Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 9
ऋषिः - भरद्वाजो बार्हस्पत्यः देवता - अग्निः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
1

त्वा꣡म꣢ग्ने꣣ पु꣡ष्क꣢रा꣣द꣡ध्यथ꣢꣯र्वा꣣ नि꣡र꣢मन्थत । मू꣣र्ध्नो꣡ विश्व꣢꣯स्य वा꣣घ꣡तः꣢ ॥९॥

स्वर सहित पद पाठ

त्वा꣢म् । अ꣣ग्ने । पु꣡ष्क꣢꣯रात् । अ꣡धि꣢꣯ । अ꣡थ꣢꣯र्वा । निः । अ꣣मन्थत । मूर्ध्नः꣢ । वि꣡श्व꣢꣯स्य । वा꣣घ꣡तः꣢ ॥९॥


स्वर रहित मन्त्र

त्वामग्ने पुष्करादध्यथर्वा निरमन्थत । मूर्ध्नो विश्वस्य वाघतः ॥९॥


स्वर रहित पद पाठ

त्वाम् । अग्ने । पुष्करात् । अधि । अथर्वा । निः । अमन्थत । मूर्ध्नः । विश्वस्य । वाघतः ॥९॥

सामवेद - मन्त्र संख्या : 9
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 9
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 1;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे (अग्ने) तेज: स्वरूप परमात्मन् (अथर्वा) चलायमान न होणारा स्थितप्रज्ञ योगी (त्वाम्) आपणास (विश्वस्य) समस्त ज्ञानांचे (वाहकात) वाहक असलेल्या (पुष्करात मूर्ध्न अधि) कमलाकार मस्तिष्कामध्ये (निरमन्थत) मंथन करून प्रकट करतो. (अनुभवतो) ।।९।। परमात्मरूप अग्नीला मंथनाद्वारे प्रकट करण्याची प्रक्रिया सांगताना श्वेताश्वतर उपनिषदात म्हटले आहे - ( योगीजनाने) स्व आत्म्यास खालची अरणी (काष्ठ) करून आणि ओंकारास वरची अरणी (रवीसा ख काष्ठ) करावे. अशाप्रकारे ध्यानरूप मंथनाचा अभ्यास करीत लुप्त वा सुप्त परमात्मरूप अग्नीस प्रकट करावे. (श्वेता. २११४)) कमळपत्रावर (पुष्करपर्णावर) अग्नी उत्पन्न झाला होता, ही कथा याच मंत्राच्या आधारावर रचलेली दिसते. ॥९॥

भावार्थ - जसे अरणीमंथनाद्वारे यज्ञवेदीरूप कमलपत्रावर यज्ञाग्नी उत्पन्न केला जातो, तद्वत स्थितप्रज्ञ योग्यांनी ध्यानरूप मंथनाद्वारे कमलाकार मस्तिष्कामध्ये परमात्मरूप अग्नी प्रकट केला पाहिजे. ।।९।। विवरणकार माधव या भाष्यकाराने आपल्या भाष्यात हा इतिहास दाखविला आहे. सर्वत्र दाट अंधार पसरलेला होता. तेव्हा मातरिश्वा वायूला आकाशात एक सूक्ष्म अग्नी दिसला. त्याने आणि अथर्वा ऋषीने मंथन करून तो अग्नी प्रकट केला. त्याने केलेला मंत्रार्थ साररूपेण असा आहे. - (अग्ने) हे अग्नी (अथर्वा ) अथर्वा ऋषीने (त्वाम्) तुला (मूर्ध्व:) प्रद्यानभूत (पुष्करात्) अंतरिक्षापासून (विश्वस्य वाघतः) सर्व ऋत्विज यजमानांकरीता (निरमन्थत) अत्यंत मंथन करून काढले. वास्तविक पाहता विवरणकार माधवाने जो कथानक सांगितला आहे, ती सृष्टीच्या दृष्टीने उत्पत्ति प्रक्रियेमध्ये अग्नीचा जन्म कसा झाला हा इतिहास दर्शवितो. कारण की, सृष्टी उत्पत्तीत आकाशाद्वायुः वायोरग्नि: या प्रमाणे आकाशानंतर वायू आणि वायूनंतर अग्नी हाच क्रम आहे. उत्पत्तिनंतर अग्नी आकाशात सूक्ष्मरूपाने विद्यमान होता. त्याला अथर्वा परमेश्वराने पूर्वी उत्पन्न झालेल्या वायूच्या साहचर्याने मंथन कर मंथनाद्वारे प्रकट केले, असाच अर्थ घेतला पाहिजे. भरतस्वामीच्या भाष्याचा आशय असा अथर्वाने (मूर्ध्न:) धारक (विश्वस्य वाघत:) सर्वांचा जो विवहिक त्या (पुष्करात्) अंतरिक्षापासून अथवा कमलपत्रापासून मंथन करून अग्नी काढला. सामणावार्याने केलेला अर्थ असा (अग्ने) हे अग्नी, (अथर्वा ) अथर्वा नावाच्या ऋषीने (मूर्ध्न:) मूर्धाप्रमाणे धारक आणि (विश्वस्य) सर्व सृष्टीचा वाहक असलेल्या तुला (पुष्करात अधि) पुष्करपर्ण म्हणजे कमलपत्रावर (त्वाम् ) तुला (निरमन्थत) अरणीमधून उत्पन्न केले. इथेही पुष्करपर्णचा अर्थ कमलपत्र नाही अर्थ आहे यज्ञवेदीचा आकाश आणि अथर्वा म्हटले आहे. यज्ञ करणाऱ्या यजमानाला की, जो अरणीद्वारा यज्ञकुंडामध्ये अग्नी उत्पन्न करतो. येथे हे तात्पर्य घेतले पाहिजे. उलट या विद्वानाने आपल्या भाष्यात म्हटले आहे जल हेच पुष्कर आहे. आणि प्राण अथर्वा आहे. । शत ४।२।२।२ शतपथ ब्राह्मणाचे हे प्रमाण उद्धृत करून त्याने मंत्रार्थ केला आहे. हे अग्नी तुला (पुष्करात्) जलातून (अथर्वा ) सतत गतिमान प्राणाने (निरमन्थत) मंथन करून उत्पन्न केले आहे. महीधरलाही हाच अर्थ अभिप्रेत आहे. येथे प्राण श्दाने प्राणवान परमात्मा अथवा विद्वान जन, जल शब्दाचे मेघस्थित जल आणि अग्नी शब्दाने विद्युत अर्थ ग्रहीत केला पाहिजे. किंवा हे तात्पर्यदेखील घेता येते की, शरीरस्य प्राण अन्न पान आदीने उत्पन्न रसांद्वारे जीवनाग्नी उदीप्त करतो. महीधर यानेदेखील पुष्करपर्णा (कमलपत्रा) वर अग्नीमंथनपुरक दुसरा वैकल्पिक अर्थ केला आहे. अनेक भाष्यकारांनी तात्पर्य न समजून अर्थ स्पष्ट न करता कथा रचून घेतल्या आहेत. ज्या वास्तविक अर्थासंबंधी भ्रम उत्पन्न करण्यास कारणीभूत ठरल्या आहेत. वास्तविक पाहता या मंत्रात अथर्वा नावाच्या कोणा ऋषीचा इतिहास मुळीच नाही, कारण असे की वेदमंत्र ईश्वरप्रोक्त आहेत आणि ते सृष्टीच्या प्रारंभी प्रादुर्भुत झाले आहेत. तेव्हा पश्चातवर्ती ऋषी आदींचे कार्यकलापांचे वर्णन पूर्ववर्ती वेदात असणे संभवनीय नाही. ।।९।।

इस भाष्य को एडिट करें
Top