Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 355
ऋषिः - प्रगाथः काण्वः देवता - इन्द्रः छन्दः - अनुष्टुप् स्वरः - गान्धारः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

स꣢ पू꣣र्व्यो꣢ म꣣हो꣡नां꣢ वे꣣नः꣡ क्रतु꣢꣯भिरानजे । य꣢स्य꣣ द्वा꣢रा꣣ म꣡नुः꣢ पि꣣ता꣢ दे꣣वे꣢षु꣣ धि꣡य꣢ आन꣣जे꣢ ॥३५५॥

स्वर सहित पद पाठ

सः꣢ । पू꣣र्व्यः꣢ । म꣣हो꣡ना꣢म् । वे꣣नः꣢ । क्र꣡तु꣢꣯भिः । आ꣣नजे । य꣡स्य꣢꣯ । द्वा꣡रा꣢꣯ । म꣡नुः꣢꣯ । पि꣣ता꣢ । दे꣣वे꣡षु꣢ । धि꣡यः꣢꣯ । आ꣣नजे꣢ ॥३५५॥


स्वर रहित मन्त्र

स पूर्व्यो महोनां वेनः क्रतुभिरानजे । यस्य द्वारा मनुः पिता देवेषु धिय आनजे ॥३५५॥


स्वर रहित पद पाठ

सः । पूर्व्यः । महोनाम् । वेनः । क्रतुभिः । आनजे । यस्य । द्वारा । मनुः । पिता । देवेषु । धियः । आनजे ॥३५५॥

सामवेद - मन्त्र संख्या : 355
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 4
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 1;
Acknowledgment

शब्दार्थ -
(महोनाम्) पूज्यांपैकी जो (पूर्व्यः) श्रेष्ठ पूजनीय आहे, (वेनः) जो मेधावी आणि कमनीय आहे, (सः) तो परम ऐश्वर्यवान इंद्र जगदीश्वर (ऋतुभिः) सृष्टी- संचालन आदी कर्मांद्वारे वा कर्मांतून (आनजे) व्यक्त होत आहे. (सृष्टीची निर्मिती व संचालन) या कार्याद्वारे त्याच्या विद्यमानतेचे अनुमान करता येते. (यस्य द्वारा) ज्या जगदीश्वराद्वारे (मनुः) मननशील (पिता) शरीराचा पालक जीवात्मा (देवेषु) शरीरवर्ती मन, बुद्धी, प्राण, इंद्रिये आदीमध्ये (धिमः) त्या त्या इंद्रियाच्या क्रिया (आनजे) प्राप्त करतो. (मन, बुद्धी इंद्रिये परमेश्वराच्या कृपेनेच जीवात्म्याचा आदेश ऐकतात.)।। ४।।

भावार्थ - जगामध्ये दिसून येणाऱ्या निसर्गातील सूर्योदय, चंद्रास्त, ऋतुपरिवर्तन आदी क्रिया कोणा कर्त्याशिवाय होणे शक्य नाही. त्यामुळे या क्रियांवरून परमेश्वराच्या अस्तित्वाचे अनुमान करता येते. देहाचा स्वामी जीवात्मादेखील परमेश्वराच्या साह्याशिवाय देहातील मन, बुद्धी, प्राण, इंद्रिये आदीद्वारे संकल्प, निश्चय, प्राणन, दर्शन, स्पर्शन आदी क्रिया करण्यात समर्थ होतो. ।। ४।।

इस भाष्य को एडिट करें
Top