Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 351
ऋषिः - तिरश्चीराङ्गिरसः शंयुर्बार्हस्पत्यो वा
देवता - इन्द्रः
छन्दः - अनुष्टुप्
स्वरः - गान्धारः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
यो꣢ र꣣यिं꣡ वो꣢ र꣣यि꣡न्त꣢मो꣣ यो꣢ द्यु꣣म्नै꣢र्द्यु꣣म्न꣡व꣢त्तमः । सो꣡मः꣢ सु꣣तः꣡ स इ꣢꣯न्द्र꣣ ते꣡ऽस्ति꣢ स्वधापते꣣ म꣡दः꣢ ॥३५१॥
स्वर सहित पद पाठयः꣢ । र꣣यि꣢म् । वः꣣ । रयि꣡न्त꣢मः । यः । द्यु꣣म्नैः꣢ । द्यु꣣म्न꣡व꣢त्तमः । सो꣡मः꣢꣯ । सु꣣तः꣢ । सः । इ꣣न्द्र । ते । अ꣡स्ति꣢꣯ । स्व꣣धापते । स्वधा । पते । म꣡दः꣢꣯ ॥३५१॥
स्वर रहित मन्त्र
यो रयिं वो रयिन्तमो यो द्युम्नैर्द्युम्नवत्तमः । सोमः सुतः स इन्द्र तेऽस्ति स्वधापते मदः ॥३५१॥
स्वर रहित पद पाठ
यः । रयिम् । वः । रयिन्तमः । यः । द्युम्नैः । द्युम्नवत्तमः । सोमः । सुतः । सः । इन्द्र । ते । अस्ति । स्वधापते । स्वधा । पते । मदः ॥३५१॥
सामवेद - मन्त्र संख्या : 351
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 12;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 12;
Acknowledgment
विषय - परमेश्वर आनंदकारी आहे -
शब्दार्थ -
(रयिन्तमः) अतिशय ऐश्वर्यवान (यः) जो (वः) तुम्हाला (रयिम्) ऐश्वर्य देतो आणि (द्युम्नवत्तमः) अतिशय तेजस्वी (यः) जो (द्युम्नैः) तेजाने तुम्हाला अलंकृत करणे (ज्ञः) तो (सुतः) हृदयात प्रकट झालेला (सोमः) चंद्राप्रमाणे आल्हाददायक आणि सोम औषधीप्रमाणे रसांचे आगर असलेला परमेश्वर, (स्वधापते) अन्नांचे स्वामी म्हणजे अन्नादी सांसारिक पदार्थांचा भोक्ता असलेले हे विद्वान, तो परमेश्वर (ते) तुमच्यासाठी मदः) आनंददायक (अस्त) आहे.।।१०।।
भावार्थ - या मंत्रात ‘रयिं, रयिं’मध्ये लाटानुप्रास आहे. ‘तमो तमः’ व ‘द्युम्नै, द्युम्न’मध्ये छेकानुप्रास आहे. य्, स्, त् आणि म् या वर्णांची वेगवेगळ्या ठिकाणी अनेक वेळा आवृत्ती असल्यामुळे वृत्त्यनुप्रास अलंकार आहे. ।। १०।।
विशेष -
हृदयात प्रकट झालेला ईश्वर योगी व्यक्तीला समस्त आध्यात्मिक ऐश्वर्य, ब्रह्मवर्चस् आणि आनंद प्रदान करतो. म्हणून सर्वांनी यत्नपूर्वक त्याचा साक्षात्कार केला पाहिजे.।। १०।।
या दशतीमध्ये इंद्राच्या महिमेचे गायन, त्याच्याप्रत श्रद्धा - रस आदींचे अर्पण, त्याच्याकडून ऐश्वर्याची याचना, त्याचे आवाहन व त्याची स्तुतिविषयी प्रेरणा केली असल्यामुळे या दशतीतील विषयांची संगती मागील दशतीच्या विषयांशी आहे, असे जाणावे.।।
चतुर्थ प्रपाठकातील द्वितीय अर्धाची प्रथम दशती समाप्त.
तृतीय अध्यायातील बारावा खंड समाप्त.
इथे तृतीय अध्याय समाप्त.