Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 656
ऋषिः - कश्यपो मारीचः
देवता - पवमानः सोमः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम -
1
ऋ꣣ध꣡क्सो꣢म स्व꣣स्त꣡ये꣢ संजग्मा꣣नो꣢ दि꣣वा꣡ क꣢वे । प꣡व꣢स्व꣣ सू꣡र्यो꣢ दृ꣣शे꣢ ॥६५६॥
स्वर सहित पद पाठऋ꣣ध꣢क् । सो꣣म । स्व꣣स्त꣡ये꣢ । सु꣣ । अस्त꣡ये꣢ । सं꣣जग्मानः꣢ । स꣣म् । जग्मानः꣢ । दि꣣वा꣢ । क꣣वे । प꣡व꣢꣯स्व । सू꣡र्यः꣢꣯ । दृ꣣शे꣢ ॥६५६॥
स्वर रहित मन्त्र
ऋधक्सोम स्वस्तये संजग्मानो दिवा कवे । पवस्व सूर्यो दृशे ॥६५६॥
स्वर रहित पद पाठ
ऋधक् । सोम । स्वस्तये । सु । अस्तये । संजग्मानः । सम् । जग्मानः । दिवा । कवे । पवस्व । सूर्यः । दृशे ॥६५६॥
सामवेद - मन्त्र संख्या : 656
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 2; मन्त्र » 3
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 1; सूक्त » 2; मन्त्र » 3
Acknowledgment
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 2; मन्त्र » 3
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 1; सूक्त » 2; मन्त्र » 3
Acknowledgment
विषय - पुढील मंत्रात जिवात्म्याने आणि चंद्राचे वर्णन केले आहे
शब्दार्थ -
(पहिला अर्थ - जिवात्म्याविषयी) (कवे) बुद्धीमान आणि दूरद्रष्टा (सोम) तसेच चंद्राप्रमाणे क्रमाक्रमाने उन्नती वा प्रगतीकडे जाणाऱ्या हे जीवात्मा, तू (दिवा) दिव्य परमेश्वराच्या ज्योतीशी (संजग्मान:) संयुक्त होळ म्हणजे परमात्म्याशी आपले नाते जोडत (स्वस्तये) अधिक उत्कृष्ट जीवनासाठी (ऋधक) उन्नती करीत जा आणि या उपायाने (सुर्य:) सुर्याप्रमाणे प्रकाशमान होत (हशे) मुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी प्रयत्नशील राहा. (तात्पर्य) मोक्ष आणि श्रेष्ठ जीवन प्राप्त करण्यासाठी प्रत्येक मुमुक्षु वा सुस्वार्थी व्यक्तीने ईश्वराशी नाते जोडावे त्याचे सतत ध्यान करीत असावे.
दुसरा अर्थ : चंद्रमा विषयी (कवे) पृथ्वीची परिक्रमा करणाऱ्या हे (सोम) चंद्रा, तू (दिवा) सुर्याच्या प्रकाशाशी (संजग्यान:) संयुक्त होत (स्वस्तये) आम्हा पृथ्वीवासियांच्या सुखाकरिता (ऋधक) एका एका कलेने वाढत जा आणि पौर्णिमेच्या दिवशी (सुर्य:) सुर्याप्रमाणे पूर्ण प्रभामंडळ प्राप्त करीत (दृशे) अंधकार दूर होऊन आम्ही पाहू शकू, यासाठी तू (---) भूमंडळावर आपल्या ज्योत्स्नेचा प्रसार कर.।।३।। या मंत्रात श्लेषालंकार आहे. (म्हणजे श्लेषाने सोम शब्दाचे दोन अर्थ आहेत, म्हणून शब्दांचेही दोन अर्थ होत आहेत.) (सूर्य:) या शब्दात लुब्तोपमा अलंकार आहे. म्हणजे उपमा वाचक शब्द इव, नत आदि इर्थ नाही. तो शब्द लुप्त आहे. चंद्राच्या पक्षी जड वस्तुत चेतनाप्रमाणे कार्य दाखविले आहे. हा प्रयोगही अलंकारीक आहे.
भावार्थ - ज्याप्रमाणे सुर्यापासून प्रकाश घेऊन चंद्र प्रकाशित होतो, तद्वत परमेश्वरापासून प्रेरणा घेऊन आम्ही आपले जीवन उज्ज्वल बनवावे. ।।३।।
इस भाष्य को एडिट करें