Loading...
यजुर्वेद अध्याय - 22

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 22/ मन्त्र 17
    ऋषिः - विश्वरूप ऋषिः देवता - अग्निर्देवता छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः
    0

    अ॒ग्निं दू॒तं पु॒रो द॑धे हव्य॒वाह॒मुप॑ब्रुवे।दे॒वाँ२ऽआ सा॑दयादि॒ह॥१७॥

    स्वर सहित पद पाठ

    अ॒ग्निम्। दू॒तम्। पु॒रः। द॒धे॒। ह॒व्य॒वाह॒मिति॑ हव्य॒ऽवाह॑म्। उप॑। ब्रु॒वे॒। दे॒वान्। आ। सा॒द॒या॒त्। इ॒ह ॥१७ ॥


    स्वर रहित मन्त्र

    अग्निन्दूतं पुरो दधे हव्यवाहमुप ब्रुवे । देवाँऽआसादयादिह ॥


    स्वर रहित पद पाठ

    अग्निम्। दूतम्। पुरः। दधे। हव्यवाहमिति हव्यऽवाहम्। उप। ब्रुवे। देवान्। आ। सादयात्। इह॥१७॥

    यजुर्वेद - अध्याय » 22; मन्त्र » 17
    Acknowledgment

    व्याख्यान -
    भाषार्थ : (कर्म सं.) वेदमंत्र म्हणून अग्निहोत्र करण्याने अश्वमेधापर्यंत सर्व यज्ञांची शिल्पविद्या व त्यांच्या साधनांची प्राप्ती होते. कर्मकांडापासून मोक्षापर्यंत सुख मिळते. त्यामुळेच त्यांचे नाव देवता आहे. (अथातो.) ज्यांच्या गुणांचे वर्णन केले जाते त्यांना दैवत म्हणतात. अर्थात जी जी संज्ञा ज्या ज्या मंत्रात ज्या ज्या अर्थाची त्या त्या मंत्राचे नाव त्या त्या देवतेचे असते. जसे ‘अग्निदूतं’ या मंत्रात अग्नी शब्द चिन्ह आहे. तेथे त्याच मंत्राला अग्निदेवता समजले पाहिजे. असेच जेथे जेथे मंत्रात जे जे शब्द लिहिले आहेत तेथे तेथे त्या त्या (चिन्हाला) मंत्रालाच देवता समजले जाते. याप्रमाणेच सर्वत्र जाणावे. त्यामुळे देवता शब्दाने ज्या ज्या गुणाचा जो जो बोध होतो तो तो निरुक्त व ब्राह्मण इत्यादी ग्रंथांत चांगल्या प्रकारे स्पष्ट केलेला आहे. यामुळे ईश्वराने ज्या ज्या अर्थाला ज्या ज्या नावाने वेदात उपदेश केलेला आहे. त्या त्या नावाच्या मंत्राने त्याच अर्थाला जाणले पाहिजे. ते मंत्र तीन प्रकारचे आहेत. त्यातील कित्येक परोक्ष अर्थात अप्रत्यक्ष अर्थाचे, कित्येक प्रत्यक्ष अर्थात प्रसिद्ध अर्थाचे व कित्येक आध्यात्मिक अर्थात जीव व परमेश्वराचे, तसेच सर्व पदार्थांचे कार्यकारणाचे प्रतिपादन करणारे आहेत. तात्पर्य हे, की त्रिकालस्थ जितके पदार्थ आहेत, त्यांचे विधान मंत्राद्वारे केले जाते, त्यामुळेच त्यांचे नाव देवता आहे.

    इस भाष्य को एडिट करें
    Top