Loading...
यजुर्वेद अध्याय - 30

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 30/ मन्त्र 3
    ऋषिः - नारायण ऋषिः देवता - सविता देवता छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः
    0

    विश्वा॑नि देव सवितर्दुरि॒तानि॒ परा॑ सुव। यद्भ॒द्रं तन्न॒ऽआ सु॑व॥३॥

    स्वर सहित पद पाठ

    विश्वा॑नि। दे॒व॒। स॒वि॒तः॒। दु॒रि॒तानीति॑ दुःऽइ॒तानि॑। परा॑। सु॒व॒। यत्। भ॒द्रम्। तत्। नः॒। आ। सु॒व॒ ॥३ ॥


    स्वर रहित मन्त्र

    विश्वानि देव सवितर्दुरितानि परा सुव । यद्भद्रन्तन्नऽआ सुव ॥


    स्वर रहित पद पाठ

    विश्वानि। देव। सवितः। दुरितानीति दुःऽइतानि। परा। सुव। यत्। भद्रम्। तत्। नः। आ। सुव॥३॥

    यजुर्वेद - अध्याय » 30; मन्त्र » 3
    Acknowledgment

    व्याख्यान -
    भाषार्थ - हे सत्यस्वरूप! हे विज्ञानमय! हे सदानन्दस्वरूप! हे अनन्तसामर्थ्ययुक्त! हे परमकृपाळू! हे अनन्तविद्यामय! हे विज्ञान विद्याप्रद! (देव) हे परमेश्वरा! तू सूर्य इत्यादी सर्व जगाचा व विद्येचा प्रकाश करणारा आहेस व संपूर्ण आनंद देणारा आहेस. (सवित:) हे जगदुत्पादक सर्वशक्तिमान! तू संपूर्ण जगाला उत्पन्न करणारा आहेस. (न:) आमचे (विश्वानि) सर्व (दुरितानि) दु:खे व आमचे सर्व दुष्ट गुण कृपा करून (परासुव) दूर कर. अर्थात, आमच्यापासून ते सदैव दूर राहू देत. (यभ्दद्रं) आम्हाला दु:खरहित करून आमचे कल्याण कर. सुखयुक्त भोग सदैव आम्हाला मिळावेत. सुख हे दोन प्रकारचे आहेत - एक अभ्युदय अर्थात चक्रवर्तिराज्य इष्ट मित्र, धन, पुत्र, स्त्री व शरीराने अत्यंत उत्तम सुख प्राप्त होणे व दुसरे नि:श्रेयस सुख ज्याला मोक्षही म्हटले जाते. ज्यामध्ये ही दोन्ही सुख प्राप्त असतात. त्यालाच भद्र म्हटले जाते. (तन्न आ सुव) ते सुख तू आम्हाला प्राप्त करवून दे. तुझी कृपा व साह्य याद्वारे आमची सर्व विघ्ने दूर व्हावीत व या वेदभाष्याचे आमचे अनुष्ठान सुखपूर्वक पार पडावे. या अनुष्ठानाने आमचे शरीर, बुद्धी वाढावी, सज्जनांचे साह्य मिळावे, चतुरता व सत्यविद्याही वाढावी. हे भद्रस्वरूप सुख, तुझ्या सामर्थ्याने आम्हाला मिळावे. तुझ्या कृपासामर्थ्याने सत्यविद्यायुक्त यथार्थ वेदभाष्य करावे, तुझ्या कृपेने हे वेदभाष्य सर्व माणसांना उपकारक ठरावे. तुझ्या अंतर्यामी प्रेरणेमुळे सर्व माणसांमध्ये या वेदभाष्याबाबत श्रद्धा व उत्साह वाढावा. ज्यामुळे वेदभाष्य करण्याचा आमचा प्रयत्न सफल व्हावा. या प्रकारे तू आमच्यावर व सर्व जगावर कृपादृष्टी ठेवावी, ज्यामुळे हे महान कार्य आम्ही सहजतेने पार पाडावे. ॥१॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top