Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 7
ऋषिः - भरद्वाजो बार्हस्पत्यः देवता - अग्निः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
1

ए꣢ह्यू꣣ षु꣡ ब्रवा꣢꣯णि꣣ ते꣡ऽग्न꣢ इ꣣त्थे꣡त꣢रा꣣ गि꣡रः꣢ । ए꣣भि꣡र्व꣢र्धास꣣ इ꣡न्दु꣢भिः ॥७॥

स्वर सहित पद पाठ

आ꣢ । इ꣣हि । उ । सु꣢ । ब्र꣡वा꣢꣯णि । ते꣣ । अ꣡ग्ने꣢꣯ । इ꣣त्था꣢ । इ꣡त꣢꣯राः । गि꣡रः꣢꣯ । ए꣣भिः꣢ । व꣣र्धासे । इ꣡न्दु꣢꣯भिः ॥७॥


स्वर रहित मन्त्र

एह्यू षु ब्रवाणि तेऽग्न इत्थेतरा गिरः । एभिर्वर्धास इन्दुभिः ॥७॥


स्वर रहित पद पाठ

आ । इहि । उ । सु । ब्रवाणि । ते । अग्ने । इत्था । इतराः । गिरः । एभिः । वर्धासे । इन्दुभिः ॥७॥

सामवेद - मन्त्र संख्या : 7
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 1;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे (अग्ने) परमात्मन्, आपण (आ इहि उ) माझ्या हृदय प्रदेशात या. मी (ते) आपणासाठी (इत्था) सत्य भावनेने खऱ्या मनाने (इतरा:) सामान्यापेक्षा वेगळ्या अशा (गिर:) वेदवाणी (सु) सम्यक प्रकारे पूर्ण मनोयोगासह (ब्रवाणि) उच्चाराव्यात. अर्थात वेदवाणीद्वारे आपली स्तुती करावी (वाकरीन) आपण (एभिः) या मी समर्पित केलेल्या (इन्दुभिः) भावपूरित भक्तिरसरूप सोमाने (वर्धासे) वृद्धिंगत व्हा. या मंत्रातील इन्दु शब्दाद्वारे हा आशय ध्वनित होत आहे की जसे चंद्र किरणांनी समुद्र व वनस्पती वाढतात, तद्वत आपण माझ्या स्तुतीद्वारे वृध्दिंगत व्हा. (माझी स्तुती स्विकारा) ||७||

भावार्थ - मनुष्यकृत वाणी सामान्य असते, पण वेदवाणी परमेश्वरकृत असल्यामुळे त्या वाणीपेक्षा विलक्षण आहे. तिचा प्रत्येक शब्द साभिप्राय व विविधार्थ प्रकाशक असतो. जर उपासकगण त्या वाणीद्वारे परमात्म्याचे उपासना करतील आणि त्याच्याप्रत आपल्या हृदयातील भक्तिरसरूप सोमरस प्रवाहित करतील. तर ज्याप्रमाणे चंद्र किरणांनी जसे समुद्र, वनस्पती आदी वाढतात. तसेच उपासकांच्या भक्तिरसाने तृप्त होऊन परमेश्वर उपासकांच्या हृदयात अत्यंत उत्कर्ष भावाने आणि त्यांना कृतकृत्य करतो. ।।७।।

इस भाष्य को एडिट करें
Top