Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 681
ऋषिः - वसिष्ठो मैत्रावरुणिः देवता - इन्द्रः छन्दः - प्रगाथः(विषमा बृहती समा सतोबृहती) स्वरः - पञ्चमः काण्ड नाम -
1

न꣡ त्वावा꣢꣯ꣳ अ꣣न्यो꣢ दि꣣व्यो꣡ न पार्थि꣢꣯वो꣣ न꣢ जा꣣तो꣡ न ज꣢꣯निष्यते । अ꣣श्वाय꣡न्तो꣢ मघवन्निन्द्र वा꣣जि꣡नो꣢ ग꣣व्य꣡न्त꣢स्त्वा हवामहे ॥६८१॥

स्वर सहित पद पाठ

न꣢ । त्वा꣡वा꣢꣯न् । अ꣣न्यः꣢ । अ꣣न् । यः꣢ । दि꣣व्यः꣢ । न । पा꣡र्थि꣢꣯वः । न । जा꣡तः꣢ । न । ज꣡निष्यते । अश्वाय꣡न्तः꣢ । मघ꣣वन् । इन्द्र । वाजि꣡नः꣢ । ग꣣व्य꣡न्तः꣢ । त्वा꣣ । हवामहे ॥६८१॥


स्वर रहित मन्त्र

न त्वावाꣳ अन्यो दिव्यो न पार्थिवो न जातो न जनिष्यते । अश्वायन्तो मघवन्निन्द्र वाजिनो गव्यन्तस्त्वा हवामहे ॥६८१॥


स्वर रहित पद पाठ

न । त्वावान् । अन्यः । अन् । यः । दिव्यः । न । पार्थिवः । न । जातः । न । जनिष्यते । अश्वायन्तः । मघवन् । इन्द्र । वाजिनः । गव्यन्तः । त्वा । हवामहे ॥६८१॥

सामवेद - मन्त्र संख्या : 681
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 11; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 4; सूक्त » 1; मन्त्र » 2
Acknowledgment

शब्दार्थ -
(उपासकगण प्रार्थना करीत आहेत) हे परमेश्वर, (त्वावान्) तुझ्याशिवाय (अन्या) अन्य कोणी (दिव्य:) आकाशवर्मी अथवा सर्वव्यापी नाही. तसेच तुझ्याशिवाय (पार्थिव:) कोणताही भूमिवरती पदार्थ नाही, अर्थात तू सर्वात व्याप्त आहेस. परमेश्वरा, तुझ्याशिवाय कोणी (न जात:) पदार्थ नाही. तुझ्यासारखा कोणी पदार्थ जन्मला नाही किंवा पुढेही (न जतिष्यते) जन्मणार नाही म्हणजे तू अजन्मा व अमर आहेस, पण तुझ्याशिवाय इतर कोणताही पदार्थ अजरामर नाही. हे (मधवन्) ऐश्वर्यवान (इन्द्र) परमेश्वरा, (वाजिन:) बलवान आणि पुरुषार्थी असे आम्ही (अश्वायन्त:) श्रेष्ठ प्राणांची (अश्व - प्राण) कामना करणारे व (गव्यन्त:) (गौ - इन्द्रिय) इंद्रियरूप गायीच्या श्रेष्ठ ज्ञान व श्रेष्ठ कर्मरूप दुधाचा इच्छा मनात घेऊन तुझ्याकडे आलो आहोत वा तुला पुकारत आहोत. ।।२।।

भावार्थ - अलौकिक आणि अद्वितीय परमात्म्याची उपासना करून सर्व जण बलवान व पुरुषार्थी होऊ शकतात आणि ऐहिक व पारलौकिक अभीष्ट प्राप्त करू शकतात. ।।२।।

इस भाष्य को एडिट करें
Top