Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 735
ऋषिः - वसिष्ठो मैत्रावरुणिः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम -
1
नृ꣡भि꣢र्धौ꣣तः꣢ सु꣣तो꣢꣫ अश्नै꣣र꣢व्या꣣ वा꣢रैः꣣ प꣡रि꣢पूतः । अ꣢श्वो꣣ न꣢ नि꣣क्तो꣢ न꣣दी꣡षु꣢ ॥७३५॥
स्वर सहित पद पाठनृ꣡भिः꣢꣯ । धौ꣣तः꣢ । सु꣣तः꣢ । अ꣡श्नैः꣢꣯ । अ꣡व्याः꣢꣯ । वा꣡रैः꣢꣯ । प꣡रि꣢꣯पूतः । प꣡रि꣢꣯ । पू꣣तः । अ꣡श्वः꣢꣯ । न । नि꣣क्तः꣢ । न꣣दी꣡षु꣢ ॥७३५॥
स्वर रहित मन्त्र
नृभिर्धौतः सुतो अश्नैरव्या वारैः परिपूतः । अश्वो न निक्तो नदीषु ॥७३५॥
स्वर रहित पद पाठ
नृभिः । धौतः । सुतः । अश्नैः । अव्याः । वारैः । परिपूतः । परि । पूतः । अश्वः । न । निक्तः । नदीषु ॥७३५॥
सामवेद - मन्त्र संख्या : 735
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » ; सूक्त » 8; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 2; सूक्त » 4; मन्त्र » 2
Acknowledgment
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » ; सूक्त » 8; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 2; सूक्त » 4; मन्त्र » 2
Acknowledgment
विषय - पुढच्या मंत्रात ब्रह्मविज्ञान रस कसा आहे हे सांगितले आहे.
शब्दार्थ -
हे शिष्या, मी तुला जो ब्रह्मज्ञानरूप रस देत आहे, तो (वृभि:) उन्नत करणाऱ्या श्रेष्ठ विचारांद्वारे (धौता) धुतला गेला आहे. पाषाणासारख्या कठोर व्रत आचरणाने (सुत:) पिळून काढलेला आहे. (अव्या:) रक्षण करणाऱ्या बुद्धीद्वारे (वारै: दोष निवारक तर्कांद्वारे (परिपूत:) पवित्र केला गेला आहे. (म्हणजे या ब्रह्मज्ञानाचे मी चिंतन मनन केले आहे. याच्या प्राप्तीसाठी कठोर व्रत केले आहे आणि बुद्धी व तर्काच्या आधारे निश्चित केले आहे. एवढे केल्यानंतर मी हे ब्रह्मज्ञान तुला देत आहे. आता हे ज्ञान केवढे पवित्र आहे? उपमा देताना सांगतात की (नरिषु) नदीच्या पाण्यात (निक्त:) धुतलेल्या (अश्वन) घोड्याच्या अंगाप्रमाणे हे ज्ञान आता शुद्ध झालेले आहे. ।।२।।
भावार्थ - ऋत्विज लोक ज्याप्रमाणे सोमलतेला पवित्र, स्वच्छ जलाने धुवून घेतात, त्या जलांना पाटा वरवंटा साधनांनी कुटून घेतात. नंतर पिळून त्याचा रस काढतात पुन्हा दशापवित्र नाम चाळणीने तो रस गाळून घेतात आणि मग अशा शुद्ध सोमरसाचे यज्ञ करतात. त्याप्रमाणे गुरूजन ब्रह्मविद्यारूप लतेला सद्विचारांने धुऊन, कठोर व्रत आचरणाने ज्ञान कुटून घेतात. त्यास बुद्धी तर्कांद्वारे गाळून घेतात आणि वेदवाणीच्या धारांनी त्या ज्ञानास पवित्र करून शिष्याच्या आत्मरूप अग्नीमध्ये आहुत करतात. अशाप्रकारे हा ब्रह्म ज्ञानरूप यज्ञ संपन्न होत असतो. ।।२।।
विशेष -
या मंत्रात श्लिष्टोपमा अलंकार आहे. या मंत्रात या श्लेषाद्वारे दोन अर्थ निघत असल्यामुळे दुसरा सोम औषधीविषयक अर्थही केला पाहिजे. यामुळे ब्रह्मविज्ञान सोमरसाप्रमाणे आहे हा उपमानोपमेय भाव देखील प्रकट होईल. ।।२।।