Loading...
यजुर्वेद अध्याय - 5

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 5/ मन्त्र 32
    ऋषिः - मधुच्छन्दा ऋषिः देवता - अग्निर्देवता छन्दः - स्वराट् ब्राह्मी त्रिष्टुप्, स्वरः - धैवतः
    1

    उ॒शिग॑सि क॒विरङ्घा॑रिरसि॒ बम्भा॑रिरव॒स्यूर॑सि दुव॑स्वाञ्छु॒न्ध्यूर॑सि मार्जा॒लीयः॑। स॒म्राड॑सि कृ॒शानुः॑ परि॒षद्यो॑ऽसि॒ पव॑मानो॒ नभो॑ऽसि प्र॒तक्वा॑ मृ॒ष्टोऽसि हव्य॒सूद॑नऽऋ॒तधा॑मासि॒ स्वर्ज्योतिः॥३२॥

    स्वर सहित पद पाठ

    उ॒शिक्। अ॒सि॒। क॒विः। अङ्घा॑रिः। अ॒सि॒। बम्भा॑रिः। अ॒व॒स्यूः। अ॒सि॒। दुव॑स्वान्। शु॒न्ध्यूः। अ॒सि॒। मा॒र्जा॒लीयः॑। स॒म्राडिति॑ स॒म्ऽराट्। अ॒सि॒। कृ॒शानुः॑। प॒रि॒षद्यः॑। प॒रि॒षद्य॒ इति॑ परि॒ऽसद्यः॑। अ॒सि॒। पव॑मानः। नभः॑। अ॒सि॒। प्र॒तक्वेति॑ प्र॒ऽतक्वा॑। मृ॒ष्टः। अ॒सि॒। ह॒व्य॒सूद॑न॒ इति॑ हव्य॒ऽसूद॑नः। ऋ॒तधा॒मेत्यृ॒तऽधा॑मा। अ॒सि॒। स्व॑र्ज्योति॒रिति॒ स्वः॑ऽज्योतिः॑ ॥३२॥


    स्वर रहित मन्त्र

    उशिगसि कविरङ्ङ्घारिरसि बम्भारिरवस्यूरसि दुवस्वाञ्छुन्ध्यूरसि मार्जालीयः सम्राडसि कृशानुः परिषद्यो सि पवमानो नभोसि प्रतक्वा मृष्टोसि हव्यसूदनऽऋतधामासि स्वर्ज्यातिः समुद्रोसि ॥


    स्वर रहित पद पाठ

    उशिक्। असि। कविः। अङ्घारिः। असि। बम्भारिः। अवस्यूः। असि। दुवस्वान्। शुन्ध्यूः। असि। मार्जालीयः। सम्राडिति सम्ऽराट्। असि। कृशानुः। परिषद्यः। परिषद्य इति परिऽसद्यः। असि। पवमानः। नभः। असि। प्रतक्वेति प्रऽतक्वा। मृष्टः। असि। हव्यसूदन इति हव्यऽसूदनः। ऋतधामेत्यृतऽधामा। असि। स्वर्ज्योतिरिति स्वःऽज्योतिः॥३२॥

    यजुर्वेद - अध्याय » 5; मन्त्र » 32
    Acknowledgment

    व्याखान -

    हे सर्व प्रिय ईश्वरा! (उशिक्) तू कमनीय स्वरूप आहेस, अर्थात सर्व लोक ज्याची कामना करतात असा तू (कविः) पूर्ण विद्वान आहेस. तू (अङ्घारिः) आहेस, स्वतःच्या शक्तांच्या पापाचा शत्रू आहेस, सर्व पापनाशक आहेस. (बम्भारिः) स्वतःच्या भक्ताचा व सर्व जगाचा पालनकर्ता आहेस. (अवस्यूरसि दुवस्वान्) आपल्या भक्तांना व धर्मात्मा लोकांना अन्न इत्यादीची कधीच उणीव भासू देत नाहीस. तर त्यांना दान करण्याची इच्छाच बाळगतोस, तू तुझ्या अनुयायी विद्वानांकडून अनुसरण योग्य आहेस. (शुन्ध्यूरसि, मार्जालीयः) तू शुद्ध स्वरूप असून जगाला पवित्र करून पापाचे निवारण करणारा आहेस असा दुसरा कोणीही नाही. (सम्राडसि कृशानुः) तू सर्व राजांमध्ये सम्राट असून दीन दुबळ्यांना प्राणदाता आहेस. (परिषद्योसि पवमानः) हे न्यायी पवित्र परमेश्वरा त सभ्य, सभापती, समाप्रिय समेला आज्ञा करणारा व सभेचा रक्षक आहेस. पकिन स्वरूप असून पवित्र करणारा आहेस, सभेद्वारे सुख देणारा पवित्र ब प्रिय आहेस. (नभोऽसि प्रतक्वा) हे निर्विकार ईश्वरा ! तू आकाशाप्रमाणे (प्रतक्वा) सर्वाच्या सर्व गोष्टी जाणणारा आहेस. सत्यासत्य कर्म करणाऱ्या लोकांचा साक्षीदार आहेस, ज्याने जसे कर्म केले त्याला तसेच फळ मिळणार दुसऱ्याचे मिळणार नाही, हा तुझा नियम आहे. (मृष्टोसि हव्यसूदनः) तू शुद्धस्वरूप सर्व पापांचे मार्जन करणारा व शोधक आहेस. (हव्यसूदनः) तू सुगंधित रोगनाशक, पुष्टिनाशक अशा द्रव्यांनी वायू वृष्टीची शुद्धी करणारा ब करविणारा आहेस सर्व द्रव्यांचे विभाजन करणाराही तूच आहेस त्यामुळे तुझे नाव (हव्यसूदन) आहे. (ऋतधामासि स्वर्ज्योतिः) हे भगवंता ! तुझेधागे सर्वव्यापक सत्य व यथार्थस्वरूप आहेत. यथार्थ सत्य व्यवहारातच तू निवास करतोस. (स्वः) तू सुखस्वल्प व सुखकारक आहेस. (ज्योतिः) तू स्वप्रकाशित असून सर्वाना प्रकाशित करणारा आहेस ॥१७॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top