Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 736
ऋषिः - वसिष्ठो मैत्रावरुणिः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम -
1
तं꣢ ते꣣ य꣢वं꣣ य꣢था꣣ गो꣡भिः꣢ स्वा꣣दु꣡म꣢कर्म श्री꣣ण꣡न्तः꣢ । इ꣡न्द्र꣢ त्वा꣣स्मिं꣡त्स꣢ध꣣मा꣡दे꣢ ॥७३६॥
स्वर सहित पद पाठतम् । ते꣣ । य꣡व꣢꣯म् । य꣡था꣢꣯ । गो꣡भिः꣢꣯ । स्वा꣣दु꣢म् । अ꣣कर्म । श्रीण꣡न्तः꣢ । इ꣡न्द्र꣢꣯ । त्वा꣣ । अस्मि꣣न् । स꣣धमा꣡दे꣢ । स꣣ध । मा꣡दे꣢꣯ ॥७३६॥
स्वर रहित मन्त्र
तं ते यवं यथा गोभिः स्वादुमकर्म श्रीणन्तः । इन्द्र त्वास्मिंत्सधमादे ॥७३६॥
स्वर रहित पद पाठ
तम् । ते । यवम् । यथा । गोभिः । स्वादुम् । अकर्म । श्रीणन्तः । इन्द्र । त्वा । अस्मिन् । सधमादे । सध । मादे ॥७३६॥
सामवेद - मन्त्र संख्या : 736
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » ; सूक्त » 8; मन्त्र » 3
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 2; सूक्त » 4; मन्त्र » 3
Acknowledgment
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » ; सूक्त » 8; मन्त्र » 3
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 2; सूक्त » 4; मन्त्र » 3
Acknowledgment
विषय - पुन्हा तोच विषय पुढच्या मंत्रात आहे.
शब्दार्थ -
गुरू म्हणतात हे शिष्या, (तम्) त्या ब्रह्मरूप सोमरसाला आम्ही (गोभि:) स्वत:च्या मधुर वाणी वा उपदेशाद्वारे (श्रीणन्त:) परिमवन वा घट्ट केले आहे आणि त्या रसाला (स्वादुम्) स्वादु अथवा रूचकर (अकर्म) बनविले आहे. (यथा) ज्याप्रमाणे (यवम्) धनधान्याच्या रसाला (गाभि:) गायीच्या दुधाने मधुर व स्वादिष्ट करतात. हे (इन्द्र) प्रिय शिष्य (अस्मिन्) या (सधमादे) ज्यात सर्व गुरू शिष्य येथे मिळून ब्रह्मज्ञान पीत असतात, अशा या विद्यारूप यज्ञामध्ये आम्ही गुरूजन (त्वा) हे शिष्य, तुला ब्रह्मज्ञानाचे सेवन करण्यासाठी तुला हा ज्ञान रस पिण्यासाठी आमंत्रित करीत आहोत. ।।३।।
भावार्थ - गुरुजनांनी शिष्यांना लौकिक व्यवहार ज्ञानासोबतच गूढ ब्रह्मज्ञानही शिकवावे द्यावे, पण ते सरस पद्धतीने द्यावे. ज्यामुळे ते गूढ ब्रह्मज्ञान शिष्यांसाठी सोपे, सरळ आणि सचिवर्धक होईल, अशा रीतीने शिकवावे ।।३।। या खंडात गुरु-शिष्य परमात्मा, जीवात्मा आणि ब्रह्मज्ञानाचे विषय वर्णित आहेत. त्यामुळे या खंडाशी पूर्व खंडानी संमती आहे, असे जाणावे.
विशेष -
या मंत्रात श्लिष्टोपमा अलंकार आहे. ।।३।।