Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 124
ऋषिः - मेधातिथिः काण्वः प्रियमेधश्चाङ्गिरसः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
इ꣣दं꣡ व꣢सो सु꣣त꣢꣫मन्धः꣣ पि꣢बा꣣ सु꣡पू꣢र्णमु꣣द꣡र꣢म् । अ꣡ना꣢भयिन्ररि꣣मा꣡ ते꣢ ॥१२४॥
स्वर सहित पद पाठइ꣣द꣢म् । व꣣सो । सुत꣢म् । अ꣡न्धः꣢꣯ । पि꣡ब꣢꣯ । सु꣡पू꣢꣯र्णम् । सु । पू꣣र्णम् । उद꣡र꣢म् । उ꣣ । द꣡र꣢꣯म् । अ꣡ना꣢꣯भयिन् । अन् । आ꣣भयिन् । ररिम꣢ । ते꣣ ॥१२४॥
स्वर रहित मन्त्र
इदं वसो सुतमन्धः पिबा सुपूर्णमुदरम् । अनाभयिन्ररिमा ते ॥१२४॥
स्वर रहित पद पाठ
इदम् । वसो । सुतम् । अन्धः । पिब । सुपूर्णम् । सु । पूर्णम् । उदरम् । उ । दरम् । अनाभयिन् । अन् । आभयिन् । ररिम । ते ॥१२४॥
सामवेद - मन्त्र संख्या : 124
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 1;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 1;
Acknowledgment
विषय - पुढील मंत्रात असे सांगितले आहे की आम्ही विद्वानांचा, अतिथींचा आणि परमेश्वराचा उपहाराद्वारे सत्कार करतो -
शब्दार्थ -
हे (वसो) सद्वुणांचे निवासक अतिथी / हे परमात्मन्, आपण (इदम्) आमच्यातर्फे तुम्हाला अर्पित केले जाणारे व (सुतम्) आम्ही तयार केलेले (अन्धः) अन्न / हा भक्तिरस (सुपूर्णम् उदरम्) पोट भरून प्रसन्नतेने (पिव) प्या / स्वीकार करा. हे (अवाभविन्) विर्भीक निर्भय हे सर्व आम्ही (ते) तुमच्यासाठी (ररिम) अर्पित करीत आहोत. ।। १०।।
भावार्थ - जसा एखादा विद्वान अतिथी आमच्यातर्फे सादर केलेले अन्न, रस, घृत, दूध आदी पदार्थ पोट भरून मनसोक्तपणे पितो, तद्वत हे परमेश्वरा, तू आम्ही श्रद्धा पूरित हृदयाने निवेदित करीत असलेल्या भक्तिरसाचा भरपूर आस्वाद घ्या. परमेश्वर निराकार व निरवयव आहे, तथापि येथे ‘पोट भरून प्या’ असे जे म्हटले आहे, तो अलंकारिक प्रयोग आहे. ।। १०।। या दशतीमध्ये परमेश्वराच्या स्तुतिगानासाठी प्रेरणा, त्याला सुख देण्याची केलेली प्रार्थना आणि त्याच्या महत्तेचे वर्णन असल्यामुळे या दशतीच्या विषयांची संगती पूर्व दशतीच्या विषयाशी आहे, असे जाणावे. ।। १०।। द्वितीय प्रपाठकातील प्रथम अर्धाची तृतीय दशती समाप्त द्वितीय अध्यायातील प्रथम खंड समाप्त
इस भाष्य को एडिट करें