Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 680
ऋषिः - वसिष्ठो मैत्रावरुणिः
देवता - इन्द्रः
छन्दः - प्रगाथः(विषमा बृहती समा सतोबृहती)
स्वरः - मध्यमः
काण्ड नाम -
1
अ꣣भि꣡ त्वा꣢ शूर नोनु꣣मो꣡ऽदु꣢ग्धा इव धे꣣न꣡वः꣢ । ई꣡शा꣢न꣣म꣡स्य जग꣢꣯तः स्व꣣र्दृ꣢श꣣मी꣡शा꣢नमिन्द्र त꣣स्थु꣡षः꣢ ॥६८०॥
स्वर सहित पद पाठअ꣣भि꣢ । त्वा꣣ । शूर । ना꣡नु꣢꣯मः । अ꣡दु꣢꣯ग्धाः । अ । दु꣣ग्धाः । इव । धे꣡न꣢वः । ई꣡शा꣢꣯नम् । अ꣣स्य꣢ । ज꣡ग꣢꣯तः । स्व꣣र्दृ꣡श꣢म् । स्वः꣣ । दृ꣡श꣢꣯म् । ई꣡शा꣢꣯नम् । इ꣣न्द्र । तस्थु꣡षः꣢ ॥६८०॥
स्वर रहित मन्त्र
अभि त्वा शूर नोनुमोऽदुग्धा इव धेनवः । ईशानमस्य जगतः स्वर्दृशमीशानमिन्द्र तस्थुषः ॥६८०॥
स्वर रहित पद पाठ
अभि । त्वा । शूर । नानुमः । अदुग्धाः । अ । दुग्धाः । इव । धेनवः । ईशानम् । अस्य । जगतः । स्वर्दृशम् । स्वः । दृशम् । ईशानम् । इन्द्र । तस्थुषः ॥६८०॥
सामवेद - मन्त्र संख्या : 680
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 11; मन्त्र » 1
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 4; सूक्त » 1; मन्त्र » 1
Acknowledgment
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 11; मन्त्र » 1
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 4; सूक्त » 1; मन्त्र » 1
Acknowledgment
विषय - या ऋचेची व्याख्या पूर्वार्चिक भागात क्र. २३३ वर केलेली आहे. तिथे त्याचा अर्थ जगदीश्वरपर सांगितला आहे. इथे स्वत:च्या आत्म्यास संबोधून काही म्हटले आहे.
शब्दार्थ -
(शूर इन्द्र) शूरवीर असलेल्या आमच्या हे आत्मा आम्ही साधकगण (त्वा अभि) तुला उद्देशून (नोनुमा) वारंवार म्हणत आहोत, तुझी स्तुती करीत आहोत. कशाप्रकारे ? (अदुग्धा:) ज्यांचे अजून दोहन केले नाही अर्थात अजून ज्यांची धार काढली नाही अशा (धेनष: इव) गायी ज्याप्रमाणे दोहनासाठी उत्कंठीत होऊन वारंवार हंबरत राहतात, त्याचप्रमाणे आम्ही हे आत्मा आम्ही वारंवार आग्रहाने तुझ्यासाठी स्तुतिपरक शब्द उच्चारीत आहोत. तू कसा आहेत? तर उत्तर : तू (अस्त) या (जगत) जगाच्या म्हणजे दूर दूर जाणाऱ्या मनाचा (ईशनम्) स्वामी आहेस. तू (सर्वदृशम्) आनन्द द्रष्टा आहेस आणि (तस्थुष:) आमच्या शरीरात स्थिर वा अजंगम रूपेण असणाऱ्या शारीरिक अंग प्रत्यंगांचा (ईशानम्) स्वामी आहेस. म्हणून आम्ही (नोनुम:) वारंवार तुझ्या गुणांचे वा सामर्थ्याचे वर्णन करीत आहोत. तुला प्रोत्साहित करीत आहोत ।।१।।
भावार्थ - माणसाच्या आत्म्यात अनेक महान शक्ती प्रसुप्तरूपेण असतात. समस्त शरीर चक्राचा जो अधिष्ठाता म्हणजे आत्मा या आत्म्यास जागृत वा उद्बोधित करून सर्व लौकिक आणि आध्यात्मिक सिद्धी प्राप्त करता येतात. ।।१।।
विशेष -
या मंत्रात उपमा अलंकार आहे ।।१।।