Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 92
ऋषिः - वामदेव: कश्यप:, असितो देवलो वा देवता - अङ्गिराः छन्दः - अनुष्टुप् स्वरः - गान्धारः काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
1

इ꣣त꣢ ए꣣त꣢ उ꣣दा꣡रु꣢हन्दि꣣वः꣢ पृ꣣ष्ठा꣡न्या रु꣢꣯हन् । प्र꣢ भू꣣र्ज꣢यो꣣ य꣡था꣢ प꣣थो꣡द्यामङ्गि꣢꣯रसो ययुः ॥९२

स्वर सहित पद पाठ

इ꣣तः꣢ । ए꣣ते꣢ । उ꣣दा꣢रु꣢हन् । उ꣣त् । आ꣡रु꣢꣯हन् । दि꣣वः꣢ । पृ꣣ष्ठा꣡नि꣢ । आ । अ꣣रुहन् । प्र꣢ । भूः꣣ । ज꣡यः꣢꣯ । य꣡था꣢꣯ । प꣣था꣢ । उत् । द्याम् । अ꣡ङ्गि꣢꣯रसः । य꣣युः ॥९२॥


स्वर रहित मन्त्र

इत एत उदारुहन्दिवः पृष्ठान्या रुहन् । प्र भूर्जयो यथा पथोद्यामङ्गिरसो ययुः ॥९२


स्वर रहित पद पाठ

इतः । एते । उदारुहन् । उत् । आरुहन् । दिवः । पृष्ठानि । आ । अरुहन् । प्र । भूः । जयः । यथा । पथा । उत् । द्याम् । अङ्गिरसः । ययुः ॥९२॥

सामवेद - मन्त्र संख्या : 92
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 5; मन्त्र » 2
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 10;
Acknowledgment

शब्दार्थ -
(एत) ये (अड्ग्ग्गिरसः) अग्निस्वरूप, निखाऱ्याप्रमाणे तेजस्वी, अंगांचे रसभूत आणि प्राणप्रिय परमेश्वराचे ध्यान करणारे तपस्वी योगीजन आहे, ते (इतः) या अन्नमयकोशापासून वा मूलाधार चक्रापासून (उतू आरुहन्) ऊर्ध्वारोहण करतात. ते क्रमशः (दिवः पृष्ठानि) अंतरिक्षाच्या सोपानावर म्हणजे शरीराच्या मध्यवर्ती कोशांवर अथवा मध्यवर्ती चक्रांवर (आरुहन्) चढून उंच जातात आणि पुन्हा (घाम्) घुलोकावर अर्थात आनन्दमय रूप सर्वोच्च कोशावर वा सहस्त्राररूप सर्वोच्च चक्रावर (उद ययुः) पोचतात. हे मित्र, तूदेखील त्यांच्याप्रमाणे (प्र. भूः) उत्कृष्ट वा समर्थ हो. (यथा) ज्यायोगे तू (पक्षा) सन्मार्गावर चालत (जयः) विजय प्राप्त करशील. ।। २।।

भावार्थ - मानव- शरीरामध्ये अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनन्दमय हे पाच कोश असून मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपुर, अनाहत, विशुद्ध, ललित, आज्ञा, सहस्त्रार हे आठ चक्र आहेत. योगाभ्यासी लोक स्थूल कोशापासून सूक्ष्म- सूक्ष्मतर कोशांकडे आरोहण करीत करीत सूक्ष्मतम कोश म्हणजे आनन्दमय कोशास प्राप्त करून परमानन्द ब्रह्मानंदाचा अनुभव घेतात. तसेच निम्न चक्र मूलाधारपासून प्राणांचे ऊर्ध्व संक्रमण करीत करीत अन्ततः सहस्त्रार चक्रामध्ये आपले प्राण केंद्रित करून मस्तिष्क व हृदयात परमात्म ज्योतीच्या अविरत धारा प्रवाहित करून घेतात. हे मित्र, तूही तसेच सामर्थ्य संचित कर की ज्यामुळे उत्तरोत्तर अधिकाहून अधिक उत्कृष्ट मार्गावर चालत तुम्हाला विजय वा सर्व कार्यात यश प्राप्त करता येईल. ।। २।। (टीप - ‘द्यूलोक’ ‘अंतरिक्ष’ या शब्दांतून असाही अर्थ ध्वनित होतो की योगी आपल्या योगविद्यांद्वारे केवळ पृथ्वीवरच नव्हे, तर आकाश, द्योलोक आदी अतिदूरवर्ती लोकापर्यंत प्रवास व विहार करू शकतात. हा संकेतितार्थ मराठी अनुवादकाचा आहे.)

इस भाष्य को एडिट करें
Top