Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 352
ऋषिः - भरद्वाजो बार्हस्पत्यः
देवता - इन्द्रः
छन्दः - अनुष्टुप्
स्वरः - गान्धारः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
प्र꣡त्य꣢स्मै꣣ पि꣡पी꣢षते꣣ वि꣡श्वा꣢नि वि꣣दु꣡षे꣢ भर । अ꣣रङ्गमा꣢य꣣ ज꣢ग्म꣣ये꣡ऽप꣢श्चादध्व꣣ने꣡ न꣢रः ॥३५२॥
स्वर सहित पद पाठप्र꣡ति꣢꣯ । अ꣣स्मै । पि꣡पी꣢꣯षते । वि꣡श्वा꣢꣯नि । वि꣣दु꣡षे꣢ । भर । अरङ्गमा꣡य꣢ । अ꣣रम् । गमा꣡य꣢ । ज꣡ग्म꣢꣯ये । अ꣡प꣢꣯श्चादध्वने । अ꣡प꣢꣯श्चा । द꣣ध्वने । न꣡रः꣢꣯ । ॥३५२॥
स्वर रहित मन्त्र
प्रत्यस्मै पिपीषते विश्वानि विदुषे भर । अरङ्गमाय जग्मयेऽपश्चादध्वने नरः ॥३५२॥
स्वर रहित पद पाठ
प्रति । अस्मै । पिपीषते । विश्वानि । विदुषे । भर । अरङ्गमाय । अरम् । गमाय । जग्मये । अपश्चादध्वने । अपश्चा । दध्वने । नरः । ॥३५२॥
सामवेद - मन्त्र संख्या : 352
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 1;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 1;
Acknowledgment
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (जगदीश्वरपर अर्थ) - हे मनुष्या, तू (पिपीषते) तुझ्या मैत्रीसाठी जो तहानलेला वा अति उत्सुक आहे, अशा (विदुषे) सर्वज्ञ व (अरड्गमाय) पुष्कळ धन प्राप्त करून देणाऱ्या (जगदीश्वराशी मैत्री कर) तो (जग्मये) साह्याकरिता नेहमी पुढे येतो, (नरः) तो माणसांना (अ-पश्चा- दध्वने) मागे ढकलत नसून नेहमी पुढे जाण्यास उत्साह देतो. अशा जगदीश्वरासाठी तू आपला (विश्वानि) सर्व मैत्रीभाव (प्रति भर) अर्पण कर.।।
द्वितीय अर्थ - (आचार्यपर अर्थ) - हे राजा वा हे प्रजाजन, तुम्ही (पिपीषते) गुरुकुलाचे व्यवस्थापन व संचालन करण्यासाठी आवश्यक धनाची प्राप्ती करणाऱ्या तसेच (जग्मये) विद्यार्थ्यांच्या व तमच्या साह्यासाठी सदैव पुढे येणाऱ्या आणि (नरः) मनुष्यांना (अ- पश्चा- दध्वने) मागे न ढकळणाऱ्या उलट त्यांना सदा प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या (विदुषे) विद्वान आचार्यासाठी (विश्वानि) सर्व उत्तम धन, पदार्थ आदी द्या आणि विद्यावान व सदाचार- निर्माणासाठी (नरः) प्रतिभावान बालक (प्रति भर) गुरुकुलात पाठवा.।। १।।
भावार्थ - राजा असो वा प्रजा, सर्वांनी जगदीश्वराशी मैत्री केली पाहिजे. तसेच विद्वानांना धन, धान्य आदी देऊन सत्कृत व सम्मानित करावे की ज्यामुळे ते सर्वांना विद्या व उपदेश देण्यासाठी तत्पर राहतील व त्यांना त्याविषयी काही काळजी राहणार नाही. ।। १।।
विशेष -
या मंत्रात श्लेष अलंकार आहे.।। १।।