Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 660
ऋषिः - भरद्वाजो बार्हस्पत्यः देवता - अग्निः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम -
1

अ꣢ग्न꣣ आ꣡ या꣢हि वी꣣त꣡ये꣢ गृणा꣣नो꣢ ह꣣व्य꣡दा꣢तये । नि꣡ होता꣢꣯ सत्सि ब꣣र्हि꣡षि꣢ ॥६६०॥

स्वर सहित पद पाठ

अ꣡ग्ने꣢꣯ । आ । या꣣हि । वीत꣡ये꣢ । गृ꣣णानः꣢ । ह꣣व्य꣡दा꣢तये । ह꣣व्य꣢ । दा꣣तये । नि꣢ । हो꣡ता꣢꣯ । स꣣त्सि । बर्हि꣡षि꣢ ॥६६०॥


स्वर रहित मन्त्र

अग्न आ याहि वीतये गृणानो हव्यदातये । नि होता सत्सि बर्हिषि ॥६६०॥


स्वर रहित पद पाठ

अग्ने । आ । याहि । वीतये । गृणानः । हव्यदातये । हव्य । दातये । नि । होता । सत्सि । बर्हिषि ॥६६०॥

सामवेद - मन्त्र संख्या : 660
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 4; मन्त्र » 1
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 2; सूक्त » 1; मन्त्र » 1
Acknowledgment

शब्दार्थ -
(प्रथम अर्थ-यज्ञाग्निपर) : अग्निहोत्राच्या माध्यमातून परमात्म तेज स्वत:च्या हृदयात प्रदीप्त करण्याची इच्छा करणारा उपासक यज्ञाग्नीला संबोधून म्हणत आहे. (अग्ने) हे यज्ञाग्नी, तू (आयाहि) आमच्या यज्ञात ये. कशासाठी? (वीतये) आम्ही तुला देत असलेलया हव्य पदार्थ खाण्यासाठी ये (गृणान:) मंत्रपाठाने आम्ही तुझी स्तुती करत आहोत. तू आमचे रोग, पाप आदिंना गिळण्यासाठी ये. आम्हाला (हव्यदातये) दातव्य तेज देण्यासाठी ये अथवा सुगंधित, मधुर, पुष्टिप्रद व रोगनाशक अशा हव्य पदार्थांना सूक्ष्म करून तो वायू वायुमंडळात फैलावण्यासाठी तू ये. (होता) तू होमात टाकलेले द्रव्यांचा स्वीकार करणारा आहेस अथवा आरोग्य वा दीर्घायुष्य देणारा आहेत. तू (वर्हिषि) यज्ञवेदीच्या आकाशात (निसत्सि) येऊन स्थिर हो. या मंत्रात अचेतन वा जड पदार्थाला अग्नीला चेतनाप्रमाणे मानून संबोधित केले आहे. हा प्रयोग अलंकारिक आहे. (येथे जडपूजा मानू नये) ।। (द्वितीय अर्थ - आत्म उद्बोधनपर आहे) (अग्ने) हे माझ्या अंतरात्मन् (रे माझ्या मना) तू (आयाहि) कर्मक्षेत्रात पदार्पण कर (सत्कर्म करीत जा) (वीतये) सत्कृत्य करण्यासाठी (गुणान:) स्वत:ला व इतरांना कर्म करण्याची प्रेरणा करीत करीत तू (हव्यदातये) परोपकारासाठी, तसेच त्याग व आत्म प्रबोधनासाठी पुढे ये. (प्रयत्न करीत राहा) (होम तू राष्ट्रास संगठन व ऐक्य निर्माण करण्यासाठी जनतेला आवाहन करणारा आहेस. म्हणून तू (बर्हिषि) समाजाच्या उच्च पदावर (निसत्सि) आसीन हो. (समाजाचे नेतृत्व कर ।।१।।

भावार्थ - सर्वांचे हे कर्तव्य आहे की त्यांनी ऋतूप्रमाणे अनुकूल अशा हव्य पदार्थांद्वारे होम करून वायुमंडळ सुगंधित व रोगरहित करावे व अशाप्रमारे आपली भौतिक उन्नती करावी. तसेच सर्वांनी आपल्या हृदयात व ज्ञाग्नीच्या तेजाप्रमाणे परमात्म-ज्योती प्रज्वलित ठेवावी व अशाप्रकारे आध्यात्मिक संपत्ती मिळवावी. तसेच अथर्ववेदाच्या अ. ७/५२/८ या मंत्रात सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे मानाने की माझ्या उजव्या हातात कर्म असून, डाव्या हातात विजय ठेवलेला आहे. अशाप्रकारे आपल्या अंतरात्म्यास उद्बोधन देऊन महान कर्मे करीत असावे. एवढेच नव्हे तर राष्ट्रहितासाठी आपला बलिदान देण्यातही संकोच वा भय मानू नये ।।१।।

इस भाष्य को एडिट करें
Top