 3; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 6; खण्ड » 3;
Acknowledgment
विषय - रात्री देवता। रात्रिरूप युवतीचे वर्णन
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (रात्रिपरक)- (भद्रा) ही सुखदायिनी (युवतिः) रात्रिरूप युवती (अे प्रागात्) उत्तमरूपाने, शांतपणे आली आहे. ती (अहृः) दिवसाच्या (केतून्) किरणांना (समीर्त्सति) गुंडाळून घेत आहे (प्रकाशाला गिळून घेत आहे) ही (रात्री) रात्रिरूप युवती (विश्वस्य) समस्त (जगतः) जगासाठी (निवेशनी) विश्रामदायिनी आणि (भद्रा) कल्याण कारिणी (अभूत्) झालेली आहे.।।
द्वितीय अर्थ - (योगनिद्रापरक)-(भद्रा) सुखदायिनी (युवतिः) योगनिद्रारूप युवती (आ प्रागात्) योगमार्गावरून चालत (हृदयातं व मस्तिष्कात) शीप्र आली आहे (अहृः) ही सांसारिक विषयभोगरूप दिवसाच्या (केतून्) प्रभावाला (समीर्त्सति) संपवीत आहे. ही (रात्री) समाधीदशेतील योगनिद्रा (विश्वस्य) संपूर्ण (जगतः) क्रिया-व्यापार आयींना (निवेशनी) शांत करणारी आणि यामुळेच (भद्रा) आनंद दायिनी (अभूत्) झालेली आहे.।।७।।
भावार्थ - योगसमाधीत अनुभवीत असलेली योगनिद्रा योगीजनसाठी रात्रीप्रमाणे आल्हाददायिका व विश्रामदायिनी असते.।।७।।
विशेष -
या मंत्रात रात्रीकर युवतित्वचा आरोप केला आहे. त्यामुळे येथे रूपकालंकार आहे. या अलंकाराचे तात्पर्य असे की ज्याप्रमाणे एक युवती गृहिणी घरात इकडे-तिकडे विखुरलेल्या वस्तू एकत्रित करून व्यवस्थितपणे ठेवते, आणि आपल्या पतीकरिता सुखदायिनी व विश्रामदायिनी ठरते, तद्वत ही रात्र दिवसा विखुरलेल्या किरणांना एकत्रित करून ठेवते आणि सर्वांकरिता विश्रामदायिनी होते.।।७।।