Loading...
यजुर्वेद अध्याय - 25

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 25/ मन्त्र 13
    ऋषिः - प्रजापतिर्ऋषिः देवता - परमात्मा देवता छन्दः - निचृत त्रिष्टुप् स्वरः - धैवतः
    0

    यऽआ॑त्म॒दा ब॑ल॒दा यस्य॒ विश्व॑ऽउ॒पास॑ते प्र॒शिषं॒ यस्य॑ दे॒वाः।यस्य॑ छा॒याऽमृतं॒ यस्य॑ मृ॒त्युः कस्मै॑ दे॒वाय॑ ह॒विषा॑ विधेम॥१३॥

    स्वर सहित पद पाठ

    यः। आ॒त्म॒दा। इत्या॑त्म॒ऽदाः। ब॒ल॒दा इति॑ बल॒ऽदाः। यस्य॑। विश्वे॑। उ॒पास॑त॒ इत्यु॑प॒ऽआस॑ते। प्र॒शिष॒मिति॑ प्र॒ऽशिष॑म्। यस्य॑। दे॒वाः। यस्य॑। छा॒या। अ॒मृत॑म्। यस्य॑। मृ॒त्युः। कस्मै॑। दे॒वाय॑। ह॒विषा॑। वि॒धे॒म॒ ॥१३ ॥


    स्वर रहित मन्त्र

    यऽआत्मदा बलदा यस्य विश्व उपासते प्रशिषँयस्य देवाः । यस्य छायामृतँयस्य मृत्युः कस्मै देवाय हविषा विधेम ॥


    स्वर रहित पद पाठ

    यः। आत्मदा। इत्यात्मऽदाः। बलदा इति बलऽदाः। यस्य। विश्वे। उपासत इत्युपऽआसते। प्रशिषमिति प्रऽशिषम्। यस्य। देवाः। यस्य। छाया। अमृतम्। यस्य। मृत्युः। कस्मै। देवाय। हविषा। विधेम॥१३॥

    यजुर्वेद - अध्याय » 25; मन्त्र » 13
    Acknowledgment

    व्याख्यान -
    भाषार्थ : (य आत्मदा:.) जो परमेश्वर आपल्या कृपेनेच आपल्या आत्म्याचे विज्ञान देणारा आहे. जो सर्व विद्या व सत्य सुख देणारा आहे. ज्याची उपासना सर्व विद्वान लोक करत आलेले आहेत. ज्याचे अनुशासन वेदोक्त शिक्षण असून, त्याचा स्वीकार सर्व शिष्ट लोक करतात. ज्याचा आश्रय घेणे मोक्षसुखाचे कारण आहे व ज्याची अवकृपाच जन्म-मरणरूपी दु:ख देणारी आहे. त्या ईश्वराचा उपदेश-सत्यविद्या, सत्यधर्म व सत्यमोक्ष यांना न मानता जो आपल्या कपोल-कल्पनेने अर्थात दुष्ट इच्छेने वाईट आचरण करून वेदाविरुद्ध वागतो. त्याच्यावर ईश्वराची अकृपा होते. तेच सर्व दु:खांचे कारण आहे व ज्याचे आज्ञापालनच सर्व सुखाचे मूळ आहे. (कस्मै.) जो सुखस्वरूप असून, सर्व प्रजेचा पती आहे, त्या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी सत्यप्रेम भक्तिरूपी साधनांनी आम्ही नित्य त्याला भजावे. ज्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारचे दु:ख कधीही होता कामा नये. ॥५॥ (द्यौ. शा.) हे सर्वशक्तिमान भगवान! तुझ्या भक्ती व कृपेनेच ‘द्यौ’ सूर्य इत्यादी गोलांचा प्रकाश व विज्ञान सदैव आम्हाला सुखदायक ठरो व आकाश, पृथ्वी, जल, औषधी, वनस्पती, वट इत्यादी वृक्ष, जगातील सर्व विद्वान, वेदब्रह्म हे सर्व पदार्थ व याहूनही भिन्न असलेले जग आम्हाला सदैव सुख देवो. हे सर्व पदार्थ आम्हाला सदैव अनुकूल असावे, ज्यामुळे हे वेदभाष्य आम्ही सुखपूर्वक करू शकू. या प्रकारे विद्या, बुद्धी, विज्ञान, आरोग्य व उत्तम साह्य तुझ्या कृपेने शांतिपूर्वक प्राप्त व्हावे व आम्हाला व सर्व जगाला उत्तम गुण व सुखाचे दान दे. ॥६॥ (यतो य.) हे परमेश्वरा! तू ज्या ज्या देशात किंवा स्थानी जगाची रचना व पालन करण्यासाठी प्रयत्न केला जातो ते ते स्थान आमच्यासाठी भयरहित कर. अर्थात, कोणत्याही स्थानापासून आम्हाला भय वाटता कामा नये. (शन्न: कुरु) सर्व दिशांमध्ये राहणारे पशू व प्रजा आहे, त्यांच्यापासून आम्हाला भय वाटता कामा नये. त्यांना आम्ही सुखी करावे व त्यांनाही आमचे भय वाटता कामा नये व तुझ्या प्रजेत जी माणसे व पशू इत्यादी आहेत त्यांच्याकडून धर्म, अर्थ, काम, मोक्ष तुझ्या कृपेनेच सिद्ध व्हावेत. ज्यामुळे माणसाला धर्म इत्यादी फळ सहजतेने प्राप्त व्हावेत. ॥७॥ (यस्मिन्नृच:) हे भगवान कृपानिधे (ऋच:) ऋग्वेद, (साम) सामवेद, (यजूँाषि) यजुर्वेद व तिन्हींच्या अंतर्गत असल्यामुळे अथर्ववेद हे सर्व ज्याच्यामध्ये स्थित आहेत व ज्याच्यामध्ये मोक्षविद्या अर्थात ब्रह्मविद्या व सत्यासत्याचा प्रकाश असतो (यस्मिँश्वि.) ज्यात सर्व प्रजेचे चित्त स्मरण करण्याची वृत्ती आहे. जसे माळेमध्ये मणी सूत्रात (दोऱ्यात) ओवलेले असतात व जसे रथाच्या चक्राच्या मध्यभागी आरे असतात त्या काष्ठात जसे अन्य काष्ठ लावलेले असतात, तशा त्या सर्व गठित आहेत. असे माझे मन तुझ्या कृपेने शुद्ध व्हावे व मोक्ष व सत्यधर्माचे अनुष्ठान करून कल्याणाची इच्छा आणि असत्याचा परित्याग करण्याचा संकल्प पूर्ण व्हावा. त्या मनामुळे तुझ्या वेदाचे सत्य अर्थ आम्हाला कळावेत. ॥८॥ हे सर्वविद्यामय सर्वार्थवित् जगदीश्वरा! तू आमच्यावर कृपा कर. ज्यामुळे आम्ही सदैव विघ्नापासून दूर राहावे व तुझ्या वेदांचा सत्य अर्थ विस्तारपूर्वक करून जगात कीर्ती वाढवावी. हे भाष्य पाहून वेदानुसार सत्याचे अनुष्ठान करून आम्ही सदैव श्रेष्ठ गुण धारण करावेत, त्यासाठी आम्ही प्रेमाने तुझी प्रार्थना करतो ती तू ताबडतोब ऐक. ज्यामुळे सर्वांवर उपकार करणारे वेदभाष्याचे अनुष्ठान योग्य रीतीने सिद्ध व्हावे.

    इस भाष्य को एडिट करें
    Top