Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 80
ऋषिः - पायुर्भारद्वाजः देवता - अग्निः छन्दः - त्रिष्टुप् स्वरः - धैवतः काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
1

स꣣ना꣡द꣢ग्ने मृणसि यातु꣣धा꣢ना꣣न्न꣢ त्वा꣣ र꣡क्षा꣢ꣳसि꣣ पृ꣡त꣢नासु जिग्युः । अ꣡नु꣢ दह स꣣ह꣡मू꣢रान्क꣣या꣢दो꣣ मा꣡ ते꣢ हे꣣त्या꣡ मु꣢क्षत꣣ दै꣡व्या꣢याः ॥८०॥

स्वर सहित पद पाठ

स꣣ना꣢त् । अ꣣ग्ने । मृणसि । यातुधा꣡ना꣢न् । या꣣तु । धा꣡ना꣢꣯न् । न । त्वा꣣ । र꣡क्षाँ꣢꣯सि । पृ꣡त꣢꣯नासु । जि꣣ग्युः । अ꣡नु꣢꣯ । द꣣ह । सह꣡मू꣢रान् । स꣣ह꣢ । मू꣣रान् । क꣣या꣡दः꣢ । क꣣य । अ꣡दः꣢꣯ । मा । ते꣣ । हेत्याः꣢ । मु꣣क्षत । दै꣡व्या꣢꣯याः ॥८०॥


स्वर रहित मन्त्र

सनादग्ने मृणसि यातुधानान्न त्वा रक्षाꣳसि पृतनासु जिग्युः । अनु दह सहमूरान्कयादो मा ते हेत्या मुक्षत दैव्यायाः ॥८०॥


स्वर रहित पद पाठ

सनात् । अग्ने । मृणसि । यातुधानान् । यातु । धानान् । न । त्वा । रक्षाँसि । पृतनासु । जिग्युः । अनु । दह । सहमूरान् । सह । मूरान् । कयादः । कय । अदः । मा । ते । हेत्याः । मुक्षत । दैव्यायाः ॥८०॥

सामवेद - मन्त्र संख्या : 80
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 8;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे (अग्ने) अग्रणी परमात्मन/अथवा हे शत्रुसंहारक राजा, तुम्ही (रागात) चिरकाळापासून (यातुधानान्) पीडा आमच्यातीलच पीडा नाश विनाश, हिंसा, उपद्रव आदी दोषांना / दुष्यांना (मृणसि) नष्ट करीत आले आहात. (रक्षसि) काम, क्रोध, लोभ आदी / डाकु, लुटारू, चोर आदी राक्षस (त्वा) तुम्हाला (पृतवासु) आंतरिक संग्रामात साह्य देवासुर-संग्रामात (न जिग्यु:) जिंकू शकत नाहीत. तुम्ही (कयाद:) सुखनाशक दुर्विचारांना / दुष्य जनांना (सहमुरान्) समूळ (अनुदह) एक एक करून भस्म करून टाका. (ते) ते दुष्टभाव / दुष्टजन (ते) तुमच्या (दैव्याया:) विद्वज्जन हितकारी (हेव्या:) दंड शक्तिरूप वज्राच्या प्रहारापासून / तीव्र शस्त्रांपासून (मा मुक्षत) सुटू शकणार नाहीत, असे करा. ।।८।।

भावार्थ - हे धर्मपालक, विधर्मविध्वंसक, सद्गुणप्रसारक, जगदीश्वर अथवा हे राजन् आपले प्रशंसक आम्ही उपासक/प्रजानन ज्या ज्या वेळी मानसिक/बाह्य देवासुर संग्रामात काम, क्रोध लोभ, मोह आदींपासून / ठक, पेंढारी, हिंसक, चोर, मद्यपी, व्यभिचारी, भ्रष्टाचारी आदी दुष्टजनांद्वारे पीडित वा त्रस्त होऊ वा होतो. त्या त्यावेळी आपण आमचे सहाय्यक होऊन त्या दोषांना समूळ नष्ट करा आणि आमचे रक्षण करा. त्या दुर्जनांचे जर हृदय परिवर्तन होणे शक्य असेल तर तयंचे राक्षसत्व नष्ट करून त्यांना शुद्ध अंत:करणवान करा. की ज्यायोगे जगात सज्जनांची वृद्धी होऊन सर्वत्र सुख-सौहार्दाची धारा प्रवाहित होईल. ।।८।। प्रथम प्रपाठकातील द्वितीय अर्धाची तृतीय दशति समाप्त

इस भाष्य को एडिट करें
Top