Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 743
ऋषिः - शुनःशेप आजीगर्तिः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम -
1
यो꣡गे꣣योगे त꣣व꣡स्त꣢रं꣣ वा꣡जे꣢वाजे हवामहे । स꣡खा꣢य꣣ इ꣡न्द्र꣢मू꣣त꣡ये꣢ ॥७४३॥
स्वर सहित पद पाठयो꣡गेयो꣢꣯गे । यो꣡गे꣢꣯ । यो꣣गे । तव꣡स्त꣢रम् । वा꣡जे꣢꣯वाजे । वा꣡जे꣢꣯ । वा꣣जे । हवामहे । स꣡खा꣢꣯यः । स । खा꣣यः । इ꣡न्द्र꣢꣯म् । ऊ꣣त꣡ये꣢ ॥७४३॥
स्वर रहित मन्त्र
योगेयोगे तवस्तरं वाजेवाजे हवामहे । सखाय इन्द्रमूतये ॥७४३॥
स्वर रहित पद पाठ
योगेयोगे । योगे । योगे । तवस्तरम् । वाजेवाजे । वाजे । वाजे । हवामहे । सखायः । स । खायः । इन्द्रम् । ऊतये ॥७४३॥
सामवेद - मन्त्र संख्या : 743
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » ; सूक्त » 11; मन्त्र » 1
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 3; सूक्त » 3; मन्त्र » 1
Acknowledgment
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » ; सूक्त » 11; मन्त्र » 1
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 3; सूक्त » 3; मन्त्र » 1
Acknowledgment
विषय - प्रथम ऋचेची पूर्वार्चिक भागात क्र. १६३ वर योग आणि सेनाध्यक्ष विषयी व्याख्या केली आहे. इथे परमेश्वर, आचार्य आणि विद्युत या सर्वांना आवाहन केले आहे.
शब्दार्थ -
प्रथम अर्थ (परमेश्वरपक्षी) (सखाय:) आम्ही सहकारी उपासक गण (योगेयोगे) प्रत्येक नव्या उपलब्धीकरीता आणि (वाजेवाजे) प्रत्येक प्रकारची शक्ती संपादन करण्याकरीता (ऊतये) त्यात उपासना क्रियेत (तवस्तरम्) अतिशय बलवान अशा (इन्द्रम) विघ्ननाशक व पर ऐश्वर्यशाली परमेश्वराचे (हवामये) आवाहन करीत आहोत. (मानसिक बल मिळण्यासाठी परमेश्वराची उपासना करीत आहोत.)
द्वितीय अर्थ : (आचार्यपक्षी) - (सखाय:) एकमेकांशी मित्रत्वाच्या नात्याने बांधलेले आम्ही सहाध्यायी जन (योगेयोगे) प्रत्येक विद्येच्या प्राप्तीकरीता आणि (वाजेवाजे) अविद्या, काम, क्रोध, लोभ, मोह आदी दुर्गुणांच्या विरूद्ध आम्ही करीत असलेल्या संग्रामाध्ये (उतये) रक्षणासाठी (तवस्तरम्) विद्या बल, योग बल यांमध्ये सुसमृद्ध असलेल्या (इन्द्रम) आचार्य प्रवराला आम्ही (हवामहे) बोलावत आहोत (त्यांनी आमचे रक्षण करावे दुगुणांशी लढण्यासाठी उत्साह द्यावा.
तृतीय अर्थ : (शिल्पविद्येविषयी) यंत्रांमध्ये विजेचा उपयोग घेणारा कोणी शिल्पी (कारागीर वा अभियंता) म्हणत आहे (सरवाया:) आम्ही यंत्रालयात काम करणारे सर्व सह कर्मचारी (योगेयोगे) विविध पदार्थांमध्ये विविध पदार्थ मिसळून नवीन वस्तू निर्माण करण्याकरीता आणि (वाजेवाजे) प्रत्येक शक्ती व ऊर्जेने साध्य होणाऱ्या कार्यात (ऊतये) शिल्पविद्येचा उपयोग करण्याकरीता (ववस्तरम्) अतिशय बलवान शक्ती ऊर्जासंपन्न अशा (इन्द्रम्) त्या विद्युत रूप अग्नीला (हवामहे) आवाहन करतो म्हणजे विविध यंत्रात त्या विद्युदग्नीचा उपयोग करतो. ।।१।।
भावार्थ - ज्याप्रमाणे आत्मिक, शारीरिक बळ प्राप्त करण्यासाठी परमेश्वराची उपासना केली पाहिजे तद्वत सर्व विद्या, कला शिकण्यासाठी अणि अंत:करणात घडणाऱ्या देवासुर संग्रामात विजय प्राप्त करण्यासाठी सदाचारी सद्गुरूंचा स्वीकार केला पाहिजे. कारखाने, उद्योगशाळा आदी स्थानात जीवनोपयोगी वस्तुंच्या उत्पादनासाठी युद्धादी प्रसांत शस्त्र अस्त्रांदींचा प्रयोग करण्यासाठी विद्युतशक्तीचा उपयोग केला पाहिजे.
विशेष -
या मंत्रात श्लेष अलंकार आहे. ।।१।।