Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 244
ऋषिः - मेधातिथि0मेध्यातिथी काण्वौ देवता - इन्द्रः छन्दः - बृहती स्वरः - मध्यमः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

य꣢ ऋ꣣ते꣡ चि꣢द꣣भिश्रि꣡षः꣢ पु꣣रा꣢ ज꣣त्रु꣡भ्य꣢ आ꣣तृ꣡दः꣢ । स꣡न्धा꣢ता स꣣न्धिं꣢ म꣣घ꣡वा꣢ पुरू꣣व꣢सु꣣र्नि꣡ष्क꣢र्ता꣣ वि꣡ह्रु꣢तं꣣ पु꣡नः꣢ ॥२४४॥

स्वर सहित पद पाठ

यः꣢ । ऋ꣣ते꣢ । चि꣣त् । अभिश्रि꣡षः꣢ । अ꣣भि । श्रि꣡षः꣢꣯ । पु꣣रा꣢ । ज꣣त्रु꣡भ्यः꣢ । आ꣣तृ꣡दः꣢ । आ꣣ । तृ꣡दः꣢꣯ । स꣡न्धा꣢꣯ता । स꣣म् । धा꣣ता । सन्धि꣢म् । स꣣म् । धि꣢म् । म꣣घ꣡वा꣢ । पु꣣रूव꣡सुः꣢ । पु꣣रु । व꣡सुः꣢꣯ । नि꣡ष्क꣢꣯र्ता । निः । क꣣र्त्ता । वि꣡ह्रु꣢꣯तम् । वि । ह्रु꣣तम् । पु꣢नरि꣡ति꣢ ॥२४४॥


स्वर रहित मन्त्र

य ऋते चिदभिश्रिषः पुरा जत्रुभ्य आतृदः । सन्धाता सन्धिं मघवा पुरूवसुर्निष्कर्ता विह्रुतं पुनः ॥२४४॥


स्वर रहित पद पाठ

यः । ऋते । चित् । अभिश्रिषः । अभि । श्रिषः । पुरा । जत्रुभ्यः । आतृदः । आ । तृदः । सन्धाता । सम् । धाता । सन्धिम् । सम् । धिम् । मघवा । पुरूवसुः । पुरु । वसुः । निष्कर्ता । निः । कर्त्ता । विह्रुतम् । वि । ह्रुतम् । पुनरिति ॥२४४॥

सामवेद - मन्त्र संख्या : 244
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 2
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 2;
Acknowledgment

शब्दार्थ -
जो (अभिश्रिषः) जोडणारे वा चिटकविणारे पदार्थ - यथा डिंक, सिरस, प्लास्टर आदी पदार्थां (ऋते चित्) शिवाय जो (जत्रुभ्यः) गळ्याच्या हाडापासून (आतृदः) गळा कापला (पुरा) जाण्यापूर्वीच (शत्रूच्या प्रहारामुळे सैनिकाचा गळा अर्धवट कापलेल्या अवस्थेत असतानाच) (सन्धिम्) जोडाच्या अवयवाला त्या कापले गेलेल्या अवयवाशी (सन्धाता) जोडून टाकतो, म्हणजे शस्त्रादीने गळ्याचा एक भाग कापला गेलेला असूनही त्या भागाला नैसर्गिक रूपाने भरून देणअयाची किमया करतो व त्यामुळे गळा धडापासून वेगळा होऊन भूमीवर पडू शकत नाही, तो (पुरुवसुः) अनेक शरीरावयवांना यथास्थान पूर्ववत ठेवणारा (मधवा) वै शल्यचिकित्सारूप धनाचा स्वामी परमेश्वर, जीवात्मा, प्राण अथवा शल्य विशारद (विहृुतम्) वाकडा झालेल्या अवयवाला (पुनः) पुन्हा (निष्कर्ता) दुरुस्त वा जसा असावयास हवा तसे करू शकतो.।।२।।

भावार्थ - अहा ! परमेश्वराचे मानक - शरीर- रचनेचे हे असे चातुर्य केवढे अद्भुत आहे. जोडणाऱ्या साधनांशिवाय डिंक आदी विनादेखील धाव वा कापलेला गळा पुन्हा दृढतेने जोडून येण्याचे कसब त्याने केले नसते. मध्येच स्वयमेव जोडून येण्याचे वा जखम भरून देण्याची व्यवस्था त्याने केली नसती, तर शिर धडापासून वेगळे झाले असते. (वा जखम न भरून येता ते अवयव नासले असते) हेदेखील ईश्वराचेच कर्तृत्व आहे की शरीराचा कोणताही अवयव क्षत- विक्षत वा विकृत झाला तर ईश्वर जीवात्मा व प्राण यांच्या साह्याने आणि शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेमुळे ती जखम वा तो वाकडा अवयव पूर्व स्थितीत येतो. एक निष्णात शल्य शास्त्र विशारददेखील परमेश्वराच्या त्या कर्तृत्वाचेच अनुकरण करीत असतो. युद्धामध्ये शत्रूच्या प्रहारामुळे कोणा सैनिकाच्या गळ्याचा एक भाग कापला गेला, तर शल्यचिकित्सक सुईद्वारे शिवून आणि औषधी लेप करून त्या भागाला निरोग करतो एखाद्या अपघातात जर कोणाचा अवयव वाकडा वा भग्न होतो, तर शल्यविशारद योग्य त्या उपचाराद्वारे तो अवयव नीट करतो.।।२।।

इस भाष्य को एडिट करें
Top