Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 8
ऋषिः - वत्सः काण्वः
देवता - अग्निः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
1
आ꣡ ते꣢ व꣣त्सो꣡ मनो꣢꣯ यमत्पर꣣मा꣡च्चि꣢त्स꣣ध꣡स्था꣢त् । अ꣢ग्ने꣣ त्वां꣢ का꣢मये गि꣣रा꣢ ॥८॥
स्वर सहित पद पाठआ꣢ । ते꣣ । वत्सः꣢ । म꣡नः꣢꣯ । य꣣मत् । परमा꣢त् । चि꣣त् । सध꣡स्था꣢त् । स꣣ध꣢ । स्था꣣त् । अ꣡ग्ने꣢꣯ । त्वाम् । का꣣मये । गिरा꣢ ॥८॥
स्वर रहित मन्त्र
आ ते वत्सो मनो यमत्परमाच्चित्सधस्थात् । अग्ने त्वां कामये गिरा ॥८॥
स्वर रहित पद पाठ
आ । ते । वत्सः । मनः । यमत् । परमात् । चित् । सधस्थात् । सध । स्थात् । अग्ने । त्वाम् । कामये । गिरा ॥८॥
सामवेद - मन्त्र संख्या : 8
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 1;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 1;
Acknowledgment
विषय - मी तुझ्याशी माझा प्रेमभाव दृढ करीत आहे. -
शब्दार्थ -
हे (अग्ने) जगन्नियन्ता परमात्मन् (ते) तुझा हा (वत्सः) प्रिय पुत्र (तुझे लाडके वासरू) (परमात्चत्) दूर असलेल्या (सधस्थात्) प्रदेशात असला तरीही (मनः) आपल्या मनाला (आयमत्) तेथून आणून तुझ्यात (तुझ्या ध्यानात) केंद्रित करीत आहे., (मी तुझा प्रिय पुत्र, उपासक तुझे ध्यान करीत आहे.) (गिरा) हृदयातील ध्यानाव्यतिरिक्त मी (गिरा) स्तुति वाणीद्वारे (त्वाम् ) तुझ ईश्वराची (कामये) कामना करीत आहे. म्हणजे तुझ्या प्रेमभावात आबद्ध होत आहे. ।।८।।
भावार्थ - जेव्हा मनुष्य सांसारिक, ऐहिक विषयांत व्यर्थत्व ओळखतो तेव्हा दूर दूरच्या प्रदेशात भरकटलेल्या आपल्या मनाला सर्व प्रदेशापासून परत आणून त्याला परमेश्वराशी संलग्न करतो. वाणीने वारंवार त्याच्याच गुण धर्माचे स्तवन करतो आणि त्याच्या प्रेमाने परिप्लुत झालेल्या हृदयामुळे समस्त भूमंडळाच्या राज्यालाही तुच्छ लेखतो. ॥८॥
विशेष -
त्या परमेश्वराची मी स्तुती करतो, हे सांगतात. -