Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 81
ऋषिः - गय आत्रेय
देवता - अग्निः
छन्दः - अनुष्टुप्
स्वरः - गान्धारः
काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
1
अ꣢ग्न꣣ ओ꣡जि꣢ष्ठ꣣मा꣡ भ꣢र द्यु꣣म्न꣢म꣣स्म꣡भ्य꣢मध्रिगो । प्र꣡ नो꣢ रा꣣ये꣡ पनी꣢꣯यसे꣣ र꣢त्सि꣣ वा꣡जा꣢य꣣ प꣡न्था꣢म् ॥८१॥
स्वर सहित पद पाठअ꣡ग्ने꣢꣯ । ओ꣡जि꣢꣯ष्ठम् । आ । भ꣣र । द्युम्न꣢म् । अ꣣स्म꣡भ्य꣢म् । अ꣣ध्रिगो । अध्रि । गो । प्र꣢ । नः꣣ । राये꣢ । प꣡नी꣢꣯यसे । र꣡त्सि꣢꣯ । वा꣡जा꣢꣯य । प꣡न्था꣢꣯म् ॥८१॥
स्वर रहित मन्त्र
अग्न ओजिष्ठमा भर द्युम्नमस्मभ्यमध्रिगो । प्र नो राये पनीयसे रत्सि वाजाय पन्थाम् ॥८१॥
स्वर रहित पद पाठ
अग्ने । ओजिष्ठम् । आ । भर । द्युम्नम् । अस्मभ्यम् । अध्रिगो । अध्रि । गो । प्र । नः । राये । पनीयसे । रत्सि । वाजाय । पन्थाम् ॥८१॥
सामवेद - मन्त्र संख्या : 81
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 9;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 9;
Acknowledgment
विषय - पुढील मंत्रात अग्नि नावाने परमेश्वर, नृपती आणि आचार्य, या तिघांची प्रार्थना केली आहे. -
शब्दार्थ -
(अधिग्रे) अबाध गती असणाऱ्या आणि अविरूद्ध तेजोमय (ज्यांची प्रगती कोणी राखू शकत नाही आणि ज्यांच्या तेजासमोर सर्वांचे तेज निस्तेज ठरते, असे) हे अग्रनेता परमेश्वर/हे राजन्/हे आचार्य आपण (अस्मभ्यम्) आम्हास (ओजिष्ठम्) अत्यंत ओजमुक्त, अतिप्रबळ असे (द्युम्नम्) यश, तेज व अन्न (आ भर) प्रदान करा. (न:) आम्हाकरिता (पनीयसे) अत्यंत प्रशंसनीय अशा (राये) ऐहिक आणि पारमार्थिक धन प्राप्तीसाठी आणि (वाजाय) शारीरिक व आध्यात्मिक शक्ती प्राप्तीसाठी (पन्थाम्) मार्ग (प्ररत्सि) प्रशस्त करा (आम्ही विनंती करतो.) ।।१।।
भावार्थ - परमेश्वराने, राजाने आणि विद्वानाने आम्हा (उपासक/प्रजाजन/शिष्य) यांना अशा सन्मार्गावर जाण्यासाठी उपदेश करावा की जे मार्ग अनुसरण्याने आम्हाला जगद्व्यापिनी कीर्ती मिळे, अभतिक्रमणीय श्लाघ्य दीप्ती प्राप्त होईल. समस्त भोज्य पदार्थ, तसेच स्वर्ण, रौप्य, हीरक, भौक्तिक, मणी, गौ, पुत्र, पौत्र रथ, भवन, शस्त्रास्त्र, विद्या, धर्म, आरोग्य, चक्रवर्ती राज्य, मोक्ष आदी रूपातील विविध धन प्राप्त होईल. अशाप्रकारे आम्ही शारीरिक व आत्मिक शक्ती आपल्या पुरुषार्थाने तसेच त्यांच्या (परमेश्वर, राजा व आचार्य यांच्या) कृपेने प्राप्त करू शकू. ।।१।।
विशेष -
या मंत्रात अर्थश्लेष अलंकार आहे. ।।१।।