Loading...
यजुर्वेद अध्याय - 34

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 34/ मन्त्र 36
    ऋषिः - वसिष्ठ ऋषिः देवता - भगवान् देवता छन्दः - निचृत्त्रिष्टुप् स्वरः - धैवतः
    1

    भग॒ प्रणे॑त॒र्भग॒ सत्य॑राधो॒ भगे॒मां धिय॒मुद॑वा॒ दद॑न्नः।भग॒ प्र नो॑ जनय॒ गोभि॒रश्वै॒र्भग॒ प्र नृभि॑र्नृ॒वन्तः॑ स्याम॥३६॥

    स्वर सहित पद पाठ

    भग॑। प्रणे॑तः। प्रने॑तरिति॑ प्रऽने॑तः। भग॑। सत्य॑राध॒ इति॒ सत्य॑ऽराधः। भग॑। इ॒माम्। धिय॑म्। उत्। अ॒व॒। दद॑त्। नः॒ ॥ भग॑। प्र। नः॒। ज॒न॒य॒। गोभिः॑। अश्वैः॑। भग॑। प्र। नृभि॒रिति॒ नृऽभिः॑। नृ॒वन्त॒ इति॑ नृ॒ऽवन्तः॑। स्या॒म॒ ॥३६ ॥


    स्वर रहित मन्त्र

    भग प्रणेतर्भग सत्यराधो भगेमान्धियमुदवा ददन्नः । भग प्र णो जनय गोभिरश्वैर्भग प्र नृभिर्नृवन्तः स्याम ॥


    स्वर रहित पद पाठ

    भग। प्रणेतः। प्रनेतरिति प्रऽनेतः। भग। सत्यराध इति सत्यऽराधः। भग। इमाम्। धियम्। उत्। अव। ददत्। नः॥ भग। प्र। नः। जनय। गोभिः। अश्वैः। भग। प्र। नृभिरिति नृऽभिः। नृवन्त इति नृऽवन्तः। स्याम॥३६॥

    यजुर्वेद - अध्याय » 34; मन्त्र » 36
    Acknowledgment

    व्याखान -

    हे भगवन्ता! परम ऐश्वर्यदात्या! संसारात किंवा परमार्थात ऐश्वर्य तुझ्याच स्वाधीन आहे दुसऱ्या कुणाच्या नाही. तू कुणालाही ऐश्वर्य देऊ शकतोस. म्हणून तुझ्या कृपेने आमचे दारिद्र्य निर्मूलन होऊन आम्ही परम ऐश्वर्यवान होऊ दे. कारण ऐश्वर्याचा प्रेरक तूच आहेस. हे (सत्यराधः) भगवंता! सत्यरूपी ऐश्वर्याची सिद्धी करणारा तूच आहेस म्हणून तू आम्हाला सदैव ऐश्वर्य दे. मोक्षरूपी सत्य ऐश्वर्याचा दाता तुझ्याखेरीज दुसरा कोणी नाही ऐश्वर्ययुक्त परमेश्वरा सत्यबुद्धीचे पूर्ण ऐश्वर्य तू आम्हाला दे. ज्यामुळे आम्ही तुझे गुणगान गावे व तुझ्या आज्ञेचे पालन करावे.आम्हाला सत्य बुद्धी. सत्यकर्म सत्य गुणांची [ उद्गमय प्रापय] प्राप्ती होऊ दे. त्यायोगे आम्ही सूक्ष्मातील सूक्ष्म पदार्थांना योग्य प्रकारे जाणावे. (भग प्र नो जनय) हे ऐश्वर्य निर्माण करणाऱ्या [ईश्वरा] आमच्यासाठी चांगल्या प्रकारे ऐश्वर्याची निर्मिती कर. सर्वोत्तम गाय घोडे, आणि माणसे यांच्यासह अत्युत्तम ऐश्वर्य तू आम्हाला दे. हे सर्वशक्तिमान! तुझ्या कृपेने आम्ही उत्तम पुरुष, स्त्री व पुत्र आणि सेवक इत्यादींनी युक्त असावे. तुला एवढीच प्रार्थना आहे की आमच्यामध्ये कुणीही माणूस दुष्ट व मूर्ख असता कामा नये. व अशी माणसे निर्माणही होता कामा नये. आमची सदैव सत्कीर्ती व्हावी, निंदा कधीही होऊ नये. ॥११॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top