Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 612
ऋषिः - हिरण्यस्तूप आङ्गिरसः
देवता - इन्द्रः
छन्दः - त्रिष्टुप्
स्वरः - धैवतः
काण्ड नाम - आरण्यं काण्डम्
1
इ꣡न्द्र꣢स्य꣣ नु꣢ वी꣣꣬र्या꣢꣯णि꣣ प्र꣡वो꣢चं꣣ या꣡नि꣢ च꣣का꣡र꣢ प्रथ꣣मा꣡नि꣢ व꣣ज्री꣢ । अ꣢ह꣣न्न꣢हि꣣म꣢न्व꣣प꣡स्त꣢तर्द꣣ प्र꣢ व꣣क्ष꣡णा꣢ अभिन꣣त्प꣡र्व꣢तानाम् ॥६१२॥
स्वर सहित पद पाठइ꣡न्द्र꣢꣯स्य । नु । वी꣣र्या꣢꣯णि । प्र । वो꣣चम् । या꣡नि꣢꣯ । च꣣का꣡र꣢ । प्र꣣थमा꣡नि꣢ । व꣣ज्री꣢ । अ꣡ह꣢꣯न् । अ꣡हि꣢꣯म् । अ꣡नु꣢꣯ । अ꣣पः꣢ । त꣣तर्द । प्र꣢ । व꣣क्ष꣡णाः꣢ । अ꣣भिनत् । प꣡र्व꣢꣯तानाम् ॥६१२॥
स्वर रहित मन्त्र
इन्द्रस्य नु वीर्याणि प्रवोचं यानि चकार प्रथमानि वज्री । अहन्नहिमन्वपस्ततर्द प्र वक्षणा अभिनत्पर्वतानाम् ॥६१२॥
स्वर रहित पद पाठ
इन्द्रस्य । नु । वीर्याणि । प्र । वोचम् । यानि । चकार । प्रथमानि । वज्री । अहन् । अहिम् । अनु । अपः । ततर्द । प्र । वक्षणाः । अभिनत् । पर्वतानाम् ॥६१२॥
सामवेद - मन्त्र संख्या : 612
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 3; दशतिः » 3; मन्त्र » 11
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 6; खण्ड » 3;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 3; दशतिः » 3; मन्त्र » 11
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 6; खण्ड » 3;
Acknowledgment
विषय - इन्द्र देवता। इन्द्र नावाने परमेश्वराच्या व राजाच्या पराक्रमाचे वर्णन-
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (परमेश्वर), सूर्य आणि विद्युत पर)- मी (एक उपासक, भौतिकशास्त्र-वैज्ञानिक) (इन्द्रस्य) परमेश्वराच्या पराक्रमाच्या/पदार्थांना अवयवरूपात विच्छिन्न करणाऱ्या सूर्याच्या आणि ऐश्वर्यांचे साधन असलेल्या विद्युतेच्या (वीर्याणि) सृष्टीचे उत्पत्ती, स्थिती, संहाररूप कार्याचे/आकर्षण-प्रकाशनरूप कार्यांचे/आणि भूयान, जलमान, अंतरिक्ष यान व विविध यंत्रांचे संचालनरूप अद्भुत कार्यांचे (प्रवोचम्) वर्णन (नु) शीघ्र करीत आहे (यानि प्रथमानि) ही ती कर्में आहेत की जी उत्कृष्ट कार्यें तो (वज्री) शक्तिधारी परमेश्वर/सूर्य/आणि विद्युत. (चकार) करीत असते. त्या वीरत्वपूर्ण कार्यांपैकी एक एकाचे कथन करीत आहेत. तो परमात्मा, तो सूर्य आणि ती विद्युत (अहिम्) अंतरिक्षात स्थित मेघाचा (अहन्) संहार करतो (अपः) तो मेघमंडळात विद्यमान जलाला (अनु ततर्य) व ध्वस्त करून खाली भूमीवर पाडतो आणि (पर्वतनाम्) पर्वतांतील (वक्षणाः) नद्यांना (प्र अभिनत्) बहिम खंडित करून खालच्या दिशेकडे प्रवाहित करतो.।।
द्वितीय अर्थ - (राष्ट्रपर) मी (इन्द्रस्य) शत्रुविदारक राजाच्या (वीर्याणि) शत्रुविजय, राष्ट्रनिर्माण आदी वीरत्वपूर्ण कार्यांचे (प्र वोचम्) उत्तमप्रकारे वर्णन करीत आहे (यानि प्रथमानि) त्याने जी जी श्रेष्ठ कार्यें आधी केली आहेत, ती (वज्री) त्या तलवार, बंदूक, तोफ व तोफ गोळे यांच्या साह्याने (चकार) केली आहेत. तो (अहिम्) सापाप्रमाणे वाकडी-तिकड चाल चलणाऱ्या, दुष्टांचा, राष्ट्रोभतीत बाधक असलेल्या शत्रूचा (अहम्) संहार करतो (अपः) जल-प्रवाहाप्रमाणे वेगाने चालून येणाऱ्या शत्रुदलाला (ततर्य) छिन्न-विच्छिन्न करतो आणि (पर्वतानाम्) पर्वतीय दुर्गांमधे लपून बसलेल्या शत्रुसैन्याला (अ भिनत्) छिन्न-ध्वस्त करतो.।।११।।
भावार्थ - जसे परमेश्वर सूर्याद्वारे वा आकाशीय विद्युताद्वारे मेघमंडळाचा संहार करून तिथे थांबलेल्या पाण्याला खाली भूमीवर पाडतो आणि नद्यांमधे प्रवाहित करतो, तद्वत राष्ट्राचा अधिपती विघ्नकारी शत्रूंचा निःपात करून, दुर्गात लपलेला शत्रुसैन्याला पराजित करून राष्ट्रामधे सर्व ऐश्वर्य प्रवाहित करावे (राष्ट्र ऐश्वर्यसंपन्न करावे)।।११।।
विशेष -
या मंत्रात श्लेषालंकार आहे. अहन्, अनुततर्द, प्राभिमत्, या अनेक क्रियांचा एकच कारक(इन्द्र) असल्यामुळे येथे दीपक अलंकार आहे.।।११।।