Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 613
ऋषिः - विश्वामित्रो गाथिनः
देवता - आत्मा अग्निर्वा
छन्दः - त्रिष्टुप्
स्वरः - धैवतः
काण्ड नाम - आरण्यं काण्डम्
1
अ꣣ग्नि꣡र꣢स्मि꣣ ज꣡न्म꣢ना जा꣣त꣡वे꣢दा घृ꣣तं꣢ मे꣣ च꣡क्षु꣢र꣣मृ꣡तं꣢ म आ꣣स꣢न् । त्रि꣣धा꣡तु꣢र꣣र्को꣡ रज꣢꣯सो वि꣣मा꣡नोऽज꣢꣯स्रं꣣ ज्यो꣡ति꣢र्ह꣣वि꣡र꣢स्मि꣣ स꣡र्व꣢म् ॥६१३॥
स्वर सहित पद पाठअ꣣ग्निः꣢ । अ꣣स्मि । ज꣡न्म꣢꣯ना । जा꣣त꣡वे꣢दाः । जा꣣त꣢ । वे꣣दाः । घृत꣢म् । मे꣣ । च꣡क्षुः꣢꣯ । अ꣣मृ꣡त꣢म् । अ꣣ । मृ꣡त꣢꣯म् । मे꣣ । आस꣢न् । त्रि꣣धा꣡तुः꣢ । त्रि꣣ । धा꣡तुः꣢꣯ । अ꣣र्कः꣢ । र꣡ज꣢꣯सः । वि꣣मा꣡नः꣢ । वि꣣ । मा꣡नः꣢꣯ । अ꣡ज꣢꣯स्रम् । अ । ज꣣स्रम् । ज्यो꣡तिः꣢꣯ । ह꣣विः꣢ । अ꣣स्मि । स꣡र्व꣢꣯म् ॥६१३॥
स्वर रहित मन्त्र
अग्निरस्मि जन्मना जातवेदा घृतं मे चक्षुरमृतं म आसन् । त्रिधातुरर्को रजसो विमानोऽजस्रं ज्योतिर्हविरस्मि सर्वम् ॥६१३॥
स्वर रहित पद पाठ
अग्निः । अस्मि । जन्मना । जातवेदाः । जात । वेदाः । घृतम् । मे । चक्षुः । अमृतम् । अ । मृतम् । मे । आसन् । त्रिधातुः । त्रि । धातुः । अर्कः । रजसः । विमानः । वि । मानः । अजस्रम् । अ । जस्रम् । ज्योतिः । हविः । अस्मि । सर्वम् ॥६१३॥
सामवेद - मन्त्र संख्या : 613
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 3; दशतिः » 3; मन्त्र » 12
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 6; खण्ड » 3;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 3; दशतिः » 3; मन्त्र » 12
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 6; खण्ड » 3;
Acknowledgment
विषय - पुढील दोन मंत्राची देवता-अग्नी। परमात्मा व जीवात्मा आपले परिचय देत आहेत-
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (परमात्मपर) मी परमेश्वर (अग्निः अस्मि) सर्वांचा अग्रनायक आणि अग्नीप्रमाणे प्रकाशक असल्यामुळे अग्नी नामधारी आहे. (जन्मना) मी स्वरूपाने (जातवेदाः) सर्वज्ञ, सर्वव्यापी, वेदप्रकाशक आणि सर्व संसदेचा स्वामी आहे. (मे) माझे (चक्षुः) नेत्र म्हणजे माझी दृष्टिशक्ती (घृतम्) अत्यंत तीव्र आहे. (मे) माझ्या (आसन्) मुखात (अमृतम्) अमृत आहे, मी नेहमी अमृतत्वाा आस्वाद घेत असतो म्हणजे मी अमर आहे. मी (त्रिधातुः) या जगाच्या, सृष्टी, स्थिती व संहार या तिन्ही क्रियांचा कर्ता आहे. मी (अर्कः) अर्चनीय आहे. मी (रजसः) सूर्य, चंद्र, तारामंडळ, पृथ्वी आदी लोकांचा (विमांनः) निर्माता वा अधिष्ठाता असून (अजस्रं ज्योतिः) अक्षम तेजवान (हविः) सर्वज ज्याने आवाहन करतात अशा मी (सर्वम्) सर्व काही वा सर्वशिक्तिमंत (अरिम) आहे
या मंत्रात ‘मी अमर आहे’ असा व्यग्यार्थ सांगून ‘माझ्या मुखात अमृत आहे’ असा अर्थ अभिहित केल्यामुळे पर्यायोक्ती अलंकार आहे.
द्वितीय अर्थ - (जीवात्मापर) एक शरीर धारी जीवात्मा सांगत आहे.
-मी (अग्निः) (अस्मि) अगन्ी आहे- अग्नीप्रमाणे प्रकाशक असून दुर्गुणांना भस्म करणारा आहे. (जन्मना) आचार्य कुळातून (गुरूकुलरूप गर्भातून) मी दुसरा जन्म घेतल्यामुळे मी आधीपासूनच (जातवेदाः) वेद विद्यावान आहे. (मेचक्षुः) माझ्या डोळ्यात (घृतम्) स्नेह आहे म्हणजे मी सर्वांचं स्नेहपूरित दृष्टीनं पाहतो. (मे आसन्) माझ्या मुखात (अमृतम्) अमृत आहे म्हणजे वाणीचे माधुर्य आहे. मी (त्रिधातुः) सत्त्व-रज-तम, जाग्रत-स्वप्न-सुषुप्ती, तप-स्वाध्याय ईश्वर प्रणिधान, ऋक्-यजु-साम आदी त्रिगुणांनी समृद्ध आहे. मी (अर्कः) परमेश्वराची आराधना करणारा, सदाचारी, वृद्धजनांचा व विद्यावृद्धांचा सन्मान करणारा आणि सूर्यासम तेजस्वी आहे. मी (रजसः) ग्रह-उपग्रह, सूर्य आदी लोकांना (विमानः) खगोल-गणिताच्या साह्याने समर्थ असून (अजस्रं ज्योतिः) अक्षय ज्योतिवान (अविजेय मनोबलाची व्यस्ती) तसेच श्रेष्ठ उद्दिष्टांसाठी सर्वस्व अर्चित करणारा मनुष्य (अस्मि) आहे.।।१२।।
भावार्थ - जसा परमेश्वर अनेकानेक विशिष्ट गुणांनी संपन्न आहे. तद्वत मनुष्यदेखील अनेक गुणांनी व शक्तींना संपन्न आहे. त्यामुळे माणसाने नेहमी महत्त्वाकांक्षी असावे आणित याप्रमाणे कार्यप्रवृत्त रहावे ।।१२।।
विशेष -
जसा परमेश्वर अनेकानेक विशिष्ट गुणांनी संपन्न आहे. तद्वत मनुष्यदेखील अनेक गुणांनी व शक्तींना संपन्न आहे. त्यामुळे माणसाने नेहमी महत्त्वाकांक्षी असावे आणित याप्रमाणे कार्यप्रवृत्त रहावे ।।१२।।