Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 266
ऋषिः - भरद्वाजो बार्हस्पत्यः
देवता - इन्द्रः
छन्दः - बृहती
स्वरः - मध्यमः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
इ꣡न्द्र꣢ त्रि꣣धा꣡तु꣢ शर꣣णं꣢ त्रि꣣व꣡रू꣢थꣳ स्व꣣स्त꣡ये꣢ । छ꣣र्दि꣡र्य꣢च्छ म꣣घ꣡व꣢द्भ्यश्च꣣ म꣡ह्यं꣢ च या꣣व꣡या꣢ दि꣣द्यु꣡मे꣢भ्यः ॥२६६॥
स्वर सहित पद पाठइ꣡न्द्र꣢꣯ । त्रि꣣धा꣡तु꣢ । त्रि꣣ । धा꣡तु꣢꣯ । श꣣रण꣢म् । त्रि꣣व꣡रू꣢थम् । त्रि꣣ । व꣡रू꣢꣯थम् । स्व꣣स्त꣡ये꣢ । सु꣣ । अस्त꣡ये꣢ । छ꣣र्दिः꣢ । य꣣च्छ । मघ꣡व꣢द्भ्यः । च꣣ । म꣡ह्य꣢꣯म् । च꣣ । याव꣡य꣢ । दि꣣द्यु꣢म् । ए꣣भ्यः ॥२६६॥
स्वर रहित मन्त्र
इन्द्र त्रिधातु शरणं त्रिवरूथꣳ स्वस्तये । छर्दिर्यच्छ मघवद्भ्यश्च मह्यं च यावया दिद्युमेभ्यः ॥२६६॥
स्वर रहित पद पाठ
इन्द्र । त्रिधातु । त्रि । धातु । शरणम् । त्रिवरूथम् । त्रि । वरूथम् । स्वस्तये । सु । अस्तये । छर्दिः । यच्छ । मघवद्भ्यः । च । मह्यम् । च । यावय । दिद्युम् । एभ्यः ॥२६६॥
सामवेद - मन्त्र संख्या : 266
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 4
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 4;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 4
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 4;
Acknowledgment
विषय - आम्हाला कसे घर व शरीर मिळावे ? परमेश्वराचे शरण कसे लाभेल ?
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (राष्ट्रपर) - (एक नागरिक राष्ट्राध्यक्षाला / राजाला प्रार्थना करीत आहे) - हे (इन्द्र) दुःखविदारक, सुखदाता, परमैश्वर्यवान राजा, आपण (मधवद्भ्यःच) धनिकांकरिता (मह्यंच) आणि माझ्यासारख्या सामान्य जनांकरिता (स्वस्तये) सुख, उत्तम जीवन मापन आणि आनंद देण्याकरिता (त्रिधातु) तीन मजले असलेले अथवा तीन कक्ष असलेले (शरण्) आश्रयस्थान तसेच (त्रिवरूथम्) थंडी, ऊन्ह आणि पाूस या तिन्हींचे प्रतिरोधक असे (छर्दिः) घर (यच्छ) प्रदान करा आणि (एम्भयः) या सर्व लोकांसाठी त्या घरात (दिद्युम्) आकाशास्य विजेला (यावय) दूर ठेवा (त्या घरांवर वीज पडू नये, यासाठी) त्या घरांना विद्युत वाहक तांब्याचे तार लावण्याची व्यवस्था करा.।।
द्वितीय अर्थ - (मानव शरीरपर) - हे (इन्द्र) परमेश्वर, आपण या राष्ट्रातील (भगवद्भ्यः) विद्या, स्वास्थ्य आदी धनांनी संपन्न अशा लोकांसाठी (महमंच) तसेच माझ्यासाठी (या उपासकाच्या) (स्वस्तये) कल्याणासाठी पुनर्जन्मामध्ये (त्रिधातु) सत्त्व, रज, तम, रूप, वात, पित्त, कफरूप, प्राण, मन, बुद्धीरूप, बाल्य, मौनम, वार्धक रूप अथवा अस्थि, मज्जा, वीर्यरूप या सर्व धातूंनी युक्त (शरणम्) आत्म्याचा जो आधार आणि (त्रिवरूथम्) ज्ञान, कर्म, उपासना रूप तीन वरणीय व्रतांनी युक्त असे (छर्दिः) मानव शरीररूप घर (यच्छ) प्रदान करा आणि (एभ्यः) या अनेकांनी धारण केलेल्या लोकांच्या शरीररूप गृहांम धूम (दिघुम्) संतापक रोगादी व दुष्कर्म आदी (यावय) दूर करा.।।
तृतीय अर्थ - (अध्यात्मपर) - हे (इन्द्र) दुःखविदारक, सुखदाता, परमैश्वर्यशाली परमात्मा, आपण (मधवद्भ्यः) योगसिद्धिरूप धनाचे स्वामी अशा सिद्धयोगी जनांकरिता (महयंच) आणि माझ्यासारख्या योग साधकाला (स्वस्तये) मोक्ष रूप उत्तम अस्तिन प्राप्त करण्याकरिता (त्रिधातु) सत्त्व, चित्त्व आणि आनंदरूप तीन धातूंनी युक्त तसेच ९त्रिवरूयम्) आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक रूप तीन प्रकारचे दुःख दूर करणारी अश (छदि४ः) पापानचे वमन करविणारी (शरणम्) तुमचे शरण (यच्छ) प्रदान करा. तसेच (एभ्यः) या अन्य योगसाधकांच्या हितासाठी (दिघुम्) त्यांच्यातील उत्तेजक काम, क्रोध आदी दोष (यावय) दूर करा.।।४।।
भावार्थ - राष्ट्रवासी जनांकरिता राजकीय साह्याने यथावश्यक रूपाने प्रत्येकाला तिमजले वा कमीत कमी तीन कक्ष असलेले घर देण्यात यावे की जे घर हिवाळा, उन्हाळा, पावसाळा सर्व ऋतूंत सुखकर असावे. ज्यात विद्युत प्रकाशाची व्यवस्ता असावी आणि ज्यावर आकाशातून वीज पडल्यास हानी होऊ नये. तसेच परमेश्वराचे छत्र छायारूप घरही आम्हाला प्राप्त व्हावे. याशिवाय आमच्या हातून सदा अशीच सत्केर्में घडावीत की त्यामुळे आम्हाला पुन्हा पुन्हा मानव सरीर मिळत असावे. आम्ही कधीही अशा दुष्कर्मांत लिप्त होऊ नये की ज्यामुळे आम्हाला वाघ, सिंह, कीट पतंग आदी योनींमध्ये अथवा स्थावर (वृक्षादी) योनींमध्ये जावे लागेल.।।४।।
विशेष -
या मंत्रात श्लेष अलंकार आहे. पूर्वार्धामध्ये ङ्गतफ काराचा अनुप्रास असून उत्तरार्धात ङ्गयफ काराचा अनुप्रासदेखील आहे.।।४।।