Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 267
ऋषिः - नृमेध आङ्गिरसः देवता - इन्द्रः छन्दः - बृहती स्वरः - मध्यमः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

श्रा꣡य꣢न्त इव꣣ सू꣢र्यं꣣ वि꣡श्वेदिन्द्र꣢꣯स्य भक्षत । व꣡सू꣢नि जा꣣तो꣡ जनि꣢꣯मा꣣न्यो꣡ज꣢सा꣣ प्र꣡ति꣢ भा꣣गं꣡ न दी꣢꣯धिमः ॥२६७॥

स्वर सहित पद पाठ

श्रा꣡य꣢꣯न्तः । इ꣣व । सू꣡र्य꣢꣯म् । वि꣡श्वा꣢꣯ । इत् । इ꣡न्द्र꣢꣯स्य । भ꣣क्षत । व꣡सू꣢꣯नि । जा꣣तः꣢ । ज꣡नि꣢꣯मानि । ओ꣡ज꣢꣯सा । प्र꣡ति꣢꣯ । भा꣣ग꣢म् । न । दी꣣धिमः ॥२६७॥


स्वर रहित मन्त्र

श्रायन्त इव सूर्यं विश्वेदिन्द्रस्य भक्षत । वसूनि जातो जनिमान्योजसा प्रति भागं न दीधिमः ॥२६७॥


स्वर रहित पद पाठ

श्रायन्तः । इव । सूर्यम् । विश्वा । इत् । इन्द्रस्य । भक्षत । वसूनि । जातः । जनिमानि । ओजसा । प्रति । भागम् । न । दीधिमः ॥२६७॥

सामवेद - मन्त्र संख्या : 267
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 4;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे मनुष्यांनो, (श्रायन्तः) ज्यावर फळे पिकतात, असी वृक्षे अथवा ळ आदींना पक्व करणारे पदार्थ अग्नी आदी (सूर्यम् इव) जसे सूर्याचे सेवन करतात, (सूर्यापासून ऊर्जा घेतात) त्याप्रमाणे (श्रायन्तः) आपल्या आत्म्याला परिपक्व (म्हणजे अनुभवपूरित व ज्ञानसंपन्न) करीत तुम्ही लोक (इन्द्रस्य) जगसम्राट परमेश्वराच्या (विश्वा इत्) सर्व परोपकार, दयातुब, न्यायकारित्व आदी गुणांचे (भक्षत) सेवन करा (आपल्या स्वभावात ते गुण कर्म धारण करा) (जातः) तो प्रसिद्ध परमेश्वर (ओजसा) आपल्या बळाने (वसूनि) समस्त धन आदी पदार्थ आणि (जनिमानि) प्राण्यांना विविध जन्म देतो. (भागं न) जसा एक पुत्र आपला दाय भाग स्वतःकडे ठेवून घेतो, तद्वत आम्ही (उपासक) देखील त्या इंद्र परमेश्वराला (प्रतिदीधिमः) आपल्या हृदयात धारण करतो.।।२।।

भावार्थ - जो सूर्याविना फळे पिकत नाहीत, तसेच परमेश्वराशिवाय (त्याच्या उपासनेशिवाय) जीवात्मा परिपक्व होत नाही. जसे एक पुत्र आपला दाय भाग (वडिलाकडून उत्तराधिकाराने मिळणारा संपत्तीचा वाटा) आपल्याजवळ ठेवून घेतो, तसेच सर्वांनी परमेश्वराला आपल्या हृदयात धारण करावे (सदा त्याची उपासना करावी व हृदयातील त्याचे अस्तित्व जाणून असावे।। ५।।

इस भाष्य को एडिट करें
Top