Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 103
ऋषिः - विश्वमना वैयश्वः
देवता - अग्निः
छन्दः - उष्णिक्
स्वरः - ऋषभः
काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
1
ई꣡डि꣢ष्वा꣣ हि꣡ प्र꣢ती꣣व्याँ꣢३ य꣡ज꣢स्व जा꣣त꣡वे꣢दसम् । च꣣रिष्णु꣡धू꣢म꣣म꣡गृ꣢भीतशोचिषम् ॥१०३॥
स्वर सहित पद पाठई꣡डि꣢꣯ष्व । हि । प्र꣣तीव्य꣢꣯म् । प्र꣣ति । व्य꣢꣯म् । य꣡ज꣢꣯स्व । जा꣣तवे꣡द꣢सम् । जा꣣त꣢ । वे꣣दसम् । चरिष्णु꣡धू꣢मम् । च꣣रिष्णु꣢ । धू꣣मम् । अ꣡गृ꣢꣯भीतशोचिषम् । अ꣡गृ꣢꣯भीत । शो꣣चिषम् ॥१०३॥
स्वर रहित मन्त्र
ईडिष्वा हि प्रतीव्याँ३ यजस्व जातवेदसम् । चरिष्णुधूममगृभीतशोचिषम् ॥१०३॥
स्वर रहित पद पाठ
ईडिष्व । हि । प्रतीव्यम् । प्रति । व्यम् । यजस्व । जातवेदसम् । जात । वेदसम् । चरिष्णुधूमम् । चरिष्णु । धूमम् । अगृभीतशोचिषम् । अगृभीत । शोचिषम् ॥१०३॥
सामवेद - मन्त्र संख्या : 103
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 11;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 11;
Acknowledgment
विषय - पुढील मंत्रात भौतिक अग्नीशी सादृश्य दाखवून परमेश्वराविषयी वर्णन केले आहे -
शब्दार्थ -
हे मनुष्या, (प्रतीव्यम्) प्रत्येक पदार्थात व्यापक आणि (चरिष्णुधूमम्) ज्याचा प्रभाव (वा प्रताप) धूम्राप्रमाणे शत्रु- प्रकम्पक आहे आणि संचरणशील आहे, अशा त्या (अमग्रभीतशोचिषम्) अप्रतिरुद्ध तेजस्वी (ज्याचे तेज कुठेही अवरुद्ध होत नाही, अशा (जातवेदसम्) सद्गुण रूप दिव्य धन उत्पन्न करणाऱ्या परमात्म रूप अग्नीची (ईडिष्य) व अवश्य स्तुती कर आणि (यजस्व) त्याची पूजा कर. उपासना कर. ।। ७।।
भावार्थ - ज्याप्रमाणे शिल्पीजन (कारागीर, वैज्ञानिक वा अभियंत्रिकरूजन) धूर फेकणाऱ्या अग्नीत, ज्वाळाद्वारे उज्ज्वळ असलेल्या भौतिक अग्नीचा शिल्प मशाल (कारखाने आवीमध्ये) उपभोग करतात त्याचप्रमाणे आपल्या प्रत्ययरूप घूम्राने शोभित, दीप्त, तेजोमय, सत्य अहिंसा, अस्तेय आदी दिव्य धनाचा जो उत्पादक त्या परमात्मरूप अग्नीची उन्नतीची कामना करणाऱ्या मनुष्यांनी स्तुती व पूजा अवश्य केली पाहिजे. ।। ७।।
विशेष -
श्लेष अलंकाराद्वारे या मंत्राचा अर्थ भौतिक अग्नीविषयी देखील केला पाहिजे (तो जसा की अग्नी सर्व वस्तूत व्याप्त आहे. त्याचा धूर सर्वत्र संचरित होतो. त्याच्या प्रकाशास वा विस्तारास कोणी रोखू शकत नाही, त्या सर्वत्र व्याप्त अग्नीमध्ये तू यज्ञ करीत जा. ।। ७।।