Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 551
ऋषिः - रेभसूनू काश्यपौ
देवता - पवमानः सोमः
छन्दः - बृहती
स्वरः - मध्यमः
काण्ड नाम - पावमानं काण्डम्
1
आ꣡ ह꣢र्य꣣ता꣡य꣢ धृ꣣ष्ण꣢वे꣣ ध꣡नु꣢ष्टन्वन्ति꣣ पौ꣡ꣳस्य꣢म् । शु꣣क्रा꣢꣫ वि य꣣न्त्य꣡सु꣢राय नि꣣र्णि꣡जे꣢ वि꣣पा꣡मग्रे꣢꣯ मही꣣यु꣡वः꣢ ॥५५१॥
स्वर सहित पद पाठआ꣢ । ह꣣र्यता꣡य꣢ । धृ꣣ष्ण꣡वे꣢ । ध꣡नुः꣢꣯ । त꣣न्वन्ति । पौँ꣡स्य꣢꣯म् । शु꣣क्राः꣢ । वि । य꣣न्ति । अ꣡सु꣢꣯राय । अ । सु꣣राय । निर्णि꣡जे꣢ । निः꣣ । नि꣡जे꣢꣯ । वि꣣पा꣢म् । अ꣡ग्रे꣢꣯ । म꣣हीयु꣡वः꣢ ॥५५१॥
स्वर रहित मन्त्र
आ हर्यताय धृष्णवे धनुष्टन्वन्ति पौꣳस्यम् । शुक्रा वि यन्त्यसुराय निर्णिजे विपामग्रे महीयुवः ॥५५१॥
स्वर रहित पद पाठ
आ । हर्यताय । धृष्णवे । धनुः । तन्वन्ति । पौँस्यम् । शुक्राः । वि । यन्ति । असुराय । अ । सुराय । निर्णिजे । निः । निजे । विपाम् । अग्रे । महीयुवः ॥५५१॥
सामवेद - मन्त्र संख्या : 551
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 8;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 8;
Acknowledgment
विषय - सोम परमेश्वराच्या प्राप्तीसाठी उपासक-जन काय करतात-
शब्दार्थ -
(हर्यताय) वांछनीय वा प्रिय (धृष्णवे) तसेच काम आदी शत्रूंचे घर्षण करणाऱ्या सोम परमेश्वराच्या प्राप्तीसाठी योगसाधक जन (पौंस्यम्) पुरुषार्थ रूप (धनुः) धनुष्य (आ तन्वजिक) ताणून सिद्ध करतात म्हणजे पुरुषार्थ रूप धनुष्यावर ध्यानरूप दोरी (प्रत्यंचा) चढवतात. (शुक्राः) पवित्र अंतःकरण असलेले (महीयुवः) पूजा करण्याची इच्छा करणारे ते साधक (असुराय) प्राणदायक जीवात्माला (निर्णिजे) शुद्ध करण्यासाठी (विपाम्) विशेष मेधारी विद्वानां (अग्रे) समोर (वियन्त्रि) विशेष शिष्यत्वभावाने जातात ।।७।।
भावार्थ - योगसाधक जन आपल्या पुरुषार्थाद्वारे, ध्यानाद्वारे आणि गुरूकृपेने आपल्या आत्म्यास शुद्ध करून परमेश्वराच्या प्राप्तीसाठी पात्र होतात.।।७।।
विशेष -
या मंत्रात पौंस्य या शब्दावर धनुष्याचा आरोप असल्यामुळे रूपक अलंकार आहे. मुण्डकोषविषदामधे योगसाधनेतील धनुष्यावर एक रूपक अलंकार याप्रमाणे वर्णिलेला आहे- ङ्गङ्घउपनिषदात वर्णित ब्रह्मविद्यारूप धनुष्ट हाती घेऊन साधकाने त्यावर उपासनारूप बाण चढवावा. तन्मय चित्राद्वारे धनुष्य खेचून त्याने अक्षर ब्रह्मरूप लक्ष्याचा वेध घ्यावा. प्रणव हे धनुष्य, तर आत्मा बाण आहे आणि ब्रह्म त्याचे लक्ष्य आहे. साधकाने अप्रमत्र राहून जेव्हां ब्रह्माचा वेध घ्यावा, तेव्हा त्याने बाणाप्रमाणे तन्मय झाले पाहिजे. ।।(मु.२/२/३/४) ।।७।।