Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 617
ऋषिः - नारायणः देवता - पुरुषः छन्दः - अनुष्टुप् स्वरः - गान्धारः काण्ड नाम - आरण्यं काण्डम्
1

स꣣ह꣡स्र꣢शीर्षाः꣣ पु꣡रु꣢षः सहस्रा꣣क्षः꣢ स꣣ह꣡स्र꣢पात् । स꣢꣯ भूमि꣢꣯ꣳ स꣣र्व꣡तो꣢ वृ꣣त्वा꣡त्य꣢तिष्ठद्द꣣शाङ्गुल꣢म् ॥६१७॥

स्वर सहित पद पाठ

स꣣ह꣡स्र꣢शीर्षाः । स꣣ह꣡स्र꣢ । शी꣣र्षाः । पु꣡रु꣢꣯षः । स꣣हस्राक्षः꣢ । स꣣हस्र । अक्षः꣢ । स꣣ह꣡स्र꣢पात् । स꣣ह꣡स्र꣢ । पा꣣त् । सः꣢ । भू꣡मि꣢꣯म् । स꣣र्व꣡तः꣢ । वृ꣣त्वा꣢ । अ꣡ति꣢꣯ । अ꣣तिष्ठत् । दशाङ्गुल꣢म् । द꣣श । अङ्गुल꣢म् ॥६१७॥


स्वर रहित मन्त्र

सहस्रशीर्षाः पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात् । स भूमिꣳ सर्वतो वृत्वात्यतिष्ठद्दशाङ्गुलम् ॥६१७॥


स्वर रहित पद पाठ

सहस्रशीर्षाः । सहस्र । शीर्षाः । पुरुषः । सहस्राक्षः । सहस्र । अक्षः । सहस्रपात् । सहस्र । पात् । सः । भूमिम् । सर्वतः । वृत्वा । अति । अतिष्ठत् । दशाङ्गुलम् । दश । अङ्गुलम् ॥६१७॥

सामवेद - मन्त्र संख्या : 617
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 3; दशतिः » 4; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 6; खण्ड » 4;
Acknowledgment

शब्दार्थ -
(पुरुषः) सर्वांचा अग्रनेता, सर्व जगात परिपूर्ण आणि सर्वांचा पालक तो परमेश्वर (सहस्त्रशीर्षाः) हजार डोकी असलेला म्हणजेच अनंतज्ञानी आहे. तो (सहस्राक्षः) हजार नेत्र असलेला म्हणजे सर्वद्रष्टा आहे. तो (सहस्रपात्) हजारो पाय असलेला म्हणजे सर्वत्र व्याप्त आहे. (सः) तो (भूमिम्) पृथ्वीला (सर्वतः) सगळीकडून (वृत्वा) घेरून (दशाङ्गुलम्) तसेच दहा इंद्रियांना (अति) अतिक्रांत करून ( त्यांच्या पुढे व सगळीकडे) (अतिष्ठत्) स्थित आहे म्हणजे तो दहाही इन्द्रियांच्या क्षेत्रांपेक्षा खूप खूप दूर आहे (इंद्रियगम्य नाही) उपनिषदात हेच अशाप्रकारे म्हटले आहे की (तिथपर्यंत नेत्रांची पोहोच वा विस्तार नाही, वाणी वा मनदेखील तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत (केनोपनिषद् १/३)।।३।। ‘पुरूष’ शब्दाचे निर्वचन करताना मास्काचार्य म्हणतात. ‘पुरीत निवास करीत असल्यामुळे वा पुरीत शयन करीत असल्यामुळे तो ‘पुरुष’ आहे (पुरिसद् वा पुरिश=पुरूष) अथवा असेहर निर्वचन करता येते की वृद्धचर्थक ‘पुरी’ धातूपासून निष्पन्न झाल्यामुळे (पुरी आप्यायते) या अंतः पुरुष परमात्म्याला पुरुष म्हणतात कारण की तो समस्त ब्रह्मांडाला आपल्या सत्तेने परिपूर्ण करून आहे. म्हटले आहेच ‘‘त्यापेक्षा अधिक पर वा अपर अशी कोणती वस्तू नाही, त्यापेक्षा अधिक अणू वा महान काही नाही. तो एकमेव परमेश्वर वृक्षाप्रमाणे निश्चल होऊन आपल्या तेजोमय स्वरूपात स्थित आहे. त्या परम पुरुषाने हे सकल ब्रह्माण्ड परिपूर्ण केले आहे.’’(निरुक्त २/३) या मंत्रात सहस्र शिर, पाय आदी रूप असलेल्या परमेश्वराने तसेच भूमीत तोच सर्वव्यापी रूप असलेल्या परमेश्वराचे वर्णन करून पुन्हा त्याला इंद्रिं-अगोचर म्हटले आहे. अशाप्रकारे कारणाचे अस्तित्व असूनही कार्य उत्पन्न होत नाही, असे म्हटल्यामुळे येथे विशेषोक्ती अलंकार आहे.।।३।।

भावार्थ - सर्वांनी सर्वज्ञ, सर्वद्रष्टा, सर्वव्यापी सर्व भूगोल-खगोलास व्याप्त करून स्थित असलेल्या त्या परमेश्वराचा साक्षात्कार करून आनंद अनुभवला. जरी तो वाणी, नेत्र, कर्ण, हात, पाय यांच्या पोहोचल्या पलीकडे आहे, तरीही ध्यानाद्वारे त्यापासून मिळणाऱ्या अनंत सुखाचा उपभोग घ्यावा.।।३।।

इस भाष्य को एडिट करें
Top