Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 269
ऋषिः - नृमेधपुरुमेधावाङ्गिरसौ देवता - इन्द्रः छन्दः - बृहती स्वरः - मध्यमः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

आ꣢ नो꣣ वि꣡श्वा꣢सु꣣ ह꣢व्य꣣मि꣡न्द्र꣢ꣳ स꣣म꣡त्सु꣢ भूषत । उ꣢प꣣ ब्र꣡ह्मा꣢णि꣣ स꣡व꣢नानि वृत्रहन्परम꣣ज्या꣡ ऋ꣢चीषम ॥२६९॥

स्वर सहित पद पाठ

आ꣢ । नः꣣ । वि꣡श्वा꣢꣯सु । ह꣡व्य꣢꣯म् । इ꣡न्द्र꣢꣯म् । स꣣म꣡त्सु꣢ । स꣣ । म꣡त्सु꣢꣯ । भू꣣षत । उ꣡प꣢꣯ । ब्र꣡ह्मा꣢꣯णि । स꣡व꣢꣯नानि । वृ꣣त्रहन् । वृत्र । हन् । परमज्याः꣢ । प꣣रम । ज्याः꣢ । ऋ꣣चीषम ॥२६९॥


स्वर रहित मन्त्र

आ नो विश्वासु हव्यमिन्द्रꣳ समत्सु भूषत । उप ब्रह्माणि सवनानि वृत्रहन्परमज्या ऋचीषम ॥२६९॥


स्वर रहित पद पाठ

आ । नः । विश्वासु । हव्यम् । इन्द्रम् । समत्सु । स । मत्सु । भूषत । उप । ब्रह्माणि । सवनानि । वृत्रहन् । वृत्र । हन् । परमज्याः । परम । ज्याः । ऋचीषम ॥२६९॥

सामवेद - मन्त्र संख्या : 269
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 4;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे मनुष्यांनो, (विश्वासु समत्सु) सर्व देवासुर- संग्रामामध्ये (मनातील बऱ्या वाईट विचारांच्या संघर्षाच्या वेळी) तुम्ही (नः) आम्ही, तुम्ही वा सर्व जणांनी ज्याला (हव्यम्) आवाहन करणे उचित आहे त्या (इन्द्रम्) शत्रुविदारक परमेश्वराला (आभूषत) नेतेपदी अलंकृत करा. (आपला रक्षक म्हणून त्याला हाक मारा.) हे (वृत्रहन्) पाप आदी असुरांचे संहारक, हे (ऋचीषम्) वेदज्ञांचा सत्कार करणारे, स्तोताजनांचा मान राखणारे हे परमेश्वर, (परमज्याः) प्रबळ काम, क्रोध आदी शत्रूंचा विध्वंस करणारे, आपण (ब्रह्माणि) आम्ही म्हणत असलेले स्तोत्र आणि (सवनानि) जीवनरूप यज्ञाचे बाल्, यौवन व वार्ध्यक्य रूप प्रातः सवन, माध्यमंदिन सवन आणि सायंसवन यांना प्राप्त व्हा. (जीवनाच्या तिन्ही अवस्थेत वा दिवसाच्या तिन्ही वेळा आम्हांवर कृपाशील व्हा.)।। ७।।

भावार्थ - मनुष्याच्या आयुष्यात जे बाह्य व आंतरिक संघर्ष देवासुर- संग्राम होतात, त्यात जर माणसाने परमेश्वराचे स्मरण करून त्यापासून शक्ती व प्रेरणा प्राप्त केली, तर तो सर्व प्रतिद्वद्वींना, विरोधकांना अवश्य पराभूत करू शकतो. ।। ७।।

इस भाष्य को एडिट करें
Top