Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 110
ऋषिः - प्रयोगो भार्गवः सौभरि: काण्वो वा देवता - अग्निः छन्दः - उष्णिक् स्वरः - ऋषभः काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
1

मा꣡ नो꣢ हृणीथा꣣ अ꣡ति꣢थिं꣣ व꣡सु꣢र꣣ग्निः꣡ पु꣢रुप्रश꣣स्त꣢ ए꣣षः꣢ । यः꣢ सु꣣हो꣡ता꣢ स्वध्व꣣रः꣢ ॥११०॥

स्वर सहित पद पाठ

मा꣢ । नः꣣ । हृणीथाः । अ꣡ति꣢꣯थिम् । व꣡सुः꣢ । अ꣣ग्निः꣢ । पु꣣रुप्रशस्तः꣢ । पु꣣रु । प्रशस्तः꣢ । ए꣣षः꣢ । यः । सु꣣हो꣡ता꣢ । सु꣣ । हो꣡ता꣢꣯ । स्व꣣ध्वरः꣢ । सु꣣ । अध्वरः꣢ ॥११०॥


स्वर रहित मन्त्र

मा नो हृणीथा अतिथिं वसुरग्निः पुरुप्रशस्त एषः । यः सुहोता स्वध्वरः ॥११०॥


स्वर रहित पद पाठ

मा । नः । हृणीथाः । अतिथिम् । वसुः । अग्निः । पुरुप्रशस्तः । पुरु । प्रशस्तः । एषः । यः । सुहोता । सु । होता । स्वध्वरः । सु । अध्वरः ॥११०॥

सामवेद - मन्त्र संख्या : 110
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 4
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 12;
Acknowledgment

शब्दार्थ -
प्रथम अर्थ (परमेश्वर परक) - हे बुध, (ना अरे माझ्या मित्रा) (मः) आम्हा सर्वांसाठी जो (अतिथिम्) अतिथिसम पूजनीय असा अग्नीनाम परमात्मा आहे. त्याची तू (मा हृणीयाः) उपेक्षा करू नकोस अथवा आपल्या वेदविरुद्ध आचरणामुळे त्याला क्रोधित करू नकोस. (सृषः) हा (वसुः) निवासक (अग्निः) तेजस्वी, अग्रनायक परमेश्वर (पुरुप्रशस्तः) अनेक जनांद्वारे स्तुत्य वा वंदित आहे (अनेकांनी त्याची स्तुती केली आहे) (यः) तोच (सुहोता) सर्वोत्कृष्ट दानी सून (स्वध्वरः) आमच्या या जीवन यज्ञाचा शुभ संचालक आहे. ।। द्वितीय अर्थ - (अतिथीपरक) - हे गृहिणी, तू (नः) घरी आलेल्या अतिथिरूप आचार्याची, उपदेशकाची वा संन्यासी आदींची उपेक्षा करून वा त्यांचा यथोचित सत्कार न करून (र्माहृणीभाः) त्यांना रूष्ट करू नकोस. (एषः) हा ( गनिः) धर्म, विद्या आदींच्या प्रकाशाने प्रकाशित अतिथी (वसुः) गृहस्थांना निवास देणारा आणि (पुरुप्रशस्तः) अनेक वेदायी शास्त्रांमध्ये अतिथी - सत्काराला यज्ञ म्हटले आहे. अशा प्रकारे हा अतिथी तुझ्यासाठी प्रशंसनीय आहे. (या) हाच विद्वान अतिथी (सुहोता) तुला सदुपदेश देणारा आणि (स्वधवरः) श्रेष्ठ विद्या प्रसार रूप यज्ञाचा प्रचारक आहे. ।। ४।।

भावार्थ - जसे उत्तम प्रकारे पूजित परमेस्वर पूजकाला सद्वुण आदी रूपाची संपत्ती देऊन त्याचे कल्याण करतो, तसेच यथोचित प्रकारे सत्कार प्राप्त केलेला अतिथी आशीर्वाद, सदुपदेश आदी देऊन गृहस्थी जनांचे कल्याण करतो. याकरिता परमेश्वराच्या उपासनेत आणि अतिथी सत्कारात गृहस्थाने कधीही प्रमाद करू नये. ।। ४।।

इस भाष्य को एडिट करें
Top