Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 150
ऋषिः - श्रुतकक्षः सुकक्षो वा
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
उ꣡प꣢ नो꣣ ह꣡रि꣢भिः सु꣣तं꣢ या꣣हि꣡ म꣢दानां पते । उ꣡प꣢ नो꣣ ह꣡रि꣢भिः सु꣣त꣢म् ॥१५०॥
स्वर सहित पद पाठउ꣡प꣢꣯ । नः꣣ । ह꣡रि꣢꣯भिः । सु꣣त꣢म् । या꣣हि꣢ । म꣣दानाम् । पते । उ꣡प꣢꣯ । नः꣣ । ह꣡रि꣢꣯भिः । सु꣣त꣢म् ॥१५०॥
स्वर रहित मन्त्र
उप नो हरिभिः सुतं याहि मदानां पते । उप नो हरिभिः सुतम् ॥१५०॥
स्वर रहित पद पाठ
उप । नः । हरिभिः । सुतम् । याहि । मदानाम् । पते । उप । नः । हरिभिः । सुतम् ॥१५०॥
सामवेद - मन्त्र संख्या : 150
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 4;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 4;
Acknowledgment
विषय - पुढील मंत्रात उपासक परमेश्वराला आणि माता- पिता आचार्याला सांगत आहेत
शब्दार्थ -
प्रथम अर्थ (परमात्मपर) हे (मदानां पते) आनंदाचे अधिपती परमेश्वर, आपण (नः) आमच्या (आम्हा उपासकांनी) (हरिभिः) ग्रह ज्ञान ग्रहम करणाऱ्या इंद्रियांद्वारे (सुतम्) प्राप्त ज्ञानाला (उप याहि) प्राप्त वाहा (आम्हाला ज्ञान - चक्षूंद्वारे तुम्हांस जाणून घेता येईल, असे करा) (नः) आमच्या (हरिभिः) कर्म- आहरण करणाऱ्या कर्मेन्द्रियांद्वारे (सुतम्) उत्पादित कर्माला (उपयाहि) प्राप्त व्हा. (आमच्या श्रम व यज्ञ सफल होऊ द्या.)
द्वितीय अर्थ - (आचार्यपर) हे (मदानां पते) हर्षदायक ज्ञानाचे अधिपती, विविध विद्याविशारद आचार्य प्रवर, आपण (हरिभिः) ज्ञान- संचय करणाऱ्या अन्य गुरुजनांसह (नः) आमच्या (आम्हा माता- पित्याच्या) (सुतम्) गुरुकुलात प्रविष्ट पुत्राच्या (उष याहि) जवळ या (वा त्यास जवळ घ्या.)
भावार्थ - उपासक गण परमेश्वराला प्रार्थना करीत आहे की जर आमच्या प्रत्येक ज्ञानात व कर्मात आपण व्याप्त असाल, तरच आमचा जीवन यज्ञ सफल होईल. त्याचप्रमाणे मुलाने आई-वडील आचार्याला विनंती करीत आहेत की आपण विद्या अध्यापनासाठी आणि या मुलाच्या चरित्र निर्माणासाठी अन्य गुरुजनांसह प्रतिदिनी या आमच्या मुलाजवळ रहा. ।। ६।।
विशेष -
या मंत्रात श्लेष अलंकार आहे. ‘उप नः हरिभिः सुतम्’ या पदसमूहाची आवृत्ती असल्यामुळे इथे पादावृत्ती यमक अलंकार आहे. ।। ६।।