Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 324
ऋषिः - द्युतानो मारुतः देवता - इन्द्रः छन्दः - त्रिष्टुप् स्वरः - धैवतः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

वृ꣣त्र꣡स्य꣢ त्वा श्व꣣स꣢था꣣दी꣡ष꣢माणा꣣ वि꣡श्वे꣢ दे꣣वा꣡ अ꣢जहु꣣र्ये꣡ सखा꣢꣯यः । म꣣रु꣡द्भि꣢रिन्द्र स꣣ख्यं꣡ ते꣢ अ꣣स्त्व꣢थे꣣मा꣢꣫ विश्वा꣣: पृ꣡त꣢ना जयासि ॥३२४॥

स्वर सहित पद पाठ

वृ꣣त्र꣡स्य꣢ । त्वा꣣ । श्वस꣡था꣢त् । ई꣡ष꣢꣯माणाः । वि꣡श्वे꣢꣯ । दे꣣वाः꣢ । अ꣣जहुः । ये꣢ । स꣡खा꣢꣯यः । स । खा꣣यः । मरु꣡द्भिः꣢ । इ꣣न्द्र । सख्य꣢म् । स꣣ । ख्य꣢म् । ते꣣ । अस्तु । अ꣡थ꣢꣯ । इ꣣माः꣢ । वि꣡श्वाः꣢꣯ । पृ꣡त꣢꣯नाः । ज꣣यासि ॥३२४॥


स्वर रहित मन्त्र

वृत्रस्य त्वा श्वसथादीषमाणा विश्वे देवा अजहुर्ये सखायः । मरुद्भिरिन्द्र सख्यं ते अस्त्वथेमा विश्वा: पृतना जयासि ॥३२४॥


स्वर रहित पद पाठ

वृत्रस्य । त्वा । श्वसथात् । ईषमाणाः । विश्वे । देवाः । अजहुः । ये । सखायः । स । खायः । मरुद्भिः । इन्द्र । सख्यम् । स । ख्यम् । ते । अस्तु । अथ । इमाः । विश्वाः । पृतनाः । जयासि ॥३२४॥

सामवेद - मन्त्र संख्या : 324
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 2
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 10;
Acknowledgment

शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (जीवात्मापर अर्थ) - आंतरिक देवासुर संग्रामामध्ये ज्याचा सर्वांनी साथ सोडली, अशा एखाद्या एकाकी आत्म्याला पाहून कोणीतरी म्हणत आहे - (वृत्रस्य) तमोगुण प्रधान झाल्यामुळे उद्भवलेल्या काम, क्रोध आदी रूप वृत्रासुराच्या (श्वसथात्) फूत्कारामुळे (ईषमाणाः) भयभीत होऊन पळणाऱ्या तुझ्या (विश्वे देवाः) सर्व चक्षु, श्रोत्र आदी इंद्रियांनी (त्वा) तुला (हे आत्मा, तुला) (अजहुः) एकाकी सोडले आहे. (ये) हीच ती इंद्रिये आहेत की जी (सखायः) आधी तुझ्या मैत्रिणी होत्या. हे (इंद्र) जीवात्मा, (मरुद्विः) प्राणांसह (ते) तुझी (सख्यम्) मैत्री (अस्तु) असावी. (अथ) त्यानंतर तू (इमाः) या (विश्वाः) सर्व (पृतनाः) काम, क्रोध आदी शत्रुसैन्याला (जय) जिंकून घे.।। याविषयी ऐतरेय ब्राह्मण ग्रंथातील वृत्रवध आख्यानामध्ये असे लिहिले आहे - इंद्र आणि त्याचे साथी वृत्राला ठार करण्यासाठी त्याच्यावर चालून गेले. वृत्राला समजून आले की ते त्याला मारण्यासाठी येत आहेत. त्याने विचार केला - यांना भिववावे. असा विचार करून त्याने इंद्रादीकडे जोराने फूत्कार केला. वृत्राच्या फूत्कारामुळे भयभीत झालेले सर्व देवगण पळून गेले. फक्त मरुत सैनिकांनी त्याची सात सोडली नाही. ङ्गहे इंद्र देवा, यांना मारा, यावर शस्त्रे चालवा, पराक्रम दाखवाफ असे उत्साहवर्धक वचन उच्चारीत मरुत इंद्राजवळच थांबले. एक ऋषी, मंत्रात हाच अर्थ आहे, असे सांगून म्हणतो, ङ्गवृत्रस्य त्वा श्वसथादीषमाणाःफ आदी (ऐ ब्रा. ३/२०) हे आख्यान तोच अर्थ स्पष्ट करण्यासाठी लिहिले आहे.। छान्दोग्य उपनिषदातील एक कथादेखील मंत्राच्या याच अर्थाला स्पष्ट करीत आहे. तिथे लिहिले आहे - ङ्गङ्घदेव आणि असुर यामध्ये लढाई जुंपली. दोघेही प्रजापतीचेच पुत्र होते. देवगण आपल्यासोबत उद्गीय (ओंकार) घेऊन आले, हा विचार करून की याद्वारे ते असुरांना परास्त करतील. त्यांनी नासिक्य (नाकातून येणाऱ्या- जाणाऱ्या) प्राणाची उद्गीथ रूपाने उपासना केली. असुरांनी नासिक्य प्राणाला पापाद्वारे वेधून वा भ्रष्ट करून टाकले. (प्राणात पार मिसळून टाकले) याचाच परिणाम म्हणून नासिक्य प्राण वा नासिका, सुवासिक व दुर्गंधित अशा दोन्ही प्रकारच्या पदार्थांचा वास घेते. कारण हे वासिक्य प्राण पापयुक्त झाला आहे. यानंतर देवांनी वाणीची उद्गीरथरूपाने उपासना केली. असुरांनी वाणीलाही पापविद्ध केले. याच कारणामुळे माणूस सत्य बोलतो तसेच असत्यही बोलतो यानंतर देवांनी नेत्राची उद्गीथरूपाने उपासना केली. सुरांनी त्यालाही पापभ्रष्ट केले. म्हणूनच डोळे दर्शनीय वा अदर्शनीय दोन्ही दृश्य पाहतात. कारण ते पापविद्ध आहेत. नंतर देवांनी श्रोत्राला उद्गीथरूपात पूजित केले. असुरांनी त्यालादेखील पापविद्ध केले. याच कारणामुळे माणसाचे कान श्रवणीय व अश्रवणीय दोन्ही प्रकारचे शब्द ऐकतात. कारण तेही पापभ्रष्ट आहेत. नंतर देवांनी मनाची उद्गीथ रूपाने उपासना केली. असुरांनी त्यालाही पापभ्रष्ट केले, म्हणूनच मन हे अनुचित वा उचित, दोन्ही प्रकारचे संकल्प करते. कारण की ते पापविद्ध आहे. यानंतर देवांनी प्राणाची उद्गीथ रूपाने पूजा केली. जेव्हा असुर प्राणाला निष्क्रीय वा पापविद्ध करण्यासाठी पुढे सरसावले, तेव्हा प्राणाची धडक बसून ते असे ध्वस्त झाले की जसे मातीने ढेकूळ दगडाशी टक्कर झाल्यामुळे चुरा- चुरा होते. या कथेद्वारे हे तथ्य उघड होत आहे की नेत्र, कर्ण आदी इंद्रिये आत्म्याच्या खऱ्या सहायिका नाहीत, तर आत्मा केवळ मुख्य प्राण शक्तीच्या साह्याने काम, क्रोध आदी असुरांना पराजित करू शकतो. द्वितीय अर्थ - (राष्ट्रपर अर्थ) युद्धामध्ये ज्या राजाची साथ प्रजाजनांनी सोडली आहे, अशा एकाकी पडलेल्या राजाला त्याचा राजमंत्री म्हणत आहे - (वृत्रस्य) अत्याचारी शत्रूच्या (श्वसथात्) विदाशक शस्त्रांच्या प्रहाराने (ईषमाणाः) भयभीत झालेल्या (विखे देवाः) सर्व प्रजाजनांनी (वा सर्व अधिकारी, सेनाधिकारी यांनी) (ला) तुम्हाला (अजहुः) एकाकी सोडले आहे. हेच प्रजाजन वा सेनाधिकारी युद्धापूर्वी तुमचे (सखायः) मित्र होते (वा तसे दाखवीत होते) हे (इंद्र) राजा, (मरुद्भिः) (मी अशी अभिलाषा करीत आहे की) प्रामाणिक खरे साती योद्धा सैनिकांशी (ते) तुमची (सख्यम्) मैत्री (अस्तु) जडावी. (अव) त्यानंतर (इमाः) (विश्वाः) सर्व (पृतनाः) विरोधी शत्रुसैन्यावर तुम्ही (जयासि) विजय मिळवा. ।। २

भावार्थ - युद्ध करण्याच्या प्रसंगी युद्धनिपुण शूरवीर क्षत्रिय योद्धा, हेच शत्रुसैन्याशी मुकाबला करू शकतात. अशाच प्रकारे आंतरिक देवासुर- संग्रामाच्या वेळी (हृदयातील पाप व पुण्य यातील संघर्षाच्या वेळी) प्राण हेच आत्म्याचे खरे सहाय्यक असतात. ।। २।।

इस भाष्य को एडिट करें
Top