यजुर्वेद - अध्याय 8/ मन्त्र 36
ऋषिः - विवस्वान् ऋषिः
देवता - परमेश्वरो देवता
छन्दः - भूरिक् आर्षी त्रिष्टुप्,
स्वरः - धैवतः
0
यस्मा॒न्न जा॒तः परो॑ऽअ॒न्योऽअस्ति॒ यऽआ॑वि॒वेश॒ भुव॑नानि॒ विश्वा॑। प्र॒जाप॑तिः प्र॒जया॑ सꣳररा॒णस्त्रीणि॒ ज्योती॑षि सचते॒ स षो॑ड॒शी॥३६॥
स्वर सहित पद पाठयस्मा॑त्। न। जा॒तः। परः॑। अ॒न्यः। अस्ति॑। यः। आ॒वि॒वेशेत्या॑ऽवि॒वेश॑। भुव॑नानि। विश्वा॑। प्र॒जाप॑ति॒रिति॑ प्र॒जाऽप॑तिः। प्र॒जयेति॑ प्र॒ऽजया॑। स॒र॒रा॒ण इति॑ सम्ऽर॒रा॒णः। त्रीणि॑। ज्योति॑षि। स॒च॒ते॒। सः। षो॒ड॒शी ॥३६॥
स्वर रहित मन्त्र
यस्मन्न जातः परोऽअन्योऽअस्ति यऽआविवेश भुवनानि विश्वा । प्रजापतिः प्रजया सँरराणस्त्रीणि ज्योतीँषि सचते स षोडशी ॥
स्वर रहित पद पाठ
यस्मात्। न। जातः। परः। अन्यः। अस्ति। यः। आविवेशेत्याऽविवेश। भुवनानि। विश्वा। प्रजापतिरिति प्रजाऽपतिः। प्रजयेति प्रऽजया। सरराण इति सम्ऽरराणः। त्रीणि। ज्योतिषि। सचते। सः। षोडशी॥३६॥
व्याख्यान -
भाषार्थ : याविषयी ऋग्वेदाचे प्रमाण आहे, की (तद्वि.) विष्णू अर्थात व्यापक परमेश्वर (परमं) अत्यंत उत्तम आनंदस्वरूप (पद) प्राप्त होण्यायोग्य अर्थात ज्याचे नाव मोक्ष आहे, त्याला (सूरय:) विद्वान लोक (सदा पश्यन्ति) सर्व काळी पाहतात तो सर्वांत व्याप्त असून स्थान, काल व वस्तूचा भेद नाही. अर्थात, या देशात आहे, त्या देशात नाही, या काळात होता, त्या काळात नाही, या वस्तूमध्ये आहे, त्या वस्तूमध्ये नाही, या कारणामुळे ते पद सर्वस्थानी सर्वांना प्राप्त होते. कारण तो ब्रह्म सर्व ठिकाणी परिपूर्ण आहे. यात हा दृष्टान्त आहे, की (दिवीव चक्षुराततम् ) जसा सूर्याचा प्रकाश आवरणरहित आकाशात व्याप्त असतो व जसे त्या प्रकाशात नेत्राची दृष्टी व्याप्त होते, याच प्रकारे परब्रह्म पदही स्वयंप्रकाश, सर्वत्र व्याप्त होत आहे. त्या पदाच्या प्राप्तीपेक्षा कोणतीही प्राप्ती उत्तम नाही. त्यासाठी चारही वेद त्याची प्राप्ती करविण्यासाठी विशेष प्रतिपादन करतात.
याविषयी वेदान्तशास्त्रात व्यास मुनींचेही प्रमाण आहे. तत्तु समन्वयात् सर्व वेदवाक्यात ब्रह्माचेच विशेष प्रतिपादन केलेले आहे. कुठे कुठे साक्षातरूपानेच कधी कधी परंपरेने, याच कारणाने तो परब्रह्म वेदांचा परम अर्थ आहे.
याविषयी यजुर्वेदाचेही प्रमाण आहे की- (यस्मान्न जा.) ज्या परब्रह्मापेक्षा (अन्य:) दुसरा कोणीही (पर:) उत्तम पदार्थ (जात:) प्रकट (नास्ति) अर्थात नाही (य आविवेश भु.) जो सर्व विश्वात व्याप्त होत आहे (प्रजापति: प्र.) तोच सर्व जगाचा पालनकर्ता व अध्यक्ष आहे ज्याने (त्रीणि ज्योतिाषि) अग्नी, सूर्य व विद्युत् या तीन ज्योतींचा प्रजेमध्ये प्रकाश होण्यासाठी (सचत) रचना करून संयुक्त केलेले आहे व ज्याचे नाव (षोडशी) आहे. अर्थात (१) ईक्षण जो यथार्थ विचार, (२) प्राण, सर्व विश्वाला धारण करणारा, (३) श्रद्धा-सत्यावर विश्वास, (४) आकाश, (५) वायू, (६) अग्नी, (७) जल, (८) पृथिवी, (९) इंद्रिय, (१०) मन अर्थात ज्ञान, (११) अन्न, (१२) वीर्य अर्थात बल व पराक्रम, (१३) तप अर्थात धर्मानुष्ठान सत्याचार (१४) मंत्र अर्थात वेदविद्या, (१५) कर्म अर्थात सर्व प्रयत्न, (१६) नाव अर्थात दृश्य व अदृश्य पदार्थाची संज्ञा यालाच सोळा कला म्हणतात. हे सर्व ईश्वरामध्येच आहे. त्यासाठी त्याला षोडशी म्हणतात. या षोडश कलांचे प्रतिपादन प्रश्नोपनिषदाच्या ६ व्या प्रश्नात केलेले आहे.
यावरून कळते, की वेदांचा मुख्य अर्थ परमेश्वरच आहे व त्याच्यापासून पृथक हे जगत आहे. तो वेदांचा गौण अर्थ आहे. या दोन्हीमधून प्रमुखाचेच ग्रहण होते. त्यापासून हा निष्कर्ष काढता येतो, की वेदांचे मुख्य तात्पर्य परमेश्वराची प्राप्ती करविण्याची व प्रतिपादन करविण्याची आहे. त्या परमेश्वराच्या उपदेशरूपाने वेदाद्वारे कर्म, उपासना व ज्ञान या तीन कांडांचा हा लोक व परलोकाच्या व्यवहाराच्या फलांची सिद्धी व यथावत उपकार करण्यासाठी सर्व माणसांनी या चार विषयांच्या अनुष्ठानात पुरुषार्थ करावा. हाच मनुष्यदेह धारण करण्याचे फळ आहे.
Acknowledgment
Book Scanning By:
Sri Durga Prasad Agarwal
Typing By:
N/A
Conversion to Unicode/OCR By:
Dr. Naresh Kumar Dhiman (Chair Professor, MDS University, Ajmer)
Donation for Typing/OCR By:
N/A
First Proofing By:
Acharya Chandra Dutta Sharma
Second Proofing By:
Pending
Third Proofing By:
Pending
Donation for Proofing By:
N/A
Databasing By:
Sri Jitendra Bansal
Websiting By:
Sri Raj Kumar Arya
Donation For Websiting By:
Shri Virendra Agarwal
Co-ordination By:
Sri Virendra Agarwal