Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 314
ऋषिः - वसिष्ठो मैत्रावरुणिः देवता - इन्द्रः छन्दः - त्रिष्टुप् स्वरः - धैवतः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

यो꣡नि꣢ष्ट इन्द्र꣣ स꣡द꣢ने अकारि꣣ त꣡मा नृभिः꣢꣯ पुरूहूत꣣ प्र꣡ या꣢हि । अ꣢सो꣣ य꣡था꣢ नोऽवि꣣ता꣢ वृ꣣ध꣢श्चि꣣द्द꣢दो꣣ व꣡सू꣢नि म꣣म꣡द꣢श्च꣣ सो꣡मैः꣢ ॥३१४॥

स्वर सहित पद पाठ

यो꣡निः꣢꣯ । ते꣣ । इन्द्र । स꣡द꣢꣯ने । अ꣣कारि । त꣢म् । आ । नृ꣡भिः꣢꣯ । पु꣣रूहूत । पुरु । हूत । प्र꣢ । या꣢हि । अ꣡सः꣢꣯ । य꣡था꣢꣯ । नः꣣ । अविता꣢ । वृ꣣धः꣢ । चि꣣त् । द꣡दः꣢꣯ । व꣡सू꣢꣯नि । म꣣म꣡दः꣢ । च꣣ । सो꣡मैः꣢꣯ ॥३१४॥


स्वर रहित मन्त्र

योनिष्ट इन्द्र सदने अकारि तमा नृभिः पुरूहूत प्र याहि । असो यथा नोऽविता वृधश्चिद्ददो वसूनि ममदश्च सोमैः ॥३१४॥


स्वर रहित पद पाठ

योनिः । ते । इन्द्र । सदने । अकारि । तम् । आ । नृभिः । पुरूहूत । पुरु । हूत । प्र । याहि । असः । यथा । नः । अविता । वृधः । चित् । ददः । वसूनि । ममदः । च । सोमैः ॥३१४॥

सामवेद - मन्त्र संख्या : 314
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 2
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 9;
Acknowledgment

शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (परमात्मपर) - हे (इन्द्र) दुःखविदारक, सुखप्रद पमरेश्वरा, (ते) तुझ्या (सदने) बसण्यासाठी आम्ही हे (योनिः) हृदय-गृह (अकारि) सुसज्जित केले आहे. हे (पुरुहूत) बहुस्तुत परमेश्वरा, (तम्) त्या हृदय - गृहामध्ये (नृभिः) उन्नतीचे जी साधने, सत्य, अहिंसा, दान आदी गुण आहेत, त्या गुणांसह (आ प्र याहि) तू ये. (यथा) ज्यामुळे तू (नः) आमचा (अविता) रक्षक आणि (बुधःचित्) बुद्धिदातादेखील (असः) होशील. आम्हाला (वसूनि) आध्यात्मिक व भौतिक धन (ददः) देणारे हो (च) आणि (सोमैः) शांतिभावाद्वारे आम्हाला (ममदः) आनंदित कर.।। द्वितीय अर्थ - (राजापर) - हे (इन्द्र) शत्रुविदारक, शांतिप्रदाता राजा, (ते) तुच्या (सदने) बसण्यासाठी (योनिः) सिंहासन (असारि) मी (एक कलाकार याने) तयार केले आहे. हे (पुरुहूत) अनेक प्रजाजनांद्वारे निर्वाचित अथवा ज्याला अनेक प्रजानन संकटाच्या वेळी बोलावतात ते). हे राजा, तुम्ही (नृभिः) राज्याधिकारी लोकांसह (आ) येऊन (प्रयाहि) इथे स्थानापन्न व्हा. (यथा) ज्यायोगे तुम्ही (नः) आम्हा प्रजाजनांचे (अविता) रक्षक आणि (वृधः चित्) उन्नतिकर्ता (असः) होऊ शकाल, व्हाल. हा राजा आम्हाला (वसूनि) धन संपत्ती (ददः) देवो (च) आणि (सोमैः) शांततेद्वारे वा सर्वत्र शांती स्थापित करून (ममदः) आम्हा प्रजाजनांना आनंदित करावे. ।। २।।

भावार्थ - परमेश्वर हृदयासनावर आणि राजा सिंहासनावर बसून सर्वांना आध्यात्मिक संपत्ती व भौतिक रक्ष, वृदधी, संपदा व शांती प्रदान करू शकतात. ।। २।।

इस भाष्य को एडिट करें
Top