Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 553
ऋषिः - प्रजापतिर्वैश्वामित्रो वाच्यो वा
देवता - पवमानः सोमः
छन्दः - अनुष्टुप्
स्वरः - गान्धारः
काण्ड नाम - पावमानं काण्डम्
1
प्र꣡ सु꣢न्वा꣣ना꣡यास्यान्ध꣢꣯सो꣣ म꣢र्तो꣣ न꣡ व꣢ष्ट꣣ त꣡द्वचः꣢꣯ । अ꣢प꣣ श्वा꣡न꣢मरा꣣ध꣡स꣢ꣳ ह꣣ता꣢ म꣣खं꣡ न भृग꣢꣯वः ॥५५३॥
स्वर सहित पद पाठप्र꣢ । सु꣣न्वाना꣡य꣢ । अ꣡न्ध꣢꣯सः । म꣡र्तः꣢꣯ । न । व꣣ष्ट । त꣢त् । व꣡चः꣢꣯ । अ꣡प꣢꣯ । श्वा꣡न꣢꣯म् । अ꣣राध꣡स꣢म् । अ꣣ । राध꣡स꣢म् । ह꣣त꣢ । म꣣ख꣢म् । न । भृ꣡ग꣢꣯वः ॥५५३॥
स्वर रहित मन्त्र
प्र सुन्वानायास्यान्धसो मर्तो न वष्ट तद्वचः । अप श्वानमराधसꣳ हता मखं न भृगवः ॥५५३॥
स्वर रहित पद पाठ
प्र । सुन्वानाय । अन्धसः । मर्तः । न । वष्ट । तत् । वचः । अप । श्वानम् । अराधसम् । अ । राधसम् । हत । मखम् । न । भृगवः ॥५५३॥
सामवेद - मन्त्र संख्या : 553
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 9
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 8;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 9
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 8;
Acknowledgment
विषय - अशा मनुष्यास समाजातून बहिष्कृत करावे-
शब्दार्थ -
(अन्धसः) सोमरस (सुन्वानाय) अभिषुत करणाऱ्या व्यक्तिसाठी म्हणजे सोमयाग करणाऱ्यासाठी/समाजसेवा करणाऱ्यासाठी/प्रभुभक्ती करणाऱ्यासाठी जो (मर्तः) माणूस (तत्) ते प्रशंसात्मक (वचः) वचन (वा त्याची प्रशंसा) (न.प्र.वष्ठ) म्हणत नाही.(करीत नाही) त्या (अपराधसम्) यज्ञविरोधी/समाजद्रोही/नास्तिक व्यक्तीला तसेच (श्वानम्) कुत्र्याप्रमाणे लोभी, अप्पलपोटी मनुष्याला (अपहत) हे सामाजिक जनहो, तुम्ही दूर करा (त्याला समाजातून बहिष्कृत करा) (न) जरो (भृगवः) तेजस्वी राजपुरुष (मखम्) मखासुराला म्हणजे यज्ञाचा ढोंग करणाऱ्याला दंडित करतात.।।९।।
भावार्थ - ईशद्रोही, यज्ञद्रोही, समाजद्रोही आणि कुत्र्याप्रमाणे विषय लोभी असलेल्या मनुष्याला समाजातून बहिष्कृत केले पाहिजे ।।९।। या दशतीमधे परमात्मरूप सोम व परमात्म जन्य ब्रह्मानंदरसाच्या प्राप्तीचे उपाय वर्णित आहेत. त्यामुळे या दशतीच्या विषयांशी पूर्वदशतीच्या विषयांशी संगती आहे, असे जाणावे।। षष्ठ प्रपाठकातील द्वितीय अर्धाची प्रथमदशती समाप्त पंचम अध्यायातील अष्टम खंड समाप्त.।।
विशेष -
‘श्वानम्’ या शब्दात साध्यवसाना लक्षणामूलरू अतिशयोक्ति अलंकार आहे. निरुक्ताच्या दृष्टीने येथे लुप्तोपमा, अर्थोपमा वा व्यंग्योपमा आहे. निरूक्तामधे (३/१८) लुप्तोपमा वर्णन-प्रसंगी म्हटले आहे की ‘श्वा’ व ‘काक’ निन्दार्थक असून ते शब्द वेदान लुप्तोपमाच्या रूपाने येतात।।९।।