ऋग्वेद - मण्डल 7/ सूक्त 70/ मन्त्र 3
यानि॒ स्थाना॑न्यश्विना द॒धाथे॑ दि॒वो य॒ह्वीष्वोष॑धीषु वि॒क्षु । नि पर्व॑तस्य मू॒र्धनि॒ सद॒न्तेषं॒ जना॑य दा॒शुषे॒ वह॑न्ता ॥
स्वर सहित पद पाठयानि॑ । स्थाना॑नि । अ॒श्वि॒ना॒ । द॒धाथे॒ इति॑ । दि॒वः । य॒ह्वीषु॑ । ओष॑धीषु । वि॒क्षु । नि । पर्व॑तस्य । मू॒र्धनि॑ । सद॑न्ता । इष॑म् । जना॑य । दा॒शुषे॑ । वह॑न्ता ॥
स्वर रहित मन्त्र
यानि स्थानान्यश्विना दधाथे दिवो यह्वीष्वोषधीषु विक्षु । नि पर्वतस्य मूर्धनि सदन्तेषं जनाय दाशुषे वहन्ता ॥
स्वर रहित पद पाठयानि । स्थानानि । अश्विना । दधाथे इति । दिवः । यह्वीषु । ओषधीषु । विक्षु । नि । पर्वतस्य । मूर्धनि । सदन्ता । इषम् । जनाय । दाशुषे । वहन्ता ॥ ७.७०.३
ऋग्वेद - मण्डल » 7; सूक्त » 70; मन्त्र » 3
अष्टक » 5; अध्याय » 5; वर्ग » 17; मन्त्र » 3
अष्टक » 5; अध्याय » 5; वर्ग » 17; मन्त्र » 3
भावार्थ - ज्ञानी व विज्ञानी विद्वानांसाठी परमात्मा आज्ञा देतो, की ज्या ज्या स्थानी प्रजा निवास करते त्या त्या स्थानी जाऊन प्रजेसाठी ऐश्वर्याची वृद्धी करा. नाना प्रकारच्या औषधींच्या तत्त्वांना जाणा. प्रजेला संघटनेची नीतिविद्या किंवा उच्च प्रदेशावर स्थिर होण्यासाठी विमान विद्येचे शिक्षण द्या. विद्या उपलब्ध करीत करीत आपल्या याज्ञिकांचे ऐश्वर्य वाढवा.
टिप्पणी -
तात्पर्य हे, की ज्या देशाचे विद्वान औषधांद्वारे किंवा प्रजेसंबंधी नाना प्रकारच्या विद्येद्वारे आपले ऐश्वर्य वाढवीत नाहीत त्या देशाचे याज्ञिक कधीही उन्नती करू शकत नाहीत. त्यासाठी विद्वानांचे मुख्य कर्तव्य आहे, की त्यांनी विद्यासंपन्न बनून याज्ञिकांचे ऐश्वर्य वाढवावे. ॥३॥