Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 723
ऋषिः - श्रुतकक्षः सुकक्षो वा आङ्गिरसः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम -
1
य꣢स्मि꣣न्वि꣢श्वा꣣ अ꣢धि꣣ श्रि꣢यो꣣ र꣡ण꣢न्ति स꣣प्त꣢ स꣣ꣳस꣡दः꣢ । इ꣡न्द्र꣢ꣳ सु꣣ते꣡ ह꣢वामहे ॥७२३॥
स्वर सहित पद पाठय꣡स्मि꣢꣯न् । वि꣡श्वा꣢꣯ । अ꣡धि꣢꣯ । श्रि꣡यः꣢꣯ । र꣡ण꣢꣯न्ति । स꣣प्त꣢ । स꣣ꣳस꣡दः꣢ । स꣣म् । स꣡दः꣢꣯ । इ꣡न्द्र꣢꣯म् । सु꣡ते꣢ । ह꣣वामहे ॥७२३॥
स्वर रहित मन्त्र
यस्मिन्विश्वा अधि श्रियो रणन्ति सप्त सꣳसदः । इन्द्रꣳ सुते हवामहे ॥७२३॥
स्वर रहित पद पाठ
यस्मिन् । विश्वा । अधि । श्रियः । रणन्ति । सप्त । सꣳसदः । सम् । सदः । इन्द्रम् । सुते । हवामहे ॥७२३॥
सामवेद - मन्त्र संख्या : 723
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » ; सूक्त » 4; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 1; सूक्त » 4; मन्त्र » 2
Acknowledgment
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » ; सूक्त » 4; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 1; सूक्त » 4; मन्त्र » 2
Acknowledgment
विषय - पुढच्या मंत्रात गुरूकडून उपदेश प्राप्त करून शिष्यगण परमेश्वराचे आवाहन करीत आहेत.
शब्दार्थ -
(यस्मिन् अधि) ज्याच्या अधिकारात (विश्वा क्षिय:) सर्व शोभा, सौंदर्य, सुख आहेत आणि (सप्त संसद:) सात ऋतिज, सात दिशा, सात प्रकारची सुर्यकिरणे, सात छन्द, सात मन-बुद्धी व पंच ज्ञानेंद्रिये आणि सात आकाशस्थ ऋषी (रणन्ति) ज्याची स्तुती करीत आहेत, त्या (इन्द्रम्) आदीश्वराला (सुते) उपासना यज्ञात अथवा जीवन यज्ञात आम्ही शिष्यगण (हरामहे) हाक मारीत आहोत त्याचे आवाहन करीत आहोत.
ऋग्वेदाच्या २/१/२ या मंत्रात सात ऋत्विज असे सांगितले आहेत - होता, पोता, नेष्य, अग्नीत, प्रशास्ता, अध्वर्यु, ब्रह्मा सोमभागाचे सात ऋत्विज याप्रमाणे तीन उद्गाता, एक होता, एक मैत्रावरूण, एक ब्राह्मणाच्छंसी आणि एक अच्छावाक ।
सात दिशा - पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, ध्रुवा, उर्ध्वा, आणि केंन्द्र । आकाशस्थ सात सप्तर्षींची नावे याप्रमाणे : मरीचि, वशिष्ठ, अड्रीरस, अत्रि, पुलस्त्य, पुलह आणि ऋतु ।
ऋग्वेद ९/११४/३ मध्ये सात वस्तुंची गणना याप्रकारे केली आहे. सात दिशा, सात होता, ऋत्विज, सात सूर्यकिरणे ।
यजुर्वेद २६/१ मध्ये सप्त संसदे याप्रकारे सांगितली आहेत.
भावार्थ - ब्रह्मांडात स्थित सर्व दिशा, विदिशा आदी पदार्थ शरीरात विद्यमान मन, बुद्धी आणि यज्ञ्पत असणारे सर्व ऋत्विज त्या जगदीश्वराचा महिमा सांगत आहेत. ।।२।।
विशेष -
अग्नि, वायू, अन्तरिक्ष, आदित्य, घौ, आप: आणि करूण । आठवी संसद भूतसाधती पृथ्वी आहे.