Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 577
ऋषिः - द्वितः आप्त्यः
देवता - पवमानः सोमः
छन्दः - उष्णिक्
स्वरः - ऋषभः
काण्ड नाम - पावमानं काण्डम्
1
प꣢रि꣣ को꣡शं꣢ मधु꣣श्चु꣢त꣣ꣳ सो꣡मः꣢ पुना꣣नो꣡ अ꣢र्षति । अ꣣भि꣢꣫ वाणी꣣रृ꣡षी꣢णाꣳ स꣣प्ता꣡ नू꣢षत ॥५७७॥
स्वर सहित पद पाठप꣡रि꣢꣯ । को꣡श꣢꣯म् । म꣣धुश्चु꣡त꣢म् । म꣣धु । श्चु꣡त꣢꣯म् । सो꣡मः꣢꣯ । पु꣣नानः꣢ । अ꣣र्षति । अभि꣢ । वा꣡णीः꣢꣯ । ऋ꣡षी꣢꣯णाम् । स꣣प्त । नू꣢षत ॥५७७॥
स्वर रहित मन्त्र
परि कोशं मधुश्चुतꣳ सोमः पुनानो अर्षति । अभि वाणीरृषीणाꣳ सप्ता नूषत ॥५७७॥
स्वर रहित पद पाठ
परि । कोशम् । मधुश्चुतम् । मधु । श्चुतम् । सोमः । पुनानः । अर्षति । अभि । वाणीः । ऋषीणाम् । सप्त । नूषत ॥५७७॥
सामवेद - मन्त्र संख्या : 577
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 12
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 10;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 12
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 10;
Acknowledgment
विषय - परमेश्वरापासून येणाऱ्या आनंदरसाचे वर्णन
शब्दार्थ -
(पुनानः) उपासकाचे अंतःकरण पवित्र करीत तो परमेश्वर वा तो ब्रह्मानंदरस (मधुरचुतम्) मधुर श्रद्धारस प्रस्रुत करणाऱ्या (कोशम्) मनोमय कोशामधे (परि अर्षति) व्याप्त होत आहे (मी तो आनंद आता अनुभवीत आहे) ऋषीणां सप्त वाणीः वेदांच्या आर्षेय, गायत्री आदी सात छंदातील ऋचा त्या परमेश्वराची वा त्या ब्रह्मानंदरसाची (अभिनूषत) सोम नामाने स्तुती करतात.।।१२।।
भावार्थ - परब्रह्म व ब्रह्मामंदरस यांचा महिमा ज्या वेदवाणीत सांगितला आहे, त्यांच्या गायनात मनास रमवून ब्रह्मच्या उपासकांनी आपल्या हृदयात ब्रह्मानंदरसाचा प्रवाह होत असल्याचा अनुभव घेतला पाहिजे.।।१२।। या दशतीमधे सोम परमेश्वराप्रत सामगान करण्याची प्रेरणा केली असून परमेश्वराचा व त्याच्या आनंदरसाचा महिमा वर्णिला आहे. म्हणून या दशतीतील विषयांची मागील दशतीच्या विषयांशी संगती आहे, असे जाणावे. षष्ठ प्रपाठकातील द्वितीय अर्धाची तृतीय दशती समाप्त। पंचम अध्यायाचा दशम खंड समाप्त.
विशेष -
चोवीस अक्षरांपासून आरंभ होऊन क्रमाक्रमाने चार-चार वर्णांची वृद्धी करीत गेल्याने गायत्री, उष्णिक्, अनुष्टुप्, बृहती, पंक्ति, त्रिष्टुप् आणि जगती, हे सात छंद तयार होतात. त्यांना ऋषि-छंद म्हणतात. ऋषीणां सप्त वाणीः’ या शब्दांनी तेच सात छंद येथे सूचित केले आहेत.।।१२।।