Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 744
ऋषिः - शुनःशेप आजीगर्तिः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम -
1
अ꣡नु꣢ प्र꣣त्न꣡स्यौक꣢꣯सो हु꣣वे꣡ तु꣢विप्र꣣तिं꣡ नर꣢꣯म् । यं꣢ ते꣣ पू꣡र्वं꣢ पि꣣ता꣢ हु꣣वे꣢ ॥७४४॥
स्वर सहित पद पाठअ꣣नु꣢꣯ । प्र꣣त्न꣡स्य꣢ । ओ꣡क꣢꣯सः । हु꣣वे꣢ । तु꣣विप्रति꣢म् । तु꣣वि । प्रति꣢म् । न꣡र꣢꣯म् । यम् । ते꣣ । पू꣡र्व꣢꣯म् । पि꣣ता꣢ । हु꣣वे꣢ ॥७४४॥
स्वर रहित मन्त्र
अनु प्रत्नस्यौकसो हुवे तुविप्रतिं नरम् । यं ते पूर्वं पिता हुवे ॥७४४॥
स्वर रहित पद पाठ
अनु । प्रत्नस्य । ओकसः । हुवे । तुविप्रतिम् । तुवि । प्रतिम् । नरम् । यम् । ते । पूर्वम् । पिता । हुवे ॥७४४॥
सामवेद - मन्त्र संख्या : 744
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » ; सूक्त » 11; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 3; सूक्त » 3; मन्त्र » 2
Acknowledgment
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » ; सूक्त » 11; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 3; सूक्त » 3; मन्त्र » 2
Acknowledgment
विषय - पुढच्या मंत्रात ईश स्तुती आणि गुरु शिष्याविषयी काही सांगितले आहे.
शब्दार्थ -
प्रथम अर्थ (परमेश्वरपक्षी) मी, एक उपासक, (प्रलस्य) प्रदीर्घ काळापासून निर्मित असलेल्या या (ओकस:) ब्रह्माण्यरूप घराच्या (नरम्) नेता असलेल्या आणि (सुविप्रतिम्) अनेक पदार्थांचा निर्माता असलेल्या इन्द्रनाम जगदीश्वराला (अनुहुव) मला अनुकूल होण्यासाठी हाक मारत आहे. (यं ते) ज्या तुज जगदीश्वराला (पूर्वम्) पूर्वी (पिता) माझा पिता (हुवे) हाक मारत होता (जसे माझा पिता संकटकाळी जत्मा जगत्पित्याला हाक मारत होता, मीही त्याप्रमाणे त्या परमेश्वराला साह्यासाठी बोलवावे. ।।२।।
द्वितीय अर्थ : (आचार्य पक्षी) हे बालक, मी तुझा काका, (मामा, वा आजोबा) (तू विप्रतिम्) अनेक विद्यांची प्रतिमूर्ती असलेल्या (प्रत्नस्य प्राचीन (ओकस:) विद्या गृहाचा (नरम्) नेता असलेल्या आचार्याला (अनु) तुझ्यापर कृपा करणारे करून तुला अध्यापन व सदाचार शिक्षण देण्यासाठी (हुवे) आवाहन करीत आहे. ज्याप्रमाणे (यम्) ज्या आचार्याला (पूर्वम्) पूर्वी (ते) (पिता) तुझा पिता अन्य बालकांना अध्यापन करण्यासाठी बोलावित होता, मीही त्याप्रमाणे इतर बालकांना या आचार्यांकडे येण्यासाठी प्रवृत्त करीत आहे. ।।२।।
भावार्थ - सर्व लोकांनी परमेश्वराची उपासना केली पाहिजे. तसेच बालकांचे संरक्षक असलेल्या पिता, काका आदी पालकांचे कर्तव्य आहे की त्यांनी बालकाला विद्याध्ययनासाठी सुयोग्य गुरूकडे पाठवावे. की ज्यामुळे बालक विद्यावान होऊन सुजाण नागरिक होतील. ।।२।।
इस भाष्य को एडिट करें