Loading...
यजुर्वेद अध्याय - 8

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 8/ मन्त्र 36
    ऋषिः - विवस्वान् ऋषिः देवता - परमेश्वरो देवता छन्दः - भूरिक् आर्षी त्रिष्टुप्, स्वरः - धैवतः
    1

    यस्मा॒न्न जा॒तः परो॑ऽअ॒न्योऽअस्ति॒ यऽआ॑वि॒वेश॒ भुव॑नानि॒ विश्वा॑। प्र॒जाप॑तिः प्र॒जया॑ सꣳररा॒णस्त्रीणि॒ ज्योती॑षि सचते॒ स षो॑ड॒शी॥३६॥

    स्वर सहित पद पाठ

    यस्मा॑त्। न। जा॒तः। परः॑। अ॒न्यः। अस्ति॑। यः। आ॒वि॒वेशेत्या॑ऽवि॒वेश॑। भुव॑नानि। विश्वा॑। प्र॒जाप॑ति॒रिति॑ प्र॒जाऽप॑तिः। प्र॒जयेति॑ प्र॒ऽजया॑। स॒र॒रा॒ण इति॑ सम्ऽर॒रा॒णः। त्रीणि॑। ज्योति॑षि। स॒च॒ते॒। सः। षो॒ड॒शी ॥३६॥


    स्वर रहित मन्त्र

    यस्मन्न जातः परोऽअन्योऽअस्ति यऽआविवेश भुवनानि विश्वा । प्रजापतिः प्रजया सँरराणस्त्रीणि ज्योतीँषि सचते स षोडशी ॥


    स्वर रहित पद पाठ

    यस्मात्। न। जातः। परः। अन्यः। अस्ति। यः। आविवेशेत्याऽविवेश। भुवनानि। विश्वा। प्रजापतिरिति प्रजाऽपतिः। प्रजयेति प्रऽजया। सरराण इति सम्ऽरराणः। त्रीणि। ज्योतिषि। सचते। सः। षोडशी॥३६॥

    यजुर्वेद - अध्याय » 8; मन्त्र » 36
    Acknowledgment

    व्याखान -

    ज्याच्या इतका महान तुलनीय किंवा श्रेष्ठ कुणी झालेला नाही किंवा कुणी होणार नाही त्या परमेश्वराचे वर्णन कसे करावे? जो (विश्वा भुवनानि) सर्व भुवन [लोक] सर्व पदार्थांचे निवासस्थान असून असंख्य लोकांमध्ये (आविवेश) प्रविष्ट होऊन परिपूर्ण होत आहे. तोच ईश्वर प्रजेचा पती आहे. तो सर्व प्रजेला रमवितो आणि सर्व प्रजेत रमतो. (त्रीणीत्यादि) तीन ज्योति म्हणजे अग्नी, बाय, सूर्य यांना ज्याने निर्माण केलेले आहे. पदार्थ विद्येच्या उत्पत्तीसाठी या तीन गोष्टी मुख्य समजाव्या सर्व जगाचा व्यवहारही यामुळेच चालतो. (सः षोडशी) ज्या ईश्वराने सोळा कला उत्पन्न केलेल्या आहेत तो सोळा कलांनी युक्त आहे त्या कला अशा १] ईसण २] प्राण ३] श्रद्धा ४] आकाश ५] वायु ६] अग्नी ७] जल ८] पृथ्वी ९] इंद्रिये १०] मन ११] अन्न १२ वीर्य [पराक्रम] १३] तप [धर्मानुष्ठान] १४] मंत्र [वेदविद्या] १५] कर्मलोक—प्रयत्नस्थान [१६] इतर लोकांची नावे. या कलांमध्ये सर्व जग बसलेले आहे. व परमेश्वरामध्ये तर अनंत कला आहेत. त्याची उपासना करणे सोडून जो दुसऱ्याची उपासना करतो तो कधी ही सुख प्राप्त करू शकत नाही, एवढेच नव्हे तर नेहमी तो दुःखामध्ये राहतो. ॥१४॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top