Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 319
ऋषिः - गौरिवीतिः शाक्त्यः देवता - इन्द्रः छन्दः - त्रिष्टुप् स्वरः - धैवतः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

व꣡यः꣢ सुप꣣र्णा꣡ उ꣢꣯प सेदु꣣रि꣡न्द्रं꣢ प्रि꣣य꣡मे꣢धा꣣ ऋ꣡ष꣢यो꣣ ना꣡ध꣢मानाः । अ꣡प꣢ ध्वा꣣न्त꣡मू꣢र्णु꣣हि꣢ पू꣣र्धि꣡ चक्षु꣢꣯र्मुमु꣣ग्ध्या꣢३꣱स्मा꣢न्नि꣣ध꣡ये꣢व ब꣣द्धा꣢न् ॥३१९॥

स्वर सहित पद पाठ

व꣡यः꣢꣯ । सु꣣पर्णाः । सु꣣ । पर्णाः꣢ । उ꣡प꣢꣯ । से꣣दुः । इ꣡न्द्र꣢꣯म् । प्रि꣣य꣡मे꣢धाः । प्रि꣣य꣢ । मे꣣धाः । ऋ꣡ष꣢꣯यः । ना꣡ध꣢꣯मानाः । अ꣡प꣢꣯ । ध्वा꣣न्त꣢म् । ऊ꣣र्णुहि꣢ । पू꣣र्धि꣢ । च꣡क्षुः꣢ । मु꣣मुग्धि꣢ । अ꣣स्मा꣢न् । नि꣣ध꣡या꣢ । नि꣣ । ध꣡या꣢꣯ । इ꣣व । बद्धा꣢न् ॥३१९॥


स्वर रहित मन्त्र

वयः सुपर्णा उप सेदुरिन्द्रं प्रियमेधा ऋषयो नाधमानाः । अप ध्वान्तमूर्णुहि पूर्धि चक्षुर्मुमुग्ध्या३स्मान्निधयेव बद्धान् ॥३१९॥


स्वर रहित पद पाठ

वयः । सुपर्णाः । सु । पर्णाः । उप । सेदुः । इन्द्रम् । प्रियमेधाः । प्रिय । मेधाः । ऋषयः । नाधमानाः । अप । ध्वान्तम् । ऊर्णुहि । पूर्धि । चक्षुः । मुमुग्धि । अस्मान् । निधया । नि । धया । इव । बद्धान् ॥३१९॥

सामवेद - मन्त्र संख्या : 319
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 9;
Acknowledgment

शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (सूर्य आणि सूर्यकिरणे याविषयी) (सुपर्णाः वयः) सुंदर पंख असणाऱ्या पक्ष्याप्रमाणे मोहक उड्डाण करणाऱ्या सूर्यकिरणे जणू काय (इन्द्रम्) सूर्याच्या (उपसेदुः) जवळ जातात. (प्रियमेधाः) बुद्धिवर्धन करणे वा प्रकाशदान रूप यज्ञ करणे हे ज्यांचे प्रिय कार्य आहे, अशा त्या (ऋषयः) पाहण्यात ज्या सहाय्यक अशी ती किरणे (नाधमानाः) जणू काय याचना करतात की हे सूर्य, (निधया इव) या पाशाव्वत (बद्धान्) बद्ध झालेल्या (अस्मान्) आम्हाला (मुयुग्धि) मुक्त करा. आमच्या हस्ते (ध्वान्तम्) अंधकाराचे आवरण (उप ऊर्णूहि) दूर सारा आणि (चक्षुः) प्राण्यांचे डोळे (पूर्धि) प्रकाशाने भरून टाका.।। द्वितीय अर्थ - (आचार्य- शिष्यपर) - (सुपर्णाः) ज्ञान, कर्म - उपासनारूप सुंदर पंख असणारे आणि (वयः) उठण्यास सक्षम अशा पक्ष्याप्रमाणे विद्या अध्ययनात समर्थ असे शिष्यगण (इन्द्रम्) विद्यारूप ऐश्वर्याने समृद्ध आचार्यांजवळ (उपसेदुः) जवळ जातात. (प्रियमेघाः) मेधा आणि यज्ञ यांच्याविषयी प्रेम असणारे आणि (ऋषभः) वेदादी शास्त्रांचे द्रष्य असे ते शिष्य (जाधमानाः) आचार्याला याचना करतात की (रिधया इव बद्धान्) जणू या गुरुकुल रूपपाशात बद्द (अस्मान्) आम्हाला (सुमुग्धि) आता आपण गुरुकुलाबाहेर जाण्यासाठी मुक्त करा. (कारण आमचे शिक्षण पूर्ण झाले असून आता आम्ही इतरेजनांना ते ज्ञान देण्यासाठी गुरुकुलाबाहेर जाऊ इच्छितो. या उद्दिष्टाच्या सिद्धतेसाठी) आपण (ध्वान्तम्) जगात पसरलेल्या अविद्या- अंधकाराला (अप ऊर्णुहि) आमच्या हातून पूर्णपणे नष्ट करा आणि (चक्षुः) ज्ञानरूप प्रकाश लोकांच्या (पूर्धि) मस्तिष्कात पूर्णपणे भरा.।। तृतीय अर्थ (परमात्मा- जीवात्मापर)- (सुपर्णाः) ज्ञानेंद्रियें, कर्मेन्द्रियें, प्राण, मन, बुद्धीरूप सुंदर पंख असलेले (वयः) व पक्ष्याप्रमाणे असलेले जीवात्मा, (इन्द्रम्) परमेश्वराजवल (उपसेदुः) पोहचतात. (प्रियमेधाः) बुद्धीचे प्रेमीना यज्ञप्रेमी व (ऋषयः) पदार्थ दर्शन करणारे जीवात्मा (नाधमानाः) परमेश्वराला याचना करतात की आमच्या (ध्वान्तम्) तमोगुणाचे आवरण (अप ऊर्णुहि) दूर करा आणि आमच्या हृदयात वा बुद्धीत (चक्षुः) ज्ञानाचा प्रकाश (पूर्धि) भरा. (निधमा इव) जणू काय पोशाप्रमाणे असलेल्या या जन्म, जरा, मरण आदींमध्ये (बद्धान्) बद्ध असलेल्या (अस्मान्) आम्हाला (मुमुग्धि) मुक्त करा. आम्हास मोक्ष द्या.।। चतुर्थ अर्थ - (राजा- प्रजापर) (सुपर्णाः) विविध साधनरूप शुभ पंख असलेले (वयः) कर्मशील प्रजाजन (इन्द्रम्) परमैश्वर्यवान वीर राजाजवळ (उपसेदुः) जातात. (प्रियमेधाः) मेधाप्रिय व यज्ञप्रिय (ऋषयः) दृष्टिसंपन्न, प्रबुद्ध ते प्रजानन (नाधमानाः) राजाला याचना करतात की (ध्वान्तम्) राष्ट्रत व्याप्त अविद्या, भ्रष्टाचार आदींच्या अंधकाराला (अप ूर्णुहि) दूर करा. ते म्हणतात की आमच्यामध्ये (चक्षुः) सद्विज्ञान, सद्विचार, सदाचार आदींचा प्रकाश (पूर्धि) भरा. (निधया इव) जणू काय पाप आणि दुर्व्यसनांच्या पाशात (बद्धान्) बद्ध असलेल्या (अस्मान्) आम्हा प्रजाजनांना (मुमुग्धि) श्रेष्ठ शिक्षण, प्रशिक्षण, दंड आदी उपायांद्वारे पाप आणि व्यसनांपासून आम्हाला तुम्ही सोडविले आहे, असे करा.।। ७।।

भावार्थ - कवी उत्प्रेक्षा करीत आहे की रात्री सूर्याची किरणे जणू काय जाळ्यात अडकलेल्या पक्ष्यांप्रमाणे सूर्यमंडलात बद्ध असतात. तेव्हा किरणे सूर्याला याचना करतात की आम्हाला सोडा की ज्यामुळे आम्ही भूतलावर जाऊन अंधकाराचा नाश करून सवज्ञर्त्र प्रकाशाचा विस्तार करू शकू. तद्वत विद्याध्ययन- काल पूर्ण केलेले शिष्यगण आचार्याला प्रार्थना करतात की आम्हाला गुरूकुलातून मुक्त करा की ज्यायोगे आम्ही बाहेर जाऊन जगात पसरलेल्या अविद्यान्धकार नष्ट करू शकू. याचप्रमाणे जीवात्मा- गण परमेश्वराला याचना करतात की ज्ञानरूप सळईने आमचे नेत्र दोषमुक्त करून जन्म, जरा, मरण आदी वब्ध असलेल्या आम्हाला मोक्षासाठी पात्र असे करा. मोक्ष द्या. तद्वत प्रजाजन राजाला याचना करतात की राष्ट्रात व्याप्त अज्ञान, दुराचार आदी रूप अंधकार छिन्न- विछिन्न करा आणि राष्ट्राला पतनाकडे घेऊन जाणाऱ्या सर्व दुर्व्यसनांपासून आम्हाला सोडवा. (वा वाचवा) ।। ७।।

इस भाष्य को एडिट करें
Top