Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 353
ऋषिः - वामदेवो गौतमः, शाकपूतो वा देवता - इन्द्रः छन्दः - अनुष्टुप् स्वरः - गान्धारः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

आ꣡ नो꣢ वयोवयःश꣣यं꣢ म꣣हा꣡न्तं꣢ गह्वरे꣣ष्ठां꣢ म꣣हा꣡न्तं꣢ पूर्वि꣣ने꣢ष्ठाम् । उ꣣ग्रं꣢꣫ वचो꣣ अ꣡पा꣢वधीः ॥३५३

स्वर सहित पद पाठ

आ꣢ । नः꣣ । वयोवयश्शय꣢म् । व꣣योवयः । शय꣢म् । म꣣हा꣡न्त꣢म् । ग꣣ह्वरेष्ठा꣢म् । ग꣣ह्वरे । स्था꣢म् । म꣣हा꣡न्तं꣢ । पू꣣र्विनेष्ठा꣢म् । पू꣣र्विने । स्था꣢म् । उ꣣ग्र꣢म् । व꣡चः꣢꣯ । अ꣡प꣢꣯ । अ꣣वधीः ॥३५३॥


स्वर रहित मन्त्र

आ नो वयोवयःशयं महान्तं गह्वरेष्ठां महान्तं पूर्विनेष्ठाम् । उग्रं वचो अपावधीः ॥३५३


स्वर रहित पद पाठ

आ । नः । वयोवयश्शयम् । वयोवयः । शयम् । महान्तम् । गह्वरेष्ठाम् । गह्वरे । स्थाम् । महान्तं । पूर्विनेष्ठाम् । पूर्विने । स्थाम् । उग्रम् । वचः । अप । अवधीः ॥३५३॥

सामवेद - मन्त्र संख्या : 353
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 2
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 1;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे मनुष्या, (नः) आम्हा सर्वांच्या (वयोवयः शयम्) अन्नाच्या कणा-कणात, आयु- जीवनात प्राणा-प्राणात जो विद्यमान आहे, जो (महान्तम्) सर्वव्यापक असल्यामुळे सर्वांहून महान असून जो (गहृरेष्ठाम्) हृदय गुहेत जो अदृश्य रूपाने स्थित आहे. (महान्तम्) गुणांमध्ये सर्वाधिक सून (पूर्विणेष्ठाम्) पूर्वजांद्वारे रचित, भक्ति-गान, भक्ति-काव्य, गीत- भजन आदींमध्ये ज्याचे वर्णन केले आहे, त्याला तू (आ) अध्यात्म- योगाद्वारे प्राप्त कर आणि (उग्रं वचः) (आपल्या दशेविषयी कठोर वा नैराश्यपूर्ण शब्द बोलणे (अपा वधि) दूर ठेव. जसे दुःख वा अभावाच्या दशेत अनेक जण ‘मारा, कापा, तोडा’सारखे वाक्य बोलतात जे हिंसाला उपद्रव माजविणारे आहेत अथवा दुःख रोगादीच्या प्रसंगी ‘हा ! किती त्रास होतोय‘ ‘डोक्यात भयंकर वेदना आहेत’, ‘कसे जगावे अथवा दैन्य व अभावाच्या वेळी ‘हाय, हाय, आम्ही भुकेने मरत आहोत, कोणी विचारीत’, ‘कोणी तरी भाकरीचा तुकडा तरी तोंडात टाका हो,’ ‘पाण्याचा थेंब तरी तोंडात टाका हो’ अशी दीनवाणी उच्चारून उग्र वा नैराश्यपूर्ण वचन बोलू नकोस.।। २।।

भावार्थ - सर्वांचे कर्तव्य आहे की त्यानी महा महिमाशाली जगदीश्वराची उपासना करावी. त्याचा सर्वत्र प्रचार करावा. त्याद्वारे समाजामध्ये होणारा हाहाकार संपवावा आणि समाजात व राष्ट्रात सर्वत्र शांती नांदेल, असे करावे.।। २।।

इस भाष्य को एडिट करें
Top