ऋग्वेद - मण्डल 7/ सूक्त 70/ मन्त्र 1
आ वि॑श्ववाराश्विना गतं न॒: प्र तत्स्थान॑मवाचि वां पृथि॒व्याम् । अश्वो॒ न वा॒जी शु॒नपृ॑ष्ठो अस्था॒दा यत्से॒दथु॑र्ध्रु॒वसे॒ न योनि॑म् ॥
स्वर सहित पद पाठआ । वि॒श्व॒ऽवा॒रा॒ । अ॒श्वि॒ना॒ । ग॒त॒म् । नः॒ । प्र । तत् । स्थान॑म् । अ॒वा॒चि॒ । वा॒म् । पृ॒थि॒व्याम् । अश्वः॑ । न । वा॒जी । शु॒नऽपृ॑ष्ठः । अ॒स्था॒त् । आ । यत् । से॒दथुः॑ । ध्रु॒वसे॑ । न । योनि॑म् ॥
स्वर रहित मन्त्र
आ विश्ववाराश्विना गतं न: प्र तत्स्थानमवाचि वां पृथिव्याम् । अश्वो न वाजी शुनपृष्ठो अस्थादा यत्सेदथुर्ध्रुवसे न योनिम् ॥
स्वर रहित पद पाठआ । विश्वऽवारा । अश्विना । गतम् । नः । प्र । तत् । स्थानम् । अवाचि । वाम् । पृथिव्याम् । अश्वः । न । वाजी । शुनऽपृष्ठः । अस्थात् । आ । यत् । सेदथुः । ध्रुवसे । न । योनिम् ॥ ७.७०.१
ऋग्वेद - मण्डल » 7; सूक्त » 70; मन्त्र » 1
अष्टक » 5; अध्याय » 5; वर्ग » 17; मन्त्र » 1
अष्टक » 5; अध्याय » 5; वर्ग » 17; मन्त्र » 1
भावार्थ - परमात्मा उपदेश करतो, की हे याज्ञिकांनो! तुम्ही आपल्या यज्ञात ज्ञानी व विज्ञानी दोन्ही प्रकारच्या विद्वानांना सत्कारपूर्वक बोलावून यज्ञवेदीवर बसवा व त्यांच्याकडून नाना प्रकारचा सदुपदेश ग्रहण करा. कारण ही वेदी बसण्यासाठी नाही, तर यज्ञकर्माच्या दृढतेमध्ये स्थिर करविणारी आहे.
टिप्पणी -
तात्पर्य हे, की ज्या यज्ञात ज्ञानी व विज्ञानी दोन्ही प्रकारच्या विद्वानांना आमंत्रित करून सत्कार केला जातो ते यज्ञ सुशोभित व कृतकार्य होतात. अध्यात्मविद्या जाणणारे ‘ज्ञानी’ व कलाकौशल्य विद्या जाणणारे ‘विज्ञानी’ म्हणविले जातात किंवा पदार्थांच्या ज्ञात्याला ‘ज्ञानी’ व अनुष्ठात्याला ‘विज्ञानी’ म्हणतात. ते विद्वान पुरुषार्थी व अश्वाप्रमाणे शीघ्रगामी केवळ तुमच्या स्थानांनाच सुशोभित करणारे नसावे, तर तुम्हाला दृढतारूपी व्रतात स्थिर करणारे असावेत. वरील दोन्ही प्रकारच्या विज्ञानांनीच यज्ञ सफल होतो, अन्यथा नाही. ॥१॥