Loading...
यजुर्वेद अध्याय - 40

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 40/ मन्त्र 8
    ऋषिः - दीर्घतमा ऋषिः देवता - आत्मा देवता छन्दः - स्वराड्जगती स्वरः - निषादः
    0

    स पर्य॑गाच्छु॒क्रम॑का॒यम॑व्र॒णम॑स्नावि॒रꣳ शु॒द्धमपा॑पविद्धम्।क॒विर्म॑नी॒षी प॑रि॒भूः स्व॑य॒म्भूर्या॑थातथ्य॒तोऽर्था॒न् व्यदधाच्छाश्व॒तीभ्यः॒ समा॑भ्यः॥८॥

    स्वर सहित पद पाठ

    सः। परि॑। अ॒गा॒त्। शु॒क्रम्। अ॒का॒यम्। अ॒व्र॒णम्। अ॒स्ना॒वि॒रम्। शु॒द्धम्। अपा॑पविद्ध॒मित्यपा॑पऽविद्धम् ॥ क॒विः। म॒नी॒षी। प॒रि॒भूरिति॑ परि॒ऽभूः। स्व॒यम्भूरिति॑ स्वय॒म्ऽभूः। या॒था॒त॒थ्य॒त इति॑ याथाऽत॒थ्य॒तः। अर्था॑न्। वि। अ॒द॒धा॒त्। शा॒श्व॒तीभ्यः॑। समा॑भ्यः ॥८ ॥


    स्वर रहित मन्त्र

    स पर्यगाच्छुक्रमकायमव्रणमस्नाविरँ शुद्धमपापविद्धम् । कविर्मनीषी परिभूः स्वयम्भूर्याथातथ्यतोर्थान्व्यदधाच्छाश्वतीभ्यः समाभ्यः ॥


    स्वर रहित पद पाठ

    सः। परि। अगात्। शुक्रम्। अकायम्। अव्रणम्। अस्नाविरम्। शुद्धम्। अपापविद्धमित्यपापऽविद्धम्॥ कविः। मनीषी। परिभूरिति परिऽभूः। स्वयम्भूरिति स्वयम्ऽभूः। याथातथ्यत इति याथाऽतथ्यतः। अर्थान्। वि। अदधात्। शाश्वतीभ्यः। समाभ्यः॥८॥

    यजुर्वेद - अध्याय » 40; मन्त्र » 8
    Acknowledgment

    व्याख्यान -
    भाषार्थ : असाच परमेश्वराने आपल्या व आपण बनविलेल्या वेदाचा नित्य व प्रमाण असण्याचा उपदेश केलेला आहे. (स पर्यगात) हा मंत्र ईश्वर व वेदावर प्रकाश टाकतो. जो परमेश्वर सर्वव्यापक इत्यादी विशेषणांनी युक्त आहे, तो जगात परिपूर्ण होत असून, त्याची व्याप्ती प्रत्येक परमाणूमध्ये आहे. तो ब्रह्म (शुक्रं) सर्व जग निर्माण करणारा व अनंत विद्या इत्यादी बलाने युक्त आहे, (अकाय) जो स्थूल, सूक्ष्मा व कारण या तीन शरीरांच्या संयोगाविरहित आहे. अर्थात, तो कधी जन्म घेत नाही. (अव्रणं) ज्याच्यामध्ये एक परमाणूही छिद्र करू शकत नाही. त्यामुळेच तो संपूर्णपणे छेदरहित आहे, (अस्नाविरं) तो नाडीबंधनापासून वेगळा आहे. जसे वायू व रुधिर नाड्यांमध्ये बंधित असतात तसा परमेश्वर कोणत्याही बंधनात नसतो. (शुद्धं) जो अविद्या, अज्ञान इत्यादी क्लेशांपासून दूर आहे. (अपापविद्धम्) त्यामुळे ईश्वर पापयुक्त किंवा पाप करणारा नसतो. कारण तो स्वभावानेच धर्मात्मा आहे, (कवि:) जो सर्वांना जाणणारा आहे (मनीषी) जो सर्वांचा अंतर्यामी आहे. भूत, भविष्य, वर्तमान या तीन काळांना यथावत जाणणारा आहे. (परिभू:) जो सर्वांवर विराजमान होत आहे. (स्वयंभू:) तोच सर्वांचे कारण आहे, स्वत: कधीच उत्पन्न होत नाही त्याचे कारणही कोणी नाही. अनादि व अनंत आहे. त्यामुळे तो सर्वांचा माता-पिता आहे. आपल्या सामर्थ्याने सदैव वर्तमान असतो. या अनेक लक्षणांनी युक्त सच्चिदानंदस्वरूप परमेश्वर आहे. (शाश्वतीभ्य:) त्याने सृष्टीच्या आरंभी आपल्या प्रजेला, जी त्याच्या सामर्थ्यामध्ये सदैव वर्तमान असते. त्यांच्या सुखासाठी (अर्थान् व्यदधात्) सत्य अर्थांचा उपदेश केलेला आहे. त्याच प्रकारे परमेश्वर जेव्हा जेव्हा सृष्टीची रचना करतो, तेव्हा तेव्हा प्रजेच्या हितासाठी सृष्टीच्या आरंभी सर्व विद्यांनी युक्त वेदांचा उपदेश करतो व जेव्हा जेव्हा सृष्टीचा प्रलय होतो तेव्हा तेव्हा वेद सदैव त्याच्या ज्ञानात असतात. त्यामुळे त्यांना सदैव नित्य मानले पाहिजे.

    इस भाष्य को एडिट करें
    Top