Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 354
ऋषिः - प्रियमेध आङ्गिरसः देवता - इन्द्रः छन्दः - अनुष्टुप् स्वरः - गान्धारः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

आ꣢ त्वा꣣ र꣢थं꣣ य꣢थो꣣त꣡ये꣢ सु꣣म्ना꣡य꣢ वर्तयामसि । तु꣣विकूर्मि꣡मृ꣢ती꣣ष꣢ह꣣मि꣡न्द्र꣢ꣳ शविष्ठ꣣ स꣡त्प꣢तिम् ॥३५४॥

स्वर सहित पद पाठ

आ꣢ । त्वा꣣ । र꣡थ꣢꣯म् । य꣡था꣢꣯ । ऊ꣣त꣡ये꣢ । सु꣣म्ना꣡य꣢ । व꣣र्तयामसि । तुविकूर्मि꣢म् । तु꣣वि । कूर्मि꣢म् । ऋ꣣तीष꣡ह꣢म् । ऋ꣣ती । स꣡ह꣢꣯म् । इ꣡न्द्र꣢꣯म् । श꣣विष्ठ । स꣡त्प꣢꣯तिम् । सत् । प꣣तिम् ॥३५४॥


स्वर रहित मन्त्र

आ त्वा रथं यथोतये सुम्नाय वर्तयामसि । तुविकूर्मिमृतीषहमिन्द्रꣳ शविष्ठ सत्पतिम् ॥३५४॥


स्वर रहित पद पाठ

आ । त्वा । रथम् । यथा । ऊतये । सुम्नाय । वर्तयामसि । तुविकूर्मिम् । तुवि । कूर्मिम् । ऋतीषहम् । ऋती । सहम् । इन्द्रम् । शविष्ठ । सत्पतिम् । सत् । पतिम् ॥३५४॥

सामवेद - मन्त्र संख्या : 354
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 1;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे (शविष्ठ) बलिष्ठ राजा वा शक्तिमान परमेश्वर, (ऊतये) सांसारिक दुःख, विघ्न आदींपासून रक्षणासाठी आणि (सुम्नाय) ऐहिक व पारलौकिक सुख प्राप्तीसाठी आम्ही (उपासक व प्रजाजन) (तुविकूर्मिम्) अनेक कर्म करणाऱ्या व (ऋतीषहृम्) शत्रुसैन्यास पराजित करणाऱ्या (सत्पतिम्) सदाचारी जनांचा पालक असणाऱ्या (त्वा) तुम्हला - परमैश्वर्यवान परमेश्वराला व राजाला (आवर्तयामसि) आमच्याकडे आवृत्त करतो. (बोलावतो) (मया) जसे (ऊतये) शत्रूपासून रक्षणासाठी आणि (सुम्नाय) प्रवासात सुख-सोयी मिळण्यासाठी (तूविकूर्मिम्) व्यापार आदी उद्यमात प्रकूत धन उत्पन्न करणाऱ्या साधनांचा (ऋतीषहम्) वायू, वर्षा आदींचे आघात सहन करणारे व्यापारी वा प्रवासी (सत्पतिम्)त्या वाहनात बसणाऱ्या इतर श्रेष्ठ प्रवासीजनांप्रमाणे (रथम्) रथ, भूयान, जलयान, विमान आदी साधनांचा उपयोग करतात. (तसेच आम्ही राजालाच परमेश्वराला आवाहन करतो.)।। ३।।

भावार्थ - जसे वारा, ऊन, पाऊस आदीपासून बचाव कण्यासाठी आणि यात्रेत सुख सोयी मिळण्यासाठी रथ आवश्यक आहे, तसेच रोग आदी दुःखापासून त्राण मिळण्यासाठी शिक्षण, आरोग्य शास्त्र आवश्यक आहे. प्रजेला राजाकडून न्यायदान, वर्णा श्रमधर्म- पालन, शांति- स्थापन आदींची आवश्यकता असते. याचप्रकारे त्रिविध तापापासून निवृत्ती व मोक्ष सुख प्राप्तीसाठी मनुष्यांनी परमेश्वराची उपासना करावी.।। ३।।

इस भाष्य को एडिट करें
Top